Sunday, June 23, 2024
Homeआध्यात्मिकबाभळीचा एक काटा इथे प्रवाहित करा… व्यापार धंद्यात असलेलं बंधन संपून जाईल.!!

बाभळीचा एक काटा इथे प्रवाहित करा… व्यापार धंद्यात असलेलं बंधन संपून जाईल.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो संक्रांत अशुभ असते ही केवळ एक चुकीची समजूत आहे आणि ती लोकांना घाबरवण्यासाठी पसरवण्यात आलेली आहे. मात्र मित्रांनो संक्रांत हे एक प्रकाश पर्व आहे. या दिवसाचे आणखीन एक महत्त्व म्हणजे या दिवशी सूर्य आपल्या मुलाच्या म्हणजेच शनीच्या राशीत प्रवेश करतो. संपूर्ण विश्वामध्ये केवळ सनातन संस्कृती अशी आहे की ज्यामध्ये धर्म आणि विज्ञान यामध्ये संघर्ष नाही उलट विज्ञानाचा जन्म धर्मातून झालेला आहे. गणित हे वेदांतून आले म्हणून वेदिक गणित. औषध विज्ञान वेदांतून आले म्हणून आयुर्वेद. ग्रहांची गती स्थिती नक्षत्रांची माहिती ही सिद्धांत आणि संहिता या ज्योतिषीय विषयातून कळते.

इतर देशांमध्ये ज्याप्रमाणे धर्म आणि विज्ञान एकमेकांच्या विरोधात असतात तसे सनातन संस्कृतीचे नाही. तर मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी काही खास उपाय पुण्यकाळात आपण केले तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो. संक्रांतीला समुद्रात किंवा नदीमध्ये स्नान करावे. या दिवशी तीळ मिश्रित पाण्याने अंघोळ करावी, तिळाचे उटणे लावावे, तिळाचा होम करावा, तीळ अर्पण करावेत, तिळाचे सेवन करावेत, सूर्याची मनोभावे पूजा करावी. देवाला तांदूळ आणि तीळ व्हावेत, खिचडी, गुळ पोळीचा नैवेद्य दाखवावा.

पुण्यकाळात पुढील उपाय आपण करू शकता. मित्रांनो बऱ्याच वेळेला असे होते की आपल्या जागेवर दुसराच कोणीतरी कब्जा करून बसतो अशावेळी शमीची पाच आणि बेलाची 11 पाने सूर्याकडे पहात सूर्यावरून सात वेळेला फिरवून शंकराच्या पिंडीवर अर्पण करावी. त्यातील एक शमीचे पान आणि एक बेलाचे पान त्या आपल्या जागेवर नेऊन टाकावे. ज्या व्यक्तीने अवैध कब्जा केला आहे ती व्यक्ती जागा सोडून जाते असा अनुभव आहे.

तसेच मित्रांनो जर का आपल्या घरातील सदस्यांचे एकमेकांबरोबर पटत नसेल. नवरा बायको मध्ये भांडणे होत असतील भावा भावांमध्ये मतभेद आले असेल सासू आणि सुनेचे लहान-सहान गोष्टीवर ही भांडण होत असेल तर अशा वेळेला पाण्यामध्ये काळे तीळ आणि हळद घालून ते पाणी शिवलिंगावर अर्पण करावे. हे करताना ज्यांच्यामध्ये भांडणे आहेत त्यांची नावे घ्यावीत या उपायामुळे आपल्या घरातील कुटुंबांमध्ये आपापसातील मतभेद दूर होऊन एकोपा निर्माण होईल.

तसेच मित्रांनो काही वेळा व्यापार बंधन केले जाते. चार दिवस आपला व्यापार उद्योग व्यवसाय किंवा आपले दुकान उत्तम चालते व आठ दिवस बिलकुल चालत नसेल तर अशावेळी बाभळीचा एक काटा थोडे काळे तीळ आणि थोडे पांढरे तीळ दुकानावरून किंवा आपल्या उद्योग व्यवसाय व्यापाराच्या जागेवरून 21 वेळा उतरवावे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करावे यामुळे आपल्या उद्योग व्यवसाय धंद्यावर किंवा आपल्या दुकानावर केलेले व्यापार बंधन समाप्त होऊन जाईल. तर मित्रांनो मकर संक्रातीच्या दिवशी आपण उपाय अवश्य करून पहा.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular