Thursday, February 22, 2024
Homeआध्यात्मिकस्वामी म्हणतात.. हा आहे सुखी जीवनाचा मंत्र.. मन साफ तर सर्व माफ.!!

स्वामी म्हणतात.. हा आहे सुखी जीवनाचा मंत्र.. मन साफ तर सर्व माफ.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… नेहमी भूतकाळातील गोष्टी विसरून जात चला, कारण सतत मागच्या गोष्टींचा विचार करत राहिलात. तर त्याचा परिणाम वर्तमानातील जगण्यावर आणि भविष्यावर होत असतो.

लोक आपल्या विषयी काय बोलतात? याकडे अजिबात लक्ष देण्याची गरज नाही, कारण पाठीमागे लोक तर राजाला सुध्दा शिव्या देत असतात. असो, प्रत्येक समस्ये वर उपाय योजना आहेच. काळाच्या ओघात सगळ्या गोष्टींवर उपाय सापडतो. त्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागतो.

स्वतःच्या आयुष्याची कधीही इतरांशी तुलना करू नका आणि त्यावरून इतरां विषयीचे मत बनवू नका, कारण त्यांच्या आयुष्यातील वादळे आणि संकटांची तुम्हाला कल्पना नसते.

अति विचार करीत बसू नका, काही प्रश्नांची उत्तरे न मिळालेलीच बरी असतात. कदाचित तुम्ही अपेक्षा ठेवली नसताना देखील ती तुमच्या पर्यंत नक्कीच पोहोचतील. तुमच्या आनंदाला फक्त तुम्हीच जबाबदार आहात.

आपण आनंदी राहायचे की दुःखी हे ठरवण्याचे अधिकार कुणालाही देऊ नका. पोट दुखे पर्यंत हसा. लक्षात ठेवा, जगातील सगळ्या प्रश्नांचा भार कुणीही तुमच्या डोक्यावर दिलेला (ठेवलेला) नाही.

सुंदर डोळ्यांसाठी जगातील फक्त चांगल्या गोष्टीं कडेच पहा. सुंदर ओठांसाठी नम्र आणि मृदू भाषेचा वापर करा. कधीही आपण एकटे नाही, याची जाणीव ठेवा. आयुष्या च्या वाटेवर चालत राहून आनंदाने जगा. कधीकधी केरा चा डबाही आपल्याला मना पेक्षा बरा वाटतो.

कारण तो दिवसातून एकदा का होईना, निदान रिकामा तरी होतो. तसेच मनही रिकामे करत रहा. आपण मात्र मनात कितीतरी दुःखद आठवणी साठवतो. काय मिळवतो यातून आपण? आपणच स्वतःचे दुःख वाढवत राहतो. घडून गेलेल्या वाईट गोष्टी वर्षानुवर्षे मनात ठेवतो. त्या ज्या गोष्टींमुळे घडल्या, त्यांचा पुढे आपणच तिरस्कार करतो.

आता केराच्या डब्या सारखच दररोज आपल मनही साफ करायच. जुने दु:ख विसरून सारे नवीन स्वीकारायचे. नव्या सुखांना त्यात आनंदाने भरायच. सुखी जीवनाचे तंत्र आता आपण सर्वांनीच शिकायच. स्वतः नेहमीच आनंदी रहायच, आणि दुसर्‍यांनाही आनंदी ठेवायच.

एक मात्र लक्षात ठेवा, आपल मन साफ ठेवा. मित्र, मैत्रिण, नातेवाईक, हित संबंधित स्नेही कुणा कुणाबद्दल राग, द्वेष, सुडबुद्धी, तिटकारा, आकस, ठेऊ नका. मग पहा आयुष्यात काहीच चुकीच घडणार नाही, आणि आयुष्य देखील सुंदर होईल.

आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात रहा. आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो. आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवारा च्या आरोग्याची काळजी घ्या.

आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकां ना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. श्री गुरुदेव दत्त.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्र द्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular