Friday, December 1, 2023
Homeआध्यात्मिकTulsi Importance And Significance तुमच्याही घरात तुळस असेल तर.. लक्षात ठेवा या...

Tulsi Importance And Significance तुमच्याही घरात तुळस असेल तर.. लक्षात ठेवा या गोष्टी…

Tulsi Importance And Significance तुमच्याही घरात तुळस असेल तर.. लक्षात ठेवा या गोष्टी…

मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. (Tulsi Importance And Significance) प्रत्येक हिंदूच्या दारासमोर तुळस ही असते. कारण आपल्या संस्कृतीत तुळशीला पूजनीय आणि पवित्र तसेच देवी मानले गेले आहे. यामुळे आपल्या दारात जर तुळशी वृंदावन असेल तर तुम्हाला या गोष्टींची आठवण ठेवावीच लागेल. कारण जर या गोष्टींकडे लक्ष ठेवले, तर आपल्यावर सर्व देवी त्यांची कृपा होते. तसेच घरात सकारात्मक व आनंदी वातावरणाची निर्मिती होते आणि घरात पैशाची अडचण राहत नाही.

हिंदू शास्त्रांमध्ये तुळशी विषयी या महत्त्वाच्या काही बाबी सांगितल्या केलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने आपण कधीही तुळशीची पाने कधीही तोडतो व आपल्या उपयोगात आणतो किंवा पुजेत वापरतो. (Tulsi Importance And Significance) मात्र परंतु हिंदु शास्त्रात काही दिवस तुळशीची पाने तोडण्यासाठी निषिद्ध सांगितलेले आहेत.

यामध्ये एकादशीला व रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत तसेच सूर्य ग्रहण व चंद्र ग्रहणाच्या दिवशी हे तुळशीचे पाने तोडू नयेत. मात्र जर या पानांची आवश्यकता असेल, तर आदल्या दिवशीच पाने तोडून स्वच्छ धुवून फ्रिजमध्ये ठेवावेत. (Tulsi Importance And Significance) जर गरज नसेल, तर तुळशीची पाने कधीच तोडु नये, नाहीतर आपल्याला दोष लागतो.

हे सुद्धा पहा : August Month Surya Sinh Sankranti सूर्य सिंह संक्रांती या 5 राशींसाठी मालामाल होण्याची संधी.. बुधादित्य राजयोगामुळे प्रसिद्धी आणि भरपूर यश प्राप्त होणार..

गरज नसताना पाने तोडणे म्हणजे तुळशीला नष्ट करण्यासारखे आहे. दररोज तुळशीची पूजा करावी. सकाळी स्नान झाले 1 तांब्या पाणी तुळशीला अर्पण करावे व हळद-कुंकू वाहावे तसेच दररोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावावा. अशी मान्यता आहे की, या घरांमध्ये रोज संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावला जातो त्या घरात देवी लक्ष्मीचे सदैव वास्तव्य असते.

तसेच जर दारात तुळशी वृंदावन असेल, तर घरातील कितीतरी प्रकार वास्तूदोष निघून जातात आणि त्यांचा प्रभाव आपल्या कुटुंबावर पडत नाही. त्या बरोबरच आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारते. (Tulsi Importance And Significance) कारण अशी मान्यता आहे की, ज्या घरासमोर तुळस लावलेली असते त्या घरावर कोणत्याही प्रकारची वाईट नजर पडत नाही.

आणि त्या बरोबरच कोणत्याही प्रकारची निगेटिव ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही आणि आपल्या घरात नेहमी पॉझिटिव ऊर्जा जाणवते. जर तुळशीचे रोप वाळल्यास, तर त्याला घरात ठेवू नये. कारण सुखलेले तुळशीचे रोप घरात ठेवणे अशुभ मानले गेले आहे, म्हणून जर दारातील तुळस सुखली तर लगेच तिला नदीत किंवा तलावात विसर्जन करावे.

कारण वाळलेल्या तुळशीचे रोप ठेवल्यास घरातील बरकत निघून जाते म्हणून घरातील हिरवीगार टवटवीत व भरलेली तुळस लावावी. (Tulsi Importance And Significance) जर सुखलेली तुळशीचे रोप काढल्यास, तर त्या ठिकाणी लगेचच दुसऱ्या तुळशीचे रोप लावावे. तुळशीला फक्त अध्यात्म हाच महत्त्व नाही, तर आयुर्वेदातही तिला महत्त्वाचे स्थान आहे तुळशीमध्ये कितीतरी औषधी गुणधर्म आहेत.

कारण तुळशीमध्ये कितीतरी रोगांना दूर करण्याचे व त्यांचा प्रसार थांबवण्याचे गुण आहेत. (Tulsi Importance And Significance) घरात जर तुळस असेल तर घरातील वातावरण पवित्र बनतं व हवेत पसरलेले रोग पसरवणारे या सुगंधाने नष्ट होतात. त्यामुळे जर दररोज तुळशीचा सुगंध घेतला, तर श्वाससंबंधी कितीतरी रोगांपासून आपले संरक्षण होते.

जर दररोज एका पानाच्या पण सेवन केले, तर आपण रोगापासून दूर राहतो. (Tulsi Importance And Significance) वातावरणातील बदलामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊनण्यापासून आपला बचाव होतो. तसेच या मनाचे दररोज सेवन केल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते परंतु यासाठी न चुकता दररोज तुळशीचे एक पान जरुर खावे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular