Wednesday, June 12, 2024
Homeआध्यात्मिकया नवरात्रात माता जगदंबेला चुकून पण या 3 वस्तू अर्पण करू नका.....

या नवरात्रात माता जगदंबेला चुकून पण या 3 वस्तू अर्पण करू नका.. स्वतःहून गरिबी ओढवून घ्याल.!!

नमस्कार मित्रांनो.. स्वागत आहे तुमच आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो पितृपक्ष समाप्तीनंतर माता दुर्गा देवींच्या आगमनाची ओढ सर्वांनाच लागलेली असते. आश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हटले जाते. नवरात्रीचा हा काळ देवी दुर्गा मातेच्या उपासनेचा, व्रताचा व पूजनाचा असतो. तसेच माता दुर्गांची उपासना करण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो. असे मानले जाते की देवी नवरात्र काळात साक्षात पृथ्वीवर प्रकट झालेली असते. म्हणून जर नवरात्र काळात आपण देवी आईचे मनोभावे पूजन केले तर देवीची कृपा आपल्यावर खूप लवकर होते. देवीचे पूजन आणि उपासना करण्याचे काही नियम आहेत. आपण देवीचे पूजन करतो परंतु आपल्याला माता दुर्गांच्या पूजनाची विशिष्ट पद्धत माहीत नसल्याने आपल्या पूजनाचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही.

तसेच अशा काही वस्तू आहेत ज्यांचा वापर देवी आईच्या पूजनाच्या दरम्यान अजिबात करू नये, नाहीतर माता दुर्गांचा आशीर्वाद न मिळता आपल्याला माता दुर्गांच्या क्रोधाचा सामना करावा लागू शकतो. नवरात्र काळात आईच्या नऊ वेगवेगळ्या स्वरूपाचे पूजन केले जाते आणि देवीच्या स्वरूपाप्रमाणे देवीला नैवेद्य अर्पण केला जातो. देवी दुर्गा साक्षात भक्ताच्या घरी प्रगट झालेली असते म्हणून आपण देवी दुर्गांना प्रसन्न करून घेण्यासाठी विविध उपाय करीत असतो.

देवी दुर्गांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण विविध प्रकारच्या वस्तू देवींना अर्पण करतो. परंतु काही अशा वस्तू आहेत त्या देवी दुर्गांना अजिबात अर्पण करू नयेत. नाहीतर देवी दुर्गांच्या कृपे ऐवजी त्यांच्या क्रोधाचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. चला तर आता आपण जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वस्तू.‌.

मित्रांनो सर्वात पहिली वस्तू म्हणजे नारळ. हिंदू धर्मात नारळाला खूप महत्त्व आहे. नारळाला शुभता व समृद्धीचे प्रतीक मानले जाते. नारळाला श्रीफळ असे देखील म्हटले जाते. प्रत्येक शुभ कार्यात नारळाचा आवर्जून वापर केला जातो. मंगल समयी कलश मांडला जातो. कोणतेही शुभ मंगल कार्य नारळाशिवाय पूर्ण होत नाही. देवीच्या पूजनात सुद्धा नारळाचे फार महत्त्व आहे. परंतु नवरात्र दरम्यान नारळाचा वापर करताना आपण काही चुका करून बसतो. मित्रानो नारळ हे तीन प्रकारचे असतात. एक ओले हिरवे नारळ ज्याचा वापर नारळ पाणी पिण्यासाठी केला जातो. दुसरे म्हणजे तेच नारळ पक्के झाले की त्यात खोबरे तयार होते व आता पाणी देखील राहते.

जे पूजनासाठी वापरले जाते आणि तिसरे म्हणजे कोरडे नारळ जे घरात वापरासाठी खोबरे म्हणून वापरले जाते. देवी आईच्या पूजना दरम्यान नारळाचा वापर करताना पक्के झालेले परंतु त्यात पाणी असलेले व भरपूर जटा असलेले घ्यावे. कोरडे नारळ पूजनात कधीही वापरू नये. तसेच तडा गेलेले, चिरलेले नारळही देवी आईच्या पूजनात वापरू नये. कलशावर नारळ ठेवताना नारळाची शेंडी वरच्या बाजूला येईल याची काळजी घ्यावी.

देवी आई समोर कधीही स्त्रियांनी नारळ फोडू नये, कारण नारळ हे बीजरूप आहे आणि स्त्री ही बीज रूपातूनच बाळाला जन्म देत असते. बीजरुपाकडून बीज तोडणे चुकीचे आहे म्हणून स्त्रियांनी कधीही नारळ फोडू नये. जर आपल्यावर खूप कर्ज झालेले असेल आपण कर्जबाजारी झाला असाल, आर्थिक समस्यांनी त्रस्त झाला असाल तर एक नारळ घेऊन चमेलीच्या तेलात शेंदूर मिक्स करून त्या मिश्रणाने नारळावर स्वतिकचे चिन्ह बनवावे. व ते नारळ देवी आईला अर्पण करावे.

त्यानंतर नवरात्र काळातच शनिवारी किंवा मंगळवारी ते नारळ उचलून हनुमान मंदिरात नावे व हनुमानांना अर्पण करावे. या उपायामुळे आपल्यावरील कर्ज उतरू लागते. कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होतो व आपल्याला धनलाभ होतो. जर धन संबंधित काही अडचणी असतील तर नारळावर कुंकवाने स्वस्तिक काढावे व तो नारळ माता दुर्गांना अर्पण करावा. नवरात्र काळात तो नारळ देवीसमोर तसाच राहू द्यावा व नवरात्र काळ संपला की तो नारळ उचलून आपल्या तिजोरीत ठेवून द्यावा.

या उपायामुळे आपल्या घरात धनाचे आगमन वेगाने होते. जर आपली एखादी इच्छा किंवा मनोकामना पूर्ण करायची असेल तर नवरात्र काळात एक नारळ आणून लाल रंगाच्या कापडात बांधून देवी समोर ठेवावा व देवीकडे आपली इच्छा सांगून मनोकामना पूर्ती साठी प्रार्थना करावी. नवरात्र दरम्यान तो नारळ तसाच राहू द्यावा व त्यानंतर तो नारळ उचलून वाहत्या पाण्यात प्रवाहित करावा. या उपायामुळे आपली इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते. दुसरी वस्तू म्हणजे लवंग. माता दुर्गांच्या पूजनात लवंगेचा वापर आवर्जून केला जातो.

परंतु पूजनात लवंग वापरताना ती अखंड व संपूर्ण असेल याची खात्री करावी. लवंगीची फुल व दांडी तुटलेली नाही हे बघूनच ती लवंग माता दुर्गांच्या पूजनात वापरावी. संपूर्ण फुल असलेली लवंगच परिपूर्ण मानली जाते आणि माता दुर्गांच्या पूजनात कोणतीही अपूर्ण वस्तू वापरू नये. माता दुर्गांना दररोज एका विड्याच्या पानावर दोन लवंगा घेऊन तो वेडा अर्पण केल्यास माता दुर्गांची कृपा आपल्यावर नक्कीच होते. माता दुर्गांच्या पूजनात कधीही तुळशीच्या पानांचा वापर करू नये. तसेच गणेश पूजनात वापरात येणाऱ्या दुर्वांचाही वापर देवीच्या पूजनात करू नये.

तसेच मंदारची म्हणजे रुईची फुले ही माता दुर्गांच्या पूजनात वापरू नये. माता दुर्गांना लाल रंग अतिप्रिय आहे म्हणून देवीला लाल रंगाची फुले अर्पण करावीत. शक्यतो देवी आईला कमळाची फुले अर्पण करावीत, हे खूपच शुभ असते. माता दुर्गांच्या पूजनात कोणत्याही तुटलेल्या फुटलेल्या वस्तूंचा वापर करू नये. जसे चिरलेले, फुटलेले, तुटलेले गळणारे दिवे यांचा वापर देवीच्या पूजनात अजिबात करू नये. घरात माता दुर्गांचे तीन फोटो किंवा मूर्ती असू नये. माता दुर्गांना पूर्ण उमललेले फूलच अर्पण करावे.

देवी दुर्गांना कधीही कच्च्या कळ्या, कच्ची फळे अर्पण करू नये. तसेच कोमेजलेली, सुरकुतलेली, खराब झालेली, वाळलेली फुलेही माता दुर्गांना अर्पण करू नये. तसेच माता दुर्गांना ताजीच फुले अर्पण करावीत. मित्रांनो या काही बाबी आहेत ज्या माता दुर्गांचे पूजन करताना नक्कीच लक्षात ठेवाव्यात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular