Thursday, June 13, 2024
Homeराशी भविष्यतुमच्या नाकाचा आकारही सांगतो तुमचा स्वभाव.. जाणून घ्या लांब नाक असलेल्या व्यक्तींबद्दल.!!

तुमच्या नाकाचा आकारही सांगतो तुमचा स्वभाव.. जाणून घ्या लांब नाक असलेल्या व्यक्तींबद्दल.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. ज्योतिष शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये विराजमान असलेल्या ग्रहांचे विश्लेषण करून, त्यांचे व्यक्तिमत्व आणि भविष्य देखील पाहिले जाते. त्याचप्रमाणे सामुद्रिकशास्त्रामध्ये मानवी शरीरावर असलेल्या अवयवांचा आकार आणि पोत यांच्या आधारे त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि भविष्य सांगितले जात असते.

हा ग्रंथ समुद्र ऋषींनी रचला होता, म्हणून याला सामुद्रिकशास्त्र असेही म्हणतात. असे मानले जाते की या शास्त्रामध्ये अगदी अचूक विश्लेषण केले गेले आहे. यामध्ये शरीराच्या विविध भागांसोबतच नाकाच्या संरचनेबद्दलही बोलण्यात आले आहे. नाकाचा आकार पाहून कोणतीही व्यक्ती ओळखता येते. तसेच त्यांच्या स्वभावगुणांचाही अंदाज लावता येऊ शकतो. चला तर जाणून घेऊयात याबाबतीत सविस्तर माहिती.

पातळ नाक असलेले लोक – या प्रकारातील नाक असलेले लोक खूपच गर्विष्ठ असतात. असे मानले जाते की पातळ नाक असलेल्यांना खूपच लवकर राग येत असतो. असे लोकांनी जीवनात यश मिळवलं की हवेत असतात. छोट्या छोट्या ग रागावतात. थोडी प्रगती झाल्यावरच हे लोक आपले जुने दिवस विसरतात. या लोकांना नवीन कपडे घालण्याची खूप हौस असते. हे लोक कला जाणकार आणि कलाप्रेमी आहेत.

सरळ नाक असणारे लोक – ज्या लोकांचे नाक एकदम सरळ असते त्या पुरुषांना ओळखणे तसेच त्या पुरुषांचे व्यक्तिमत्त्व जाणून घेणे हे थोडे अवघडच आहे. हे लोक नेहमी गंभीर स्वरूपाचे असतात. असे लोक त्यांच्या मनात काय चालले आहे याचा ठाव सुद्धा समोरच्याला लागू देत नाही . हे लोक कठीण परिस्थितीत सुद्धा स्वतःला शांत ठेवतात. प्रेम प्रकरणाच्या बाबतीत असे पुरुष बहुतेक वेळा असफल ठरतात. परंतु प्रोफेशनल जीवनात मात्र ते नेहमीच यशस्वी ठरतात. या लोकांच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेणे फारच अवघड असते .

लांब नाक असलेले लोक – ज्या लोकांचे नाक लांब असते ते अतिशय दृढनिश्चयी मानले जातात. असे लोक फारसे भावनिक नसतात. त्यांना कौटुंबिक सं’बंधांमध्ये कमी रस असतो. ते नेहमीच धर्माचा मार्ग अवलंबताना दिसतात. तसेच या लोकांना चांगल्या स्वभावाचा जीवनसाथी मिळत असतो. पण ते आपल्या जोडीदाराकडे खुप कमी लक्ष देतात. यांचे शौक खुप उंच असतात. त्यांना महागड्या वस्तू विकत घेण्याचा शौक असतो. आणि ते त्यांचे छंद पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत देखील करतात.

लहान नाक असलेले लोक – सामुद्रिक शास्त्रामध्ये असे मानले जाते की लहान नाक असलेले लोक खूप खोडकर असतात. त्यांच्यात बालिशपणा भरपूर असतो, हे भावनिक देखील असतात. समाजात ते हुशार मानले जातात. लहान नाक असलेले लोक बहुधा उदासीन असतात. ते चविष्ट जेवणाचे शौकीन असतात. हे लोक दूरदर्शी असून समाजात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकार ची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहो चवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular