Wednesday, June 19, 2024
Homeआध्यात्मिकस्वामींचे आपल्याकडे कधीही दुर्लक्ष होत नाही.. परंतु अशा काही चूका ज्यामुळे स्वामींची...

स्वामींचे आपल्याकडे कधीही दुर्लक्ष होत नाही.. परंतु अशा काही चूका ज्यामुळे स्वामींची आपल्यावरील कृपादृष्टी कमी होत जाते.. बघा ‘हे’ संकेत.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो आपले स्वामी आपल्याला काही ना काही संकेत देत असतात. या संकेतवरून आपल्याला समजत असते की स्वामींचा आशिर्वाद आपल्यावर आहे की नाही. स्वामींच्या सेवेत आलेल्या प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामींच्या सेवेतून अनुभव नक्कीच येतो. म्हणतात ना ज्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतः हून तुमच्या जवळ येतात आणि हा निसर्गाचा नियम आहे.

म्हणून तुम्हाला जे हवे आहे त्याची तयारी करा. स्वामींचे नामस्मरण करा एकदा का तुम्ही तयार झालात की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावेच लागते. स्वामींच्या प्रत्येक सेवेकऱ्याला स्वामी कधी ना कधी स्वामी दर्शन देतातच. त्यांच्या स्वामी पाठीशी कायम उभे राहतात. खूप मोठे साहस मिळते.

जेव्हा या वाक्याची आठवण येते. “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.” स्वामींच्या नामस्मरणाने कितीतरी गोष्टी लगेचच घडून येतात. कोण कोण सेवेकरी म्हणतात आम्ही किती तरी दिवसापासून स्वामींची पूजा करतो. स्वामी कधीच का दिसत नाही.

कधीच का स्वामी आम्हाला दर्शन देत नाहीत आणि आमची इच्छा का अजून पूर्ण होत नाही. तर मित्रहो कधी कधी चांगल घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते. तुम्हालाही स्वामींचे संकेत आले असतील. हे संकेत कसे ओळखावे.

हे संकेत समजण्यासाठी आपल्याला स्वामींवर विश्वास असावा लागतो. ज्यांचा स्वामींवर अतूट विश्वास असतो त्या लोकांना स्वामींचा संकेत कळत असतो. आणि मित्रांनो स्वामींची नित्य सेवा करणाऱ्या भक्तांना वेगवेगळ्या रुपात वेगवेगळ्या प्रकारे मदत करत असतात.

परंतु हे सर्व संकेत प्रत्येकालाच ओळखता येत नाहीत. भक्त हो स्वामी महाराज आपल्या सेवेने खुश आहेत का नाहीत? आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचते की नाही? हे कसे ओळखावे? तर मित्रांनो अशा वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये गुरफटून न जाता आपण बघुया स्वामींचा आपल्यावर आशिर्वाद आहे की नाही?

ज्यावेळी आपण स्वामींची पूजा करत असतो. त्यांची पोथी वाचत असतो. नामस्मरण करत असतो. तेव्हा आपण पुजेमध्ये मग्न असताना तेव्हा अचानक सुगंध घरात दरवळला असा वास येत असेल तर समजून जावे की आपली पूजा स्वामींपर्यंत पोहचत आहे. आपल्यावर स्वामींचा आशिर्वाद आहे.

ते आपल्या अवतीभवती फिरत आहेत. दुसरा संकेत आहे स्वामी महाराज आपल्या स्वप्नात येतात. स्वामी महाराज आपल्या स्वप्नात आले तर समजून जा स्वामींचा खूप मोठा आशिर्वाद आहे. तुमच्या प्रत्येक हालचालींकडे स्वामींचे लक्ष आहे आणि स्वामी तुमच्यावर कोणतेही संकट येऊन देणार नाहीत.

तुम्ही खूप भाग्यवान आहात असे समजून जा कारण स्वप्नात का होईना स्वामींनी तुम्हाला दर्शन दिले आहे. हे नशीबवान आणि पुण्यवान लोकांच्या वाट्याला येत असते. मित्रांनो प्रत्येक वेळी तुम्हाला जर वाटत असेल की स्वामी आहेत. आणि पाठीशी होईल सगळे ठीक तेव्हा आपण जिद्दीने प्रत्येक गोष्टीला हसत खेळत सामोरे जातो..

तेव्हा ती शक्ती म्हणजेच स्वामींचा आशिर्वाद. तर मित्रांनो हे काही संकेत जर तुम्हाला येत असतील तर तुमच्या सोबत स्वामी आहेत हा विचार ठेवूनच तुम्ही कार्य करत राहावे आणि कोणतेही कार्य करत असताना घाबरून न जाता स्वामिंवर दृढ विश्वास ठेवावा.

तुम्हीच माझी सर्व कार्य मार्गी लावा असे म्हणून नमस्कार करावा. असे जे जे लोक करतात. त्यांची सर्व कामे निर्विघ्न पणे पार पडतात. स्वामी ज्या लोकांना हे संकेत देतात त्यांनी स्वतः ला खूपच नशीबवान समजावे.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular