Monday, June 10, 2024
Homeआध्यात्मिकस्वामींनी संकेत दिला आणि.. चाळीस जिवांचे प्राण वाचले.!!

स्वामींनी संकेत दिला आणि.. चाळीस जिवांचे प्राण वाचले.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! श्री स्वामी समर्थ. हा अनुभव आहे श्री रंजन तीलवे यांचा. ते म्हणतात मला हा आलेला अनुभव 1977 साल मधला आहे. मी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये अभियंता म्हणून नोकरी करत होतो. माझी नेमणूक तेव्हा चाकण शाखा कार्यालय येथे झाली होती. दर गुरुवारी एचडी लाईन बंद करून काम करायचे असायचे.

अशाच एका गुरुवारी माझ्या हाताखालच्या लाईन मधल्या चार जणांना चार हाय टेन्शन लाईनवर लाईन बंद करण्याचा परवाना घ्यायला सांगितले व काम सुरू करण्याबाबत सूचना दिल्या. या चार लाईन मध्ये एक श्री आरुडे हे दोन महिन्यापूर्वीच हजर झाल्याने त्यांच्यासोबत जाऊन लाईन बंद करण्याचा परवाना घेतला व त्यांना चाकण तळेगाव रस्त्यावर असलेल्या पथेच्या फोरजी या कंपनीमध्ये थांबायला सांगितले व तेथील वॉचमनला त्याप्रमाणे कल्पना दिली.

तसेच श्री आरुडे यांना सांगितले की मी येईपर्यंत इथून हलायचे नाही. त्यानंतर मी माझी जीप घेऊन इतर ठिकाणी चाललेला कामांवर देखरेख करण्यासाठी निघून गेलो. संध्याकाळी साडेचार वाजता मी ज्या ठिकाणी कामाची देखरे करत होतो त्या ठिकाणी एका कॉन्ट्रॅक्टरचे चाळीस कामगार लाईनवर काम करत होते व हे सर्व कामगार ज्या लाईन वर काम करत होते त्या लाईन बंद करण्याचा परवाना श्री आरोडे यांच्या नावे होता.

त्या ठिकाणी काम चालू असताना माझ्या डोक्यात आणि संपूर्ण अंगाला एक वेगळाच प्रकारची संवेदना झाली आणि मी 40 कामगार ज्या ठिकाणी काम करत होते त्या दिशेने खाली उतरा मराल खाली उतरा मराल असे ओरडत पळत सुटलो. माझ्याबरोबरचे कर्मचारी सुद्धा माझ्याबरोबर पळत होते. माझे ओरडणे ऐकून काम करणारे सर्व चाळीस कर्मचारी पोलवरून खाली उतरले.

त्यात कोणाला खरचटले, कोणाला लागलं तर माझ्यासोबत असलेल्या माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या श्री सांडभोर यांनी मला धरले आणि म्हणाले की काय करताय. सर्व 40 कामगार खाली उतरले आहेत याची खात्री केल्यावर माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना जीपमध्ये घेऊन श्री आरोडे यांना थांबवलेलं ठिकाणी म्हणजे पथेच्या फोरजी येथे गेलो. जीपमधून उडी मारून मी केबिन कडे पळत गेलो व श्री आरुडे यांची चौकशी केली.

वॉचमन सोबत सांगितले की अर्ध्या तासापूर्वी ते परवाना देऊन गेले आहेत. केबिनमध्ये असलेल्या फोन मध्ये लोकल कॉल ची सुविधा होती त्या फोनवरून चाकण उपकेंद्राला फोन लावला पण तेथील ऑपरेटरने फोन उचलला नाही परत फोन लावल्यावर फोन घेतला गेला व त्या ऑपरेटरला विचारले की फोन घेण्यास वेळ का लागला. त्यांनी सांगितले की श्री आरुडे यांनी परवाना परत करून लाईन चालू करण्यास सांगितले व त्याप्रमाणे लाईनचे आयसोलेटस करण्यासाठी गेलो होतो त्यामुळे फोन घेतला गेला नाही व फीडर चालू करण्यासाठी परत गेलो तेवढ्यात फोन वाजला मग फोन घेतला.

माझ्या हातून फोन निसटला, पायाचे बळच निघून गेले. ही घटना माझ्या सहकाऱ्यांना समजल्यावर ते थक्क झाले तेथून आम्ही सर्वजण चाकण उपकेंद्रात गेलो तिथे श्री आरुडे हे होतेच त्यांना विचारल्यावर ते म्हणाले की मला कंटाळा आला म्हणून लाईन चालू करून घरी निघालो होतो. मला स्वामींच्या कृपेने संवेदन झाल्याने होणारा अपघात टाळला व चाळीस जणांचे प्राण वाचले तर अशाप्रकारे स्वामींनी संकेत देऊन 40 जणांचे प्राण वाचवले. श्री स्वामी समर्थ.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular