Sunday, June 23, 2024
Homeआध्यात्मिकस्वामींच्या भक्तांनी अवश्य करावे या नियमांचे पालन.. अन्यथा तुमची सेवा जाणार व्यर्थ..

स्वामींच्या भक्तांनी अवश्य करावे या नियमांचे पालन.. अन्यथा तुमची सेवा जाणार व्यर्थ..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! “श्री स्वामी समर्थ” स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला सेवेकरी कसा असावा.? याची संपूर्ण माहिती सांगणार आहे. तुम्ही पण स्वामींची सेवा करत असाल तर नक्कीच तुम्ही या गोष्टी पाळल्या पाहिजे. चला तर मग सुरवात करूयात. “कर्ता आणि करविता तुची एक समर्था। माझिया ठाई वार्ता मीपणाची नसेची”।। याप्रमाणे जीवन जगावे तेव्हाच स्वामी कृपा होते. जो स्वतःला सेवेकरी मानतो तो कधीही कळत नकळत दुसऱ्यांचे मन दुखावणार नाही, अशा गोष्टी तो करत असतो. स्वतः त्रास सहन करून दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम सेवेकरी करतो. कधीही कोणाला खाऊ घातलेले अथवा आर्थिक मदत केलेले वारंवार काढणे म्हणजे स्वतःच्या संपत्तीचा अहंकाराला आला आहे असे समजावे.

कधीही कोणालाही खाऊ घातलेल्या काढणे तसेच माझ्यामुळे त्याचे सर्व चांगले झाले आहे असे म्हणत राहणे आपण केलेल्या सर्व मदतीचे पुण्य कमी करणे होते. कधीही कोणालाही खाऊ घातले काढणे तसेच माझ्यामुळे त्याचे सर्व चांगले झाले आहे असे म्हणत राहणे म्हणजे आपण केलेल्या मदतीचे पुण्य कमी करणे होय.

केलेल्या मदतीची काहीतरी परतफेड मिळावी म्हणून अपेक्षा ठेवणे याला स्वार्थीपणा म्हणतात. तसेच एखाद्याला जाणून बुजून त्रास देणे अशा लोकांच्या पाठीशी कधीही स्वामी समर्थ नसतात असे समजावे.

अडचणीत सापडलेल्या गरजू व्यक्तींना तसेच अपंगांना मदत करणे हा सेवेकरी धर्म आहे. आपल्याकडून जी पण काही मदत होत असते ती स्वामीच आपल्याकडून करून घेत असतात. आपण केलेले कार्य स्वामींना समर्पित करणे म्हणजे निस्वार्थी भावनेने केलेले कार्य आपण समजले पाहिजेत.

आपण गरजूंना केलेल्या मदतीचा उल्लेख करणे अथवा ज्याला सहकार्य केले त्याच्याकडून स्वतःच्या स्तुतीची किंवा आपण एखाद्यावर फार मोठे उपकार केले आहे असे समजून घेणे म्हणजे स्वतःतील अहंकार वाढवल्याचे लक्षण होय.

कोणाचीही मस्करी करणे, कमी समजणे, त्याची निंदा नालस्ती करणे, सतत नाव ठेवणे, टाकून पाडून बोलणे हे सेवेकऱ्यांचे लक्षणे नसतात. लहानपणा पासून ते मोठ्या वृद्ध व्यक्ती पर्यंत प्रत्येका सोबत विनम्रतेने वागावे आणि त्यांचा आदर करावा ही सेवेकऱ्याची लक्षणे असतात.

ज्यावेळेस आपण कोणालाही केलेली मदत काढत असतो तसेच कोणाचीही मस्करी, निंदा करत असतो आपण केलेली सर्व सेवा त्या व्यक्तीकडे जात असते. आपण नंतर असे म्हणतो की आम्ही कितीही सेवा केली तरी आमची समस्या सुटत नाही. म्हणून स्वामींना तुमच्या सेवेबरोबर मन आणि चारित्र्य देखील समर्पित करा, आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करा.

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात म्हणून कोणाबद्दल ही खरी परिस्थिती न जाणता आपले चुकीचे मत गैरसमज आपणच स्वतःच्या मनात निर्माण करू नये. त्यामुळे आपण सतत द्वेशाच्या अग्नीत जळत असतो. याचा मानसिक तसेच शारीरिक त्रास स्वतःला त्रास करून घ्यावा लागतो.

आपण एकच गोष्ट लक्षात ठेवावी आपल्या पण अडचणीच्या काळात कधीतरी आपल्याला कोणीतरी मदत केली आहे आणि ती स्वामी मुळेच आपल्याला प्राप्त झाले आहे.

म्हणूनच आज आपण दुसऱ्या कोणाला तरी मदत करण्याच्या परिस्थितीत आहोत हे समजावे त्यामुळे आपण कधीही स्वतःत अहंकार निर्माण करू नये.वरील प्रमाणे सर्व स्वामी भक्तांनी, स्वामी सेवेकर्‍यांनी या गोष्टी पाळाव्यात. “श्री स्वामी समर्थ”

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही
प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular