Friday, May 17, 2024
Homeआध्यात्मिकस्वामींच्या मूर्तीचं मुख कोणत्या दिशेला असावं.? स्वामींना गंध लावताना कुठल्या बोटाचा वापर...

स्वामींच्या मूर्तीचं मुख कोणत्या दिशेला असावं.? स्वामींना गंध लावताना कुठल्या बोटाचा वापर करावा.?

नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! प्रत्येक व्यक्ती आपल्या श्रद्धेनुसार पूजा करतो. प्रत्येक व्यक्तीला दररोज मंदिरात जाऊन पूजा करणे शक्य होत नाही. म्हणूनच लोक आपल्या घरात एक छोटेसे मंदिर बांधतात आणि त्यात आपल्या देवी-देवतांच्या मूर्ती बसवतात.

मूर्तीची प्रतिष्ठापना करताना अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न पडतो की, भगवंताचे मुख कोणत्या दिशेला असावे, जेणेकरून भक्तांना पूजा केल्याचे उत्तम फळ मिळते. आज या लेखात आम्ही स्वामींच्या मुर्तीचे, तसेच इतर देवी-देवतांचे मुख कोणत्या दिशेला असावे याची माहिती देणार आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

देवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना देवाच्या मुखाच्या दिशेकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. बरेच लोक याला महत्त्व देत नाहीत आणि देवाचे तोंड कोणत्याही दिशेने वळवतात. देवाच्या मूर्तीचे तोंड म्हणजे स्वामी समर्थांच्या मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असावे? मूर्ती फुटलेली असेल तर तिची पूजा करावी का? स्वतःला गंध लावताना तो कोणत्या बोटाने लावावा? स्वामींना गंध लावताना कोणते बोट वापरावे? समईतील ज्योतीची दिशा कोणती असावी? समईत किती ज्योत असाव्यात? हे प्रश्न तुम्हाला देखील पडले असतील.

स्वामींच्या मूर्तीचे मुख कोणत्या दिशेने असावे? – आपल्या देवघरामध्ये ज्या मूर्ती आपण ठेवत असतो त्या देवतांच्या मूर्तीचे तोंड तुम्ही कोणत्या दिशेला ठेवता. उदाहरणार्थ स्वामींच्या मूर्तीचे तोंड तुम्ही कोणत्या दिशेला ठेवता? याकडे लक्ष दिले पाहिजे. दक्षिण दिशा ही काळजीपूर्वक आपण टाळली पाहिजे दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा समजली जाते प्रत्यक्ष यमराज यांची ही दिशा आहे आणि म्हणून दक्षिणेकडे देवांच्या मूर्तीचे तोंड नसावं.

पूर्व ही उगवत्या सूर्याची आणि भगवान इंद्राची दिशा आहे म्हणून पूर्वेकडे तोंड करून प्रार्थना केल्याने सौभाग्य आणि वृद्धी होते. पश्चिमेकडे तोंड करून प्रार्थना केल्याने संपत्ती आकर्षित होण्यास मदत होते. उत्तरेकडे तोंड केल्याने योग्य संधी आणि सकारात्मकता आकर्षित करण्यास मदत करते. वास्तूनुसार मंदिराच्या दिशेनुसार, प्रार्थना करताना दक्षिणेकडे तोंड न करणे चांगले. त्यामुळे घरातील मंदिराच्या मुखाची दिशा दक्षिणेशिवाय काहीही असू शकते.

दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा देवपूजा करता तेव्हा संपूर्ण एकाग्रतेने देवपूजा करा तुमच्या घरात जर लहान मुले असतील आणि पूजा करत असताना व्यत्यय घालत असतील तर काळजी करू नका. लहान मुले ही देवासमान असतात लहान मुलांना मुळे देवपूजेमध्ये आलेला अडथळा हा देवांना सुद्धा मान्य असतो मात्र आपली एकाग्रता खंड पावणार नाही याची काळजी घ्या पूर्ण श्रद्धेने देव पूजा करा.

खंडीत मूर्तीची पूजा करावी का? – जेव्हा जेव्हा घरातील, आपल्या देवघरातील एखादी देवीची किंवा देवतेची मूर्ती तुटेल- फुटेल म्हणजेच खंडीत होईल, तेव्हा त्या मूर्तीची पूजा चुकूनही करु नका. तरी काय अनेक लोक या मूर्तींना कचऱ्यामध्ये टाकून देतात. किंवा रस्त्यावर ती चौकात टाकून देतात. अशाप्रकारे फुटलेल्या भंग झालेल्या मूर्ती चुकूनही आपण कचऱ्यात टाकू नका. हिंदू धर्मशास्त्र सांगते की, ज्या मुर्त्या तुटलेल्या, फुटलेल्या आहेत अशा मूर्तींची पूजा करू नका जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर या तुटल्या-फुटलेल्या मुर्त्या आपण वाहत्या पाण्यात विसर्जित कराव्यात वाहतं पाणी आपल्या भागात नसेल तर या मुर्त्या तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा ठेवू शकता. अथवा गुरुजींकडून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून घेऊन एखादा जलाशयांमध्ये त्याचे विसर्जन करा.

स्वामींना गंध लावताना कोणते बोट वापरावे? – आपण स्वतः गंध लावत असताना मधले बोट म्हणजे सर्वात मोठे जे बोट असते त्या बोटाने आपण स्वतःला गंध लावावा आणि देवाला गंध लावत असताना करंगळीच्या शेजारचे बोट आहे त्या बोटाने देवाला गंध लावा. तसेच, श्रीफळ म्हणजे नारळ या नारळाला शेंडी अवश्य ठेवावी ते श्रीफळ जेव्हा तुम्ही देवाकडे तोंड करून ठेवलं तेव्हा त्याची शेंडी देवाकडे असावी आणि नारळ फोडताना सुद्धा शेंडी देवाकडे ठेवूनच नारळ फोडावा. टोपी घालून कधीही देवाला नमस्कार करू नये. टोपी काढूनच देवाला नमस्कार करावा अंगावर कपडे नसताना देव पूजा करू नये.

समईतील ज्योतीची दिशा कोणती असावी? समईत किती ज्योत असाव्यात? – मंदिर वास्तूनुसार, दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. पूजा करणार्‍या व्यक्तीच्या उजव्या बाजूला दिव्याची जागा असावी. जर कोणी दीर्घ कालावधीसाठी दिवा पेटवत असेल तर काचेने झाकलेला दिवा निवडणे अधिक सुरक्षित आहे. तुम्ही कापूर, दिवा किंवा अगरबत्ती लावताना अग्निसुरक्षा खबरदारीचा विचार करा.

नेहमी दिव्यांच्या आत कापसाच्या वाती वापरा. समई मधल्या ज्योती/ वाती, त्यांची संख्या तुम्ही एक घेऊ शकता तीन ठेवू शकता किंवा पाच ठेऊ शकता. विषम संख्या मध्ये या ज्योती लावल्या जातात सोबतच या ज्योतीची दिशा दक्षिणेकडे नसावी म्हणजे ही ज्योत आपण दक्षिण दिशेला लावू नये. वास्तूनुसार, दिवा कधीही दक्षिणेकडे ठेवू नका, कारण त्यमुळे संपत्तीचा निचरा होतो असे म्हटले जाते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular