Saturday, June 8, 2024
Homeआध्यात्मिकअसे आठ लोक ज्यांच्यावर हनुमान जी.. कायम नाराजच असतात.!!

असे आठ लोक ज्यांच्यावर हनुमान जी.. कायम नाराजच असतात.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, हनुमान हे कलीयुगातील एक असे देवता आहेत जे आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी त्वरित पोहोचतात. आपल्या भक्तांची सारी संकटे दूर करणारे हनुमान अष्टसिद्धीचे स्वामी आहेत. ते आपल्या भक्तांची प्रत्येक इछा पूर्ण करतात. जे भक्त रोज “हनुमान चालीसा” याचा पाठ करतात व श्रीरामाच्या नावाचा जप करतात त्यांच्या जीवनावर कधीही वाईट किंवा असुरी शक्तींचा प्रभाव होत नाही आणि मित्रांनो, हनुमानजी चिरंजीवी आहेत. त्यांना प्रभू श्रीरामाने कलियुगाच्या अंतापर्यंत मृत्युलोकात निवास करण्याचे वरदान दिलेले आहे.

आणि म्हणूनच मित्रांनो हनुमान आज पण आपल्या पूर्ण स्वरूपासकट पृथ्वीवर आहेत व यांची काही उदाहरणे आपल्याला बघावयास मिळतात. हनुमानजीनी साक्षात आपल्या काही भक्तांना दर्शन पण दिलेले आहे. आज पण असे मानले जाते, की ज्या स्थानी नियमित श्रीरामकथेचा पाठ केला जातो, ती कथा ऐकण्यासाठी हनुमानजी अवश्य येतात आणि हनुमानजी ज्याप्रमाणे आपल्या भक्तांची रक्षा करतात त्याचप्रमाणे ते दुष्टाना शिक्षा पण देतात. प्राचीन धर्मग्रंथानुसार काही कामे अशी आहेत जी केल्यामुळे व्यक्ति हनुमानाच्या कृपेपासून वंचित राहातो.

आणि त्यांना कलीयुगातील पापी मनुष्य मानले गेले आहे. जर कोणी स्त्री किंवा पुरुष असे काम करतो, तर तो हनुमानाला कधीच प्रसन्न करू शकत नाही. अशा व्यक्तिला हनुमानजी शिक्षेला पात्र अशी व्यक्ति मानतात आणि ज्या घरातील सदस्य असे काम करतात अशा घरात माता लक्ष्मीचा निवास होत नाही व हनुमानजी त्यांच्या वर कधीही कृपा करीत नाहीत या कार्यांसंबंधी अंगधने भर सभेत रावणाला सांगितले होते, या सगळ्या पापांमुळेच हनुमानजी यांनी लंका सोडण्यापूर्वी तिला नष्ट केले होते आणि त्यामुळे ज्या घरात अशी कामे होतात, त्या स्थानावरून हनुमानजी निघून जातात व अशा घरात राहाणार्‍या लोकांवर
नेहमी दुर्भाग्य व दारिद्र्य येते.

मित्रांनो सगळ्यात पहिले, ज्या घरातील लोकांचे कोणतेही आराध्य नाही, ज्यांचा कोणत्याही देवावर विश्वास नाही, ईश्वराचा अपमान ज्या घरात केला जातो, अशा घरात राहाणार्‍या लोकांवर हनुमानजी कधीच कृपा करत नाहीत. ज्या स्थानी श्रीरामाचा अपमान केला जातो, अशा दुष्ट लोकांना शिक्षेस पात्र समजले जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जिथे मांस, दारू याचे सेवन नियमित केले जाते. शास्त्रानुसार, ज्या घरातील लोक रोजचं मांसाचे सेवन करतात किंवा दारूचे सेवन करतात, अशा लोकांना कधीच हनुमानजींची कृपादृष्टी लाभत नाही. असे लोक कायम दरिद्री राहातात.

तिसरी गोष्ट म्हणजे ज्या घरात महिलांचा अपमान होतो, त्यांच्याशी गैरवर्तन केले जाते, जिथे पुरुष आपली मर्दुमकी दाखविण्यासाठी महिलांवर हात उगारतात किंवा रोज त्यांना मारपीट करतात, अशा व्यक्तिला हनुमानजी शिक्षेस पात्र समजतात. मृत्यूनंतर हे लोक नरकात जातात, पण आपल्या कर्माची शिक्षा ते मृत्यूलोकात पण भोगत असतात आणि चौथी गोष्ट म्हणजे परिवारात एकता नसणे. ज्या घरात रहाणार्‍या सदस्यांमध्ये एकता नसेल, भाऊ बहीण यांच्यामध्ये सदैव भांडणे होत असतील, अशा घरात राहाणारे लोक कधीच सुखी होऊ शकत नाहीत व हनुमानजी त्यांच्यावर कधीच कृपा करत नाहीत.

पाचवी गोष्ट ज्या घरात सदैव कचरा असेल, अस्वछता असेल, किंवा ज्या घरात राहाणारे लोक सदैव निंदा करत असतील, अशा घरात माता लक्ष्मी निवास करीत नाही, दारिद्र्य त्याच्या घरात निवास करते आणि सहावी गोष्ट म्हणजे प्राण्यांची हत्या- ज्या घरात मुक्या प्राण्यांची हत्या होत असेल, अशा घरात राहाणार्‍या लोकांवर हनुमानजी नाराज होतात व त्यांना शिक्षेस पात्र मानतात. सातवी गोष्ट म्हणजे संतांचा अपमान ज्या घरात होतो, त्यांच्यावर हनुमानजी नाराज होतात आणि आठवी गोष्ट म्हणजे जे लोक चरित्रहीन असतात, जे परक्या स्त्रीवर वाईट नजर ठेवतात, अशा घरातील व्यक्तींवर हनुमानजी कधीच कृपा करीत नाहीत.

टिप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular