Monday, May 27, 2024
Homeआध्यात्मिकतुळशीची पानं तोडून देवघरात ठेवताना फक्त 'हे' 4 नियम पाळा.. सौख्य लाभेल.!!

तुळशीची पानं तोडून देवघरात ठेवताना फक्त ‘हे’ 4 नियम पाळा.. सौख्य लाभेल.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… पूजेमध्ये तुळशीची पाने तोडून देवासमोर देव्हाऱ्यात ठेवली जातात. मात्र, ही पाने तोडून देव्हाऱ्यात ठेवण्याचे काही खास नियम आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असतो, असं मानलं जातं. याशिवाय तुळशीला भगवान विष्णूशी संबंधित काही बाबींमध्ये महत्व आहे. ज्या घरात तुळस लावली जाते, त्या घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही, असे मानले जाते.

हिंदू धर्माला मानणाऱ्या प्रत्येक हिंदू व्यक्ती च्या घरात तुळशीची रोपे लावली जातात आणि सकाळ संध्याकाळ तुळशीची पूजाही करतात. पूजेमध्ये तुळशीची पाने तोडून देवासमोर देव्हाऱ्यात ठेवली जातात. परंतु, ही पाने तोडून देव्हाऱ्याच ठेवण्याचे काही खास नियम आहेत.

किती तुळशीची पानं ठेवावीत.?‌ हिंदू धर्मग्रंथ आणि मान्यतांनुसार, आपण देव्हाऱ्यात तुळशीची दोन पाने ठेवू शकतात. परंतु, अनेक श्रद्धावान लोकं असं मानतात की, घराच्या पूजास्थानी नेहमी 7 तुळशीची पानं ठेवली पाहिजेत.

तुळशीची पाने किती दिवस ठेवावीत.? धार्मिक ग्रंथानुसार तुळशीच्या रोपाला पवित्र वनस्पती मानले जाते, त्यामुळे तुळशीची पाने कितीही जुनी झाली तरी ती नेहमीच पवित्र असतात. परंतु, जर तुम्ही ती तुमच्या घरातील देव्हाऱ्यात ठेवत असाल तर दर 15 दिवसांनी आपण ती बदलू शकता. तुळशीची पाने सुकलेली आणि तुटलेली असतील तर ती देव्हाऱ्यातून काढून त्या जागी नवीन तुळशीचे पानं ठेवू शकता.

कोणती तुळस ठेवावी.? तुळशीच्या वनस्पतीच्या अनेक प्रजाती भारतात आढळतात. परंतु, हिंदू घरांमध्ये तुळशीचे दोनच प्रकार लावले जातात. हे रामा तुळशी आणि श्यामा तुळशी आहेत. या दोन तुळशींपैकी कोणत्याही एका तुळशीची पाने आपण आपल्या घरातील देव्हाऱ्यात ठेवू शकतो.

तुळस कोणत्या देवतेला अर्पण केली जाते.? हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान श्रीकृष्णाला तुळशीची पाने अर्पण केली जातात. श्रीकृष्णाव्यतिरिक्त देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूलाही तुळशीची पाने अर्पण केली जातात. परंतु, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान भोलेनाथ आणि श्री गणेशाला तुळशीची पाने कधीही अर्पण करू नयेत.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हा ला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular