Sunday, December 10, 2023
Homeआध्यात्मिकस्वामींच्या माहीती कोषानुसार आज स्वामींना अर्पण करा ही विशेष सेवा.!!

स्वामींच्या माहीती कोषानुसार आज स्वामींना अर्पण करा ही विशेष सेवा.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… अमावस्या प्रारंभ – दि. बुधवार 27 जुलै 2022, रोजी रात्री 09:12 मिनिटांनी व समाप्ती गुरुवारी रात्री 11:25 मिनिटांनी.

या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा. पाण्या त मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून सर्व यंत्र/वाहने, घर स्वच्छ करून, नारळ 7 वेळा उतारा करून फोडून (सोमवार असल्यास फोडू नये) फेकून देणे.

सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला (उटण्यासारखे) लाऊन गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अंघोळ करावी, जमल्यास नदी तीरावर अथवा तिर्थक्षेत्री पंचगव्य संपुर्ण अंगाला लावुन स्नान केल्यास अति उत्तम (पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लाऊ नये).

घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिव ळी (पांढरी) मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त “वल्गा सुक्त” म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती, करणी, भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते.

अमावास्येच्या दिवशी घराच्या आजुबाजुच्या सर्व देवी-देवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मानसन्मान करावा.

अमावास्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा, घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूल काढून नारळ उतारा करावा.

आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करुन व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू ,गोमूत्र व पंचगव्य टाकून (केंद्रातील उपलब्ध श्रीनिवासचे फ्लोअर क्लिनर/फिनेल पण चालेल) घर स्वच्छ पुसून घ्यावे..हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा.

आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरुन नारळ उतारा हा सात वेळा “श्री स्वामी समर्थ” मंत्र म्हणून करावा (उतारा करतांना वाहन हे जागेवर चालू ठेवावे) व नारळ जमिनी वर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गासूक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेऊन पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी.

घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना असोला नारळ, गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे. अमावास्येला आसोला नारळ, कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ 1 माळ, श्री दत्त महाराजांचा बीजमंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, काल भैरवाष्टक 11 वेळा, वल्गासूक्त 11 वेळा करावे, गोरक्ष चिंच, आसोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधावे, जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचराकुंडीत सोडावे.

आसोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे. त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा, आसोला नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा.

हिरण्यदान – अमावास्येच्या दिवशी 12 ते 12.30 वा. दरम्यान जानवे जोड, सव्वा पावशे पेढे, दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास दान देणे.

घरात शांतता राहण्यासाठी – 1 नारळ पूर्ण सोलून देवाज वळ ठेवावे. शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ- संध्याकाळ त्यावर एका नंतर एकेक असे 7 कापूर जाळावे. कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करावा.

दर पौर्णिमा व अमावास्येला नारळ बदलून घ्यावा. जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा. (नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावा) शक्यतो अमावास्येच्या दिवशी परान्न घेऊ नये. श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular