Saturday, December 2, 2023
Homeआध्यात्मिकस्वामींना आपल्या मनातलं समजतं.. इच्छा पूर्ण होण्यासाठी आडवी येत असलेली विघ्नं ते...

स्वामींना आपल्या मनातलं समजतं.. इच्छा पूर्ण होण्यासाठी आडवी येत असलेली विघ्नं ते करतात नष्ट.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, एक जटाधारी गोसावी रामेश्वर आदी ठिकाणी तीर्थयात्रा करीत होता. यात्रा करत असताना त्याला जलोदर झाला. दिवसेंदिवस त्याचे पोट फुगू लागले. अन्न खाता येत नव्हते म्हणून त्याला चांगलाच अशक्तपणा आला होता. द्वारकेला जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेणे अशी त्यांची इच्छा होती. पण व्याधीमुळे ते जवळजवळ अशक्य वाटत नव्हते.

यातच तो पायपीट करत गाणगापूर येथे आला आणि तेथे मुक्कामी राहिला. तेथे त्याला अवतारे विभूती आहे असे कळाले. त्याला असे वाटले की, आपण यांचे दर्शन घ्यायला हवे. 4-5 दिवसांचा मुक्काम झाल्यानंतर तो अक्कलकोट येण्यास निघाला. पुन्हा पायपिट करत अक्कलकोट येथे आला.

त्यादिवशी स्वामी महाराज नव्या विहिरीच्या येथे बसले होते. तो कसाबसा चालत येत असलेले स्वामींनी बघितले व आपल्या सेवेकऱ्यांना सांगितले “अरे त्या वैराग यायला मार्ग सांगा आणि त्याच्या हाताला धरून इकडे घेऊन या” स्वामींनी असे बोलल्यावर त्यांच्या स्वयंसेवकांनी पुढे जाऊन त्या गोसाव्याला हात धरून घेऊन आले.

त्या गोसाव्याने स्वामीला बघताच स्वामींना नमस्कार केला. आणि स्वामी त्याला बोलले “बैरागी बुवा तुम्हाला श्रीकृष्णाची दर्शन घ्यायची इच्छा आहे ना… ती नक्की पूर्ण होईल.. भरोसा ठेवा..” स्वामींचे अंतरसाक्षीत्वाचे बोलणे एकूण गोसावी चकित झाला. माझ्या मनातील इच्छा स्वामींना कशी कळली याचा विचार करित मनात बोलू लावला, “निशंक स्वामी परमेश्वरच आहेत” तेव्हा स्वामी परत बोल्ले “अरे… आम्ही कोणीही असू दे… तू त्या कडुलिंबाच्या झाडाची पाने खा!”

स्वामींचे हुकूम म्हणून त्या गोसाव्याने कडू लिंबाचे पाने खाल्ली. परंतु तो खूप कडू असल्याने त्याने लगेच थुंकुन टाकला. व स्वामींना बोलला, “स्वामी हा पाला तर खूपच कडू आहे!.. कसा खाऊ..” गोसाव्याने असे बोलताच, स्वामी हसले बोल्ले, “काय म्हणतोस..! पाला कडू आहे..! मग त्या बाजूच्या फांदीचा पाला खा..! त्यात कडवटपणा नाही.” त्याप्रमाणे गोसाव्याने त्या बाजूच्या फांदीचा पाला खाल्ला. तेव्हा तो पाला त्या गोसाव्याला अक्षरशा गोड लागला.

फक्त गोसावी यालाच नव्हे तर तेथे जमलेल्या सर्व व्यक्तींना तो पाला गोड लागला. स्वामींच्या या तर केलेला पाहून गोसाव्याचा डोळ्यात पाणीच आले. व त्याचा त्रास तीनच दिवसात बरा झाला. गोसाव्याची भक्ती स्वामींच्या प्रति दृढ झाली.

या गोष्टीतून असा बोध मिळतो की, आपल्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामींना सांगा. स्वामी पूर्ण करण्यासाठी साथ आपली नक्कीच देतील. स्वामी ची भक्ती करा. भक्ती श्रद्धेने, विश्वासाने व आपुलकीने करा.

स्वामींच्या सेवेन चे सेवेकरी व्हा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तुम्हाला कोणतेही संकट येऊ देणार नाही. तुमच्या आडवे आलेले विघ्न दूर करतील. तुमच्या सर्व कामांमध्ये तुम्हाला यश देतील.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular