Sunday, July 14, 2024
Homeआध्यात्मिकतिन्ही सांजेला आलेल्या सुहासिनीला ‘ही’ एक वस्तू द्या.. घरात धन कधीच कमी...

तिन्ही सांजेला आलेल्या सुहासिनीला ‘ही’ एक वस्तू द्या.. घरात धन कधीच कमी पडणार नाही.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो घरामध्ये पैसा-अडका सोने-नाणे कमी पडत असेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की करा. या उपायाने तुमच्या घरावर लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहणार आहे.

घरामध्ये बरकत येण्यासाठी त्याच बरोबर प्रत्येक गोष्टी मध्ये यश येण्यासाठी आपल्याला काही अशा गोष्टी करायचे आहे.त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे.

संध्याकाळच्या वेळी कुणीही आपल्या घरामध्ये आले तर त्याचा पाहुणचार नक्कीच करावा. कारण देव कोणत्याही रूपाने कदाचित आपली परीक्षा घेण्यासाठी कोणतेही रूप धारण करू शकतात.

त्यामुळे घरामध्ये एखादी सुवासिन स्त्री संध्याकाळच्या वेळी आली तर तिला हळदीकुंकू लावून तिची ओटी भरावी व तिला नमस्कार करून तिचा आशीर्वाद घ्यावा.

हा उपाय केल्याने आपले सौभाग्य अखंड राहून आपल्याला लक्ष्मी मातेची कृपा देखील होणार आहे. त्यामुळे आपल्या घरात कधीच धंद्याला कमी पडणार नाही. घरात सदैव चारही बाजूने पैसे येत राहतील. त्याच बरोबर संध्याकाळच्या वेळी कोणी वस्तू मागायला आल्यास त्या वस्तू कधीही त्यांना देऊ नये.

संध्याकाळच्या वेळी दूध दही ताक वगैरे कुणालाही द्यायचे नाही कारण जर आपण ह्या वस्तू त्यांना दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी देखील त्यांच्या घरी निघून जाईल. असे काही क्षेत्रांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

संध्याकाळच्या वेळी कोणालाही पैसे उसने द्यायचे नाही. पैसे उसने दिल्याने आपली लक्ष्मी घराबाहेर जाते. व आपल्याला दारिद्र्य येण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.

संध्याकाळच्या जेवण्याच्या दरम्यान कुणी अन्न मागायला आल्यास त्याला पोटभर जेवण घालावे. व त्या व्यक्तीचा भुकेलेला आत्मा शांत करावा. त्याने आपल्या घरात कायमस्वरूपी बरकत राहून अन्नपूर्ण देवीची आपल्यावर कृपादृष्टी राहते.

असे केल्याने ती व्यक्ती आपल्याला मनातल्या मनात तुझे कल्याण होईल तुला कशाची हे कमतरता भासणार नाही. असा आशीर्वाद ती व्यक्ती अत्यंत तृप्त झालेल्या भावनेने देते त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही.

संध्याकाळ झाल्यावर स्वच्छ हात पाय धुवून देवाला तुळशीला दिवा अगरबत्ती करावी. व सर्वांनी घरामध्ये शुभम करोति कल्याणम या मंत्राचा जप करावा.

घरामध्ये भांडण तंटे होणार नाहीत याची काळजी घ्यावी व घरातील वातावरण अत्यंत प्रसन्नतेचे ठेवावे. एकमेकांना समजून घेऊन पुढे जावे त्या घरामध्ये लक्ष्मी माता कधीही दुःखाची जाणीव होऊ देत नाही.

ठराविक गोष्टींचा आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये बदल करून घेऊन आपण आपल्या जीवन सुखी समाधानी बनवू शकता व लक्ष्मी मातेची कृपा देखील तुमच्यावर होऊ शकते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular