नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत.! मित्रांनो, स्वामी समर्थांची आपण मनोभावे आणि श्रद्धेने पूजा सेवा करीत असतो. आपला स्वामींवर विश्वास देखील असतो की, स्वामी आपल्या पाठीशी कायम आणि आपल्याला अडचणीतून देखील बाहेर काढतात. तुम्हाला अशी काही आज मी माहिती सांगणार आहे जी तुम्हाला माहिती नसेल.
तर मित्रांनो स्वामींच्या समोर रडल्याने काय होते कोणता चमत्कार होतो याविषयीचीच आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो पूजा करताना तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तसेच स्वामी समोर बसल्याने देखील आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू येत असतील तर यामुळे नेमका कोणता चमत्कार घडणार आहे हेच आज आपण जाणून घेऊयात.
तर मित्रांनो प्राचीन ग्रंथानुसार सुरुवातीला हे ब्रम्हांड रिकामच होतं. सगळीकडे अंधारच होता आणि त्यावेळेस शिवलिंग प्रकट झाले आणि यामुळे हे सर्व ब्रम्हांड आहे हे ऊर्जेने भरलेले सर्वांना मिळाले. मग काही कालावधीनंतरच या ब्रह्मांडामध्ये अनेक पद्धतीची निर्मिती झाली. ज्यात पाणी, धातू, वायू, अग्नी यासारख्या गोष्टींची निर्मिती झाली.
तर मित्रांनो अशी मान्यता आहे की, या सर्व निर्मितीमध्ये शिवशंकरांचा निवास आहे. म्हणजे या सगळ्या ब्रम्हांडात जी काही ऊर्जा आहे हे शिवच आहेत. शिव हे आधी आहेत आणि शिव हे अंत आहेत. जेव्हा तुम्ही ईश्वराचे ध्यान करायला बसता तेव्हा तुमचा आत्मा ईश्वराशी जोडला जातो.
ईश्वर सर्वव्यापी आहेत. सजीव असो किंवा निर्जीव सर्वच ठिकाणी ईश्वराचा वास आहे. त्यामुळेच आपल्या आत्म्याचा ईश्वराशी संबंध जोडला गेलेला आहे. तेव्हा ईश्वर म्हणजेच देव आपणाला काही संकेत देत असतात. मित्रांनो हे जे संकेत असतात हे साधे साधे संकेत आहेत आणि याकडे आपण दुर्लक्ष देखील करीत असतो.
तर मित्रांनो परमात्मा आहे हा सर्व जीवजंतूंशी जोडला गेलेला आहे आणि मग जेव्हा आपण पूजा किंवा ध्यान करत बसतो त्यावेळेला आपल्या आजूबाजूचे जे वातावरण असते ते सकारात्मक ऊर्जेने भरून जाते. आपले मन देखील यावेळेस खूपच प्रसन्न होते. यावेळेस जे काही दुःखाचे वातावरण आहे ते देखील आनंदामध्ये भरून जाते.
तसेच जर आपण एखाद्या अडचणीत असो किंवा एखाद्या विचारांमध्ये असो, तणावांमध्ये असो तर या वेळेस देखील आपणाला ताजेतवाने वाटायला लागते. कारण आपण ईश्वराच्या सानिध्यात आलेलो असतो. या सकारात्मक शक्तींचा प्रभावच असा असतो कि किती तरी वेळेला विद्यार्थी अभ्यासाला बसताना माता सरस्वतीचे स्मरण करत त्यांच्या डोळ्यांत पाणी येते.
याचा अर्थ असा आहे कि माता सरस्वतीची कृपा त्यांच्यावर झालेली आहे. तसेच आपण देवांशी निगडित काही कथा ऐकत असतो. तेव्हा आपल्या शरीरावर काटा उभा राहतो. तसेच आपल्या डोळ्यांमध्ये देखील पाणी येते. तर मित्रांनो जर तुम्ही ध्यान मग्न होऊन स्वामींची प्रार्थना करत असाल किंवा अनेक इतर देवी-देवतांच्या तुम्ही प्रार्थना करत असाल आणि त्यावेळी जर तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी आले तर हा ईश्वराचा संकेत आहे.
त्यावेळेस तुम्ही तुमच्या मनातील इच्छा, मनोकामना देवापुढे बोलायची आहे. ती नक्की पूर्ण होते. जर तुमच्या घरातील ज्योत अचानक मोठी होत असेल तर अशी मान्यता आहे कि त्यात भगवान शिव शंकरांचा वास आहे. पूजा करताना ज्योत मोठी झाली तर ईश्वर तुमच्यावर प्रसन्न आहे असं समजावं.
तसेच मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये पूजा करताना धूप लावतो आणि या धूप लावलेल्याचा धूर जर देवाकडे जात असेल तर या मागचा देखील संकेत असा आहे की तुम्ही जी पूजा केलेली आहे ही पूजा ईश्वराने कबूल केलेली आहे. पूजा करताना वाहिलेले फुल पडले तर ते शुभ मानले जाते.
सकाळच्या वेळी जर दारावर गाय आली तर गाईला खाऊ घाला. पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने हात जोडून गोमातेसमोर इच्छा मागा. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. तर मित्रांनो तुम्ही देखील स्वामींची सेवा करत असाल, स्वामींची पूजा करताना, स्वामींसमोर बसल्यानंतर तुमच्याजवळ डोळ्यामध्ये पाणी आले तर तुम्ही लगेचच त्यावेळेस आपल्या मनातील इच्छा ही स्वामी समोर बोलायची आहे.
व्यक्त करायचे आहे. ज्यामुळे तुमची ती मनोकामना, इच्छा स्वामी पूर्ण करतील. तसेच घरातील तुम्ही देवपूजा जरी करत असाल आणि त्यावेळेस देखील प्रार्थना करत असताना तुमच्या डोळ्यातून पाणी आले तर त्यावेळेस त्या देवी देवतांसमोर तुम्ही आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायचे आहे. कारण ती इच्छा आपली पूर्ण होणार आहे.
टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!