Sunday, February 25, 2024
Homeआध्यात्मिकस्वामींची प्रचिती अनुभवायची असेल तर हा लेख संपूर्ण वाचा.. तुम्हांलाही प्रचिती आल्याशिवाय...

स्वामींची प्रचिती अनुभवायची असेल तर हा लेख संपूर्ण वाचा.. तुम्हांलाही प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.!!

नमस्कार मित्रांनो आमच्या मराठमोळ्या पेज वर तुमचं स्वागत आहे.!! श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामीप्रिय भक्तांचे मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्याबरोबर एक स्वामींचा अद्भुत अनुभव शेअर करणार आहे. हा अनुभव स्वामींच्या एका कल्याण येथे राहणाऱ्या भक्त ताईंनी शेअर केला आहे. त्या सांगतात की श्री स्वामी समर्थ हे ब्रम्हांडनायक आहेत आणि याची प्रचिती मला कायम येते.

मागच्या दोन वर्षांपूर्वी सांगलीमध्ये महापूर आला होता. सांगली माझे माहेर आहे पण त्या पुरामध्ये माझ्या घराची भिंत कोसळली, घरामध्ये पाच फूट पाणी होते, त्यामुळे घरातील सगळे सामान खराब झाले आणि त्यामध्ये माझे लग्नाचे आणि माझ्या मुलांचेही अल्बम खराब झाले. माझ्या मुलाचे कृष्ण रुपात आणि त्याला मुलीचा ड्रेस घालून फोटो काढले होते तेही खराब झाले. मला खूप वाईट वाटले सगळ्यात या घटनेसाठी, पण मला ते फोटो हवे होते.

मी विचार केला की ज्या फोटोग्राफरकडे फोटो काढले त्याच्याकडे फोटो असतील. त्याच्याकडून ते पुन्हा घ्यावे पण त्याच्या स्टुडिओला पण पाणी लागले होते. मी खूप प्रयत्न केला त्याच्याकडून फोटो मिळविण्याचा. त्याला विचारले तर तो म्हणाला फोटो नसतील कदाचित कारण ते 2015 मध्ये काढले होते. त्यांनी त्याच्याकडे आहे की नाही हे बघणे ही टाळले. मग मी स्वामींना प्रार्थना केली की स्वामी माझ्या मुलाचे फोटो मिळू दे आणि मी माझ्या भावाला त्याच्याकडे जायला सांगितले आणि म्हणाले की एकदा बघा फोटो आहेत का आणि ते फोटो त्याच्याकडे सेव होते.

माझ्या भावाने फोन केला की त्याच्याकडे फोटो सेव आहेत. मला खूप खूप आनंद झाला मी स्वामींचे मनापासून आभार मानले. स्वामी माझ्यासाठी माझे सर्वस्व आहेत पण अजून ते फोटो माझ्या हातात नाही आले कारण फोटो आहेत हे मला समजले पण माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते आणि कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे मी कल्याण वरून सांगलीला जाऊ नाही शकले पण मला माझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास आहे की माझ्याकडे तेवढी पैशांची जुळवणी पण होईल आणि ते फोटोही मला मिळतील कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि नंतर एक अल्बम घेण्यापुरते पैसे माझ्याकडे जमले आणि भावाला ते फोटो घेण्यासाठी पाठविले.

ऑनलाइन पैसेही ट्रान्सफर केले. कृष्णाच्या रूपात जे फोटो काढले तो अल्बम मिळाला पण तो फोटोग्राफर म्हणाला की मुलीचा ड्रेस घालून जे फोटो काढले ते मात्र नाही. मी त्यांना रिक्वेस्ट केली प्लीज असतील बघा पण ते नाही म्हणाले मी विचार केला स्वामी असे करणार नाहीत मला दोन्ही अल्बम मिळतील आणि आता दिवाळीलाच 2021 मध्ये मी सांगलीला जाऊ शकले. मी सांगलीला गेल्यावर त्या फोटोग्राफरकडे गेले. त्याला पुन्हा रिक्वेस्ट केली तुम्ही माझा दुसरा अल्बम शोधून बघा आहे का. वेळ लागला तरी चालेल मी थांबेल, तो नाहीच म्हणत होता.

पुन्हा तयार झाला, तो त्याच्या कॉम्प्युटरवर फोटो आहेत का ते बघू लागला पण 2015 पासूनचे बरेच फोटो डिलीट झाले होते. तो म्हणाला कदाचित फोटो नाहीत. मी स्वामींना प्रार्थना केली स्वामी प्लीज फोटो मिळू देत आणि एकदम त्या फोटोग्राफरला आठविले की ते सिलेक्टेड फोटोमध्ये असेल कारण 2015 मध्ये अल्बम घेतला होता आणि त्यामध्येच फोटो मिळाले आणि पैशांची पण जुळणी झाली जेव्हा फोटो नाहीत असे त्यांनी सांगितले तेव्हा मी स्वामींचे नामस्मरण चालू केले होते.

आणि स्क्रीनवर जेव्हा फोटो पाहिले तेव्हा माझ्या डोळ्यात पाणीच आले. माझे स्वामी कधीच कोणाला रिकाम्या हाताने पाठवत नाही. मी स्वामींचे मनापासून आभार मानले तुम्हाला वाटेल की काय फोटोसाठी मी स्वामींकडे प्रार्थना करते, पण त्याच्यामध्ये भावना गुंतलेल्या असतात आणि एकदा मुले मोठी झाली की पुन्हा त्यांचे ते रूप आपल्याला पाहायला मिळत नाही. माझ्या रोजच्या जीवनात मला स्वामींचे पदोपदी छोटे छोटे अनुभव येतात. असे वाटते की मला स्वामी दिसत नाही पण ते क्षणक्षण माझ्याच बरोबरच आहेत.

स्वामीप्रिय भक्तहो खरच आपले स्वामी अशक्य असणारी गोष्ट सहजच शक्य करतात. त्यांचं वाक्यच आहे.. अशक्य ही शक्य करतील स्वामी त्याप्रमाणे ते त्यांच्या भक्तांना पदोपदी असा अनुभव देतच असतात. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular