नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मकर संक्रांती हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण सण आहे. संपूर्ण भारतात मकर संक्रांती अगदी उत्साहाने आणि एकोप्याने साजरा करतात. सौभाग्यवती स्त्रियांसाठी हा सण खूपच महत्त्वपूर्ण असा आहे. या दिवशी अनेक सौभाग्यवती स्त्रिया हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपल्या घरामध्ये ठेवतात. तसेच अनेक गोडधोड पदार्थ देखील या दिवशी केले जातात. बाजरीच्या भाकरीला मकर संक्रांति दिवशी विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याचे हे संक्रमण पृथ्वीवर वातावरणात मोठे बदल घडवून आणतात. याशिवाय याचे धार्मिक महत्त्वही फार मोठे आहे. या दिवशी दानधर्म करणे हे फार पुण्याचे मानले जाते.
तर मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी काही विशेष वस्तूंचे दान केल्याने शनि आणि राहुच्या दोषांतून मुक्ती मिळते. चला तर मग जाणून घेऊ त्या वस्तू कोणत्या आहेत ते.
तर मित्रांनो पहिली वस्तू आहे उडीद. जर तुम्हाला शनि देवाच्या प्रकोपापासून मुक्ती हवी असेल तर उडदाच्या डाळीचे दान करणे खूपच शुभ मानले गेलेले आहे. कारण उडद डाळीचा शनिदेवाशी संबंध मानला जातो. या दिवशी उडदाच्या डाळीची खिचडी दान केल्याने कुंडलीतील शनि दोष दूर होतात.
यानंतरची वस्तू म्हणजे तिळाचे दान. मकर संक्रांतीला आपण सर्वजण तिळ-गुळ वाटप करतो. कारण तीळ आणि गुळ शरीरात उष्णता निर्माण करून थंडीपासून आपले बचाव करतात. मात्र याच तिळाचे जर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने देखील शनि दोष दूर होतात,अशी धार्मिक मान्यता आहे.
तसेच तुम्ही जर ब्लँकेट किंवा घोंगडी याचे जर तुम्ही दान केले तर यामुळे राहु दोष दूर होतो. ब्लँकेट किंवा घोंगडी याचे मकर संक्रांतीच्या दिवशी जर केले तर ते खूपच शुभ मानले जाते.
तर मित्रांनो तुम्हाला देखील शनि आणि राहूच्या दोषांपासून मुक्ती हवी असेल तर वरील सांगितल्याप्रमाणे या वस्तूचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी अवश्य करा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!