Sunday, June 16, 2024
Homeराशी भविष्यतूळ रास वर्ष 2023.. बघा 2023 साल तुमच्या साठी कसं असणार.!!

तूळ रास वर्ष 2023.. बघा 2023 साल तुमच्या साठी कसं असणार.!!

मित्रानो तूळ राशीचे लोक हे अतिशय मनमिळावू स्वभावाचे मानले जातात. ते शांत स्वभावाचे प्रेम पूर्ण आणि निर्मळ अंतःकरणाचे मानले जातात. हे लोक न्याय निवाडा करण्यात अतिशय सक्षम असतात. यांना मित्र फार असतात. एकटे राहणे यांना आवडत नाही.

तूळ राशीच्या व्यक्ती नातेसंबंध जोडण्यात माहिर असतात. मिळून मिसळून काम करणे यांना फार आवडते. हे लोक फार इमानदार आणि न्याय प्रिय मानले जातात. न्यायनिवाडा करण्यात कुशल असणारे हे लोक निपक्षपाती असतात.

लबाडी यांना जरा सुद्धा आवडत नाही. स्वतःच्या बुद्धिमतेचा योग्य उपयोग कसा करायचा हे यांना चांगले जमते. जीवन जगण्यात एक संतुलन असते. अनेक वेळा मापून तोलून बोलतात. हे अतिशय निर्मळ स्वभावाचे मानले जातात. हे जिद्दी आणि शांत देखील असतात.

भांडणांपासून यांना दूर राहणे पसंद असते. यांची वाणी मधुर मानली जाते. लोकांना फार चांगल्या प्रकारे समजावून सांगतात. यांच्याकडे अनेक सद्गुण असले तरी काही दुर्गुण यांच्यात आढळतात. हे लोक संघर्ष करण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या व्यक्तीविषयी द्वेष अथवा घृणा ठेऊ शकतात. यांना मित्र जरी पुष्कळ असले तरी मैत्री मध्ये यांना बऱ्याचदा धोकाच मिळतो. प्रेम व्यक्त करण्यात तूळ राशीचे लोक घाबरतात.

अनेकवेळा द्विधा मनस्थिती मुळे यांचे बरेच नुकसान होते. करू कि नको या विचारतच वेळ निघून जाते. हे फार आशावादी लोक असतात. असे जरी असले तरी हे यशस्वी जीवन जगण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे गुण तूळ राशीच्या लोकांमध्ये असतात. हे अतिशय चतुर मानले जातात.

हे जेव्हा काही ठरवतात तेव्हा ते पूर्ण केल्याशिवाय शांत राहत नाहीत. ग्रहनक्षत्र जेव्हा प्रतिकूल असतात तेव्हा यांना देखील अनेक संघर्षाचा सामना करावा लागतो. अनेक अपमान सोसावे लागतात. पण हे लोक हार मानत नाहीत.

जेव्हा ग्रहनक्षत्राची अनुकूलता प्राप्त होते तेव्हा यांच्या प्रगतीला वेळ लागत नाही. 2023 या नवीन वर्षाची सुरवात तूळ राशीसाठी अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात चालू असणारी परेशानी आता दूर होणार आहे.

हा काळ आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. अनेक दिवसांपासून आपण ज्या कामांसाठी प्रयन्त करत आहात ती कामे या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

प्रगतीचे मार्ग आता मोकळे होतील. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा या काळात पूर्ण होणार आहेत. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे. उद्योग, व्यापार, नोकरी, कला, साहित्य, राजकारण, समाजकारण अशा अनेक क्षेत्रांत आपल्या भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

कौटुंबिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता दूर होतील. आपले नातेसंबंध मधुर बनणार आहेत. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन प्रेम संबंध जमून येऊ शकतात. तरुण तरुणीच्या विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून विवाहाचे योग जमून येणार आहेत. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्र द्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular