Monday, June 10, 2024
Homeआध्यात्मिकजीवनामध्ये अपेक्षा फक्त स्वामी समर्थांकडून ठेवा.. भविष्यात मिळणार इतकं सुख.. तुम्ही कल्पना...

जीवनामध्ये अपेक्षा फक्त स्वामी समर्थांकडून ठेवा.. भविष्यात मिळणार इतकं सुख.. तुम्ही कल्पना देखील करु शकणार नाहीत.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की मनुष्य हा एक समाजशील प्राणी आहे. समाजामध्ये राहत असताना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य या जसा त्याच्या मूलभूत गरजा आहेत त्याचप्रमाणे मनुष्याला जीवन व्यतीत करण्यासाठी प्रेम सद्भावना आणि आदर सन्मान देखील हवा असतो. या सर्व गोष्टी मनुष्याला परिपूर्ण बनवत असतात परंतु दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडतात, त्या मानवी स्वभावाच्या विरुद्ध असतात आणि म्हणूनच मनुष्य स्वतःला त्रास करून घेतो. अनेकदा आपल्या जीव एखाद्या व्यक्तीवर असतो आपण त्याला सर्वस्व मानत असतो आणि अचानक असे काहीतरी घडते आणि आपला अपेक्षाभंग होतो असे वाटू लागते.

अपेक्षा म्हणजे नेमके काय की एखाद्या गोष्टीबद्दल समोरच्या व्यक्तीने आपल्याबाबत जागरूकता असणे किंवा एखादी गोष्ट आपल्याला पुरवणे यालाच आपण सोप्या शब्दांमध्ये अपेक्षा असे म्हणतो. प्रत्येकाची अपेक्षा ही वेगळी असते. एखाद्या व्यक्तीला जीवनामध्ये धनाची अपेक्षा असते. पैशाची अपेक्षा असते. काहींना प्रेमाची अपेक्षा असते तर काहींना संपत्तीची अपेक्षा असते.

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात आणि म्हणूनच अनेकदा काही इच्छा पूर्ण झाल्या नाही तर आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो म्हणूनच जर तुमच्या बाबतीत देखील काही अपेक्षाभंग झालेला असेल तर आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत. ही गोष्ट जाणून घेतल्यावर तुमचं भविष्यात जरी अपेक्षाभंग झाला तरी त्याच्या वेदना तुम्हाला जास्त जाणवणार नाही. या वेदनेचे एक औषध आपल्याला सापडलेले आहे. हे औषध तुम्हाला भविष्यात परिपूर्ण जीवन जगण्यासाठी मदत करणार आहे.

हे औषध आहे श्री स्वामी समर्थ. मानवी जीवनामध्ये वेगवेगळ्या अडचणी येत असतात, तेव्हा आपण निराश होतो अशावेळी सर्व दरवाजे आपल्या करिता बंद होतात. फक्त एकच दरवाजा हा नेहमी आपल्यासाठी उघडा असतो तो म्हणजे स्वामी समर्थ यांचे दार. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच नाराज करत नाही. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना अगदी फुलाप्रमाणे जपत असतात. भक्तांवर नेहमी आपल्या प्रेमळ नजरेने पाहत असतात.

जेव्हा भक्तांवर एखादे संकट येते तेव्हा स्वामी समर्थ त्या संकटाची झळ देखील बसू देत नाही कारण की स्वामींनी आपल्या भक्तांचा हात पकडलेला असतो. जेव्हा कधी स्वामी आपल्या भक्तांचा हात आपल्या हातामध्ये घेतात तेव्हा तो पकडलेला हात कायमस्वरूपी असतो. कोणत्याही संकटामध्ये स्वामी समर्थ आपला हात सोडत नाही आणि म्हणूनच भविष्यात जर तुम्हाला कुणाकडून अपेक्षा ठेवायच्या असतील तर ती फक्त स्वामी समर्थ यांच्याकडेच ठेवा.

तुम्ही तुमचे म्हणणे स्वामी समर्थांकडे मांडा. स्वामी समर्थ कधीच तुमचा अपेक्षा भंग करणार नाही. स्वामी समर्थ यांना निखळ प्रेम आणि मनोभावे सेवा हवी असते, ती सेवा तुम्ही स्वामींना पुरवा. स्वामी समर्थ अख्ख्या आयुष्यभर तुमची साथ कधीच सोडणार नाही. फक्त दिवसभरातून एकदा श्री स्वामी समर्थ अगदी मनापासून म्हणा. स्वामी समर्थ नेहमी तुमच्या सोबत राहतील कारण की स्वामी समर्थ म्हणतात “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्र द्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular