Sunday, April 21, 2024
Homeआध्यात्मिकस्वामी म्हणतात.. माता लक्ष्मींचा आशीर्वाद लाभण्यासाठी.. या दिवशी हाताच्या मुठीत पाच मिनिट...

स्वामी म्हणतात.. माता लक्ष्मींचा आशीर्वाद लाभण्यासाठी.. या दिवशी हाताच्या मुठीत पाच मिनिट मीठ ठेवा.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आपल्यापैकी काहीजण हे स्वामींचे भक्त आहेत. ते अगदी मनोभावे व श्रद्धेने स्वामींची पूजा करीत असतात. त्यांचा स्वामीवर पुरेपूर विश्वास असतो. आज आपण स्वामींचा असाच एक उपाय पाहणार आहोत जेणेकरून तुमच्या घरात पैसा कायम राहील.

मित्रांनो मीठाला आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मीठाशिवाय अन्नाला चव येत नाही. मिठाचे अनेक आपण टोटके देखील पाहिले आहेत. उपाय देखील आपण केलेले आहेत की मीठ काचेच्या भांड्यामध्ये ठेवावे तसेच मीठाचा अशा पद्धतीने वापर केल्यावर हा फायदा होईल. ते मीठ कसे वापरावे अशी अनेक माहिती जाणून घेतलेली आहे.

परंतु आज मी जो काही उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही कधीच ऐकला नसेल. आज कालच्या धावपळीच्या युगात लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांच्या घरात पैसा असून देखील तो पैसा घरखर्चासाठी अपुरा पडतो. त्यासाठी लोक हतबल होऊन नैराश्य मध्ये जगत राहतात. त्यामुळे अनेक आजारांना त्यांना सामोरे जावे लागते. अनेक अडचणींनी त्रस्त झालेले हे लोक कोणताही उपाय करण्यास तयार होत नाहीत.

मित्रांनो, आपल्या घरात वास्तुदोष, ग्रहदोष यावर मिठाचा खूप चांगला उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. जेणेकरून तुमच्या सर्व अडचणी दूर होऊन पैशाची बरकत राहील. अनेक समस्यांमुळे आपले मन विचलित होत असेल तर ही मण विचलित न होण्यापासून हा उपाय फायदेशीर ठरतो. तसेच अनेक विचार आपल्या डोक्यात कायम येत राहतात या विचारांमुळे आपणाला झोप लागत नाही. तर हा उपाय केल्यामुळे तुम्हाला झोप देखील लागेल व या विचारांपासून, समस्यांपासून सुटका होईल.

मित्रांनो, तुम्हाला यासाठी मुठीत जेवढे मीठ मावेल तेवढे मीठ तुम्हाला घ्यायचे आहे. आपल्या दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये हे मीठ ठेवायचे आहे. हा उपाय तुम्हाला सोमवार, बुधवार किंवा शुक्रवारपासून सुरू करायचे आहे म्हणजेच सलग तीन दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे. जर तुम्ही शुक्रवारपासून हा उपाय करण्यास सुरुवात केली तर शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस सलग तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर मित्रांनो जेवढे आपल्या हाताच्या मुठीमध्ये मीठ मावेल तेवढे मीठ तुम्हाला दोन्ही हाताच्या ओंजळीत मध्ये घ्यायचे आहे.

हे मीठ कोणालाही दिसता कामा नये. हे मीठ घेतल्यानंतर तुम्हाला ज्या काही अडचणी येत असतील, नकारात्मकता आपल्या घरात असेल ती सर्व निघून जाण्यासाठी प्रार्थना करायची आहे म्हणजेच घरातील नकारात्मकता, तुमच्या काही समस्या असतील त्या सर्व समस्या त्या मिठामध्ये प्रवेश करतात. त्या सर्व समस्या दूर होतील.

हे मीठ घेतल्यानंतर तुम्हाला आपल्या कुलदेवतेचे किंवा लक्ष्मी मातेचे, गणेशांचे किंवा श्री स्वामी समर्थांचे चिंतन, नामस्मरण करायचे आहे. मनोभावे व श्रद्धेने हा उपाय केल्याने तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या सर्व अडीअडचणी तसेच पैसा जर टिकून राहत नसेल तर पैसा टिकून राहण्यास मदत होईल. परंतु हा उपाय तुम्हाला सलग तीन दिवस करत रहायचं आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular