Saturday, June 15, 2024
Homeआध्यात्मिकतुम्ही स्वामी महाराजांचे सर्वश्रेष्ठ भक्तगण कसे आहात.? जाणून घ्या.. श्री स्वामी समर्थ..

तुम्ही स्वामी महाराजांचे सर्वश्रेष्ठ भक्तगण कसे आहात.? जाणून घ्या.. श्री स्वामी समर्थ..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! स्वामींच्या श्रेष्ठ भक्ताला पुढच्या एका महिन्या पर्यंत नेवैद्य अर्पण करण्याचा मान मिळणार होता. त्या साठी तीन व्यक्ती दावेदार म्हणुन होते. पहिला गावाचा सावकार गणेश, तो गडगंज संपत्तीचा मालक होता, दुसरा गावाचा नावाजलेला हलवाई सदाशिव आणी तीसरा गरीब पण मनानी श्रीमंत असलेला भास्कर.

तिघेह स्वामींकडे येऊन आपल्यायला हा मान मिळावा, अशी विनंती करतात. स्वामी अट ठेवतात, तुम्ही काही कृती करा, ज्याची कृती सर्वश्रेष्ठ राहिलं त्यालाच हा मान मिळणार.

त्या साठी 7 दिवसाची मुदत देण्यात येते. गणेश सावकार स्वामींची अप्रतिम प्रकारची मूर्ती घडवायचं काम लावतो, सदाशिव सुखे मेवे घालुन उत्तम पैकी मिठाई बनवायला लागतो.

एक दिवशी गणेश आणी सदाशिव रस्त्यात भेटतात, एका-मेकांना घालुन-पाडून बोलतात,एका-मेकाची टवाळी करतात.

दोघानाही समोरचा व्यक्ती काय कृती करणार आहे, ते ठाऊक असतं. काही वेळ आपसात झुंजल्यावर गणेश सदाशिव ला म्हणतो:- ” अरे आपण आपसातच भांडत आहे पण तो भास्कर काय करतो

त्या वर आपलं काहीच लक्ष्य नाही.” सदाशिव ला हे पटतं.मग काय, दोघेही लपून भास्कराचा पाठलाग करतात. पाहतात तर, भास्कर एका घरात जातो काही वेळ बसतो आणी मग परत घरी येऊन आपल्या दिनचर्येला लागतो.

ते त्या घराच्या मालकाला विचारतात- “काहो! आमचा मित्र भास्कर इथे येतो पण करतो तरी काय?” घरधनी म्हणतो:-” काही नाही आमच्या बरोबर बसतात, चार गोष्ठी होतात, आम्ही काही खायला देतो ते खाऊन जातात”

सदाशिव आणी गणेश आश्वस्त होऊन परततात. मुदत संपल्यावर सर्व लोकं स्वामींकडे जातात. स्वामी पहिले गणेश कडे त्याची कृती बघायला जातात. स्वामींची अप्रतिम मूर्ती चंदनाच्या देवघरात ठेवलेली होती. स्वामी वरच्यावर कौतुक करुन परततात.

मग सदाशिव त्यांना आपल्या कौशल्यानी तैयार केलेली उत्तम दर्ज्याची मिठाई अर्पण करतो. स्वामी मिठाई चाखून बघतात,आणी छान आहे, असं सांगतात.

मग भास्कर ला विचारत:-” काय रे भास्कर! तु काय केली, कृती?” भास्कर म्हणतो:- ” स्वामी मी काय विशेष करणार हो! मी फक्त तुमच्या बद्दल माहिती नसलेल्या लोकांकडे गेलो,

त्यांना तुमच्या लीला आणी सामर्था बद्दल सांगितलं.”
“तुम्ही जी शिकवण करतात, त्याची त्यांना समझ दिली, त्यांना नामस्मरणाचं महत्व समझावून, त्यांना नाम स्मरणाच्या मार्गावर आणलं.”

“तुमची शिकवण प्रसार पावो, या साठी थोडेशे प्रयत्न केले.” स्वामींची चर्या प्रसन्न होते. स्वामी म्हणतात:- “शाब्बास भास्करा आम्हाला जे पाहिजे होते, तेचं तु केले.”

“तुलाच आम्हाला नेवैद्य अर्पण करायचा मान मिळणार.” गणेश आणी सदाशिवला फार आश्चर्य वाटतं म्हणुन स्वामी समझावतात:- ” अरे संतांना देव का पाठवतो ? अज्ञ लोकांना सदमार्गाचा रस्ता दाखवायला, त्यांचं मार्गदर्शन करायला.”

“संसार करताना ईश्वराचं विस्मरण न व्हावं, ही आठवण करुन द्यायला.” “आणी संतांना जर कोणी त्यांच्या कार्यात सहाय्य केले तर त्यापेक्षा त्यांना दुसरं काय आवडणार?” भास्कर नी आमच्या कार्याला जो हाथभार लावला. अज्ञानी लोकांना सद्मार्ग दाखवला, आमची शिकवण ज्या लोकांपर्यंत पोहचत नाही त्यांच्यापर्यंत
पोहचवली.”

“अरे आम्हाला आणखी दुसंर काय आवडणार?”
“अरे मूर्ती-मंदीरं कश्यासाठी बनवतात? लोकांना विसर पडलेल्या ईश्वराच स्मरण व्हावं म्हणुन.” ” ईश्वराला किंवा गुरूला त्या मूर्तीचा काय लोभ?” “संत मिष्ठान्न ग्रहण करता ते भक्तांच्या समाधानासाठी, त्यांनी षढ-रसांच्या तृष्णेवर कधीच विजय मिळवलेला असतो.” “आम्हाला जे अपेक्षित होतं, ते भास्कारानी केलं, म्हणुन भास्कराची कृती सर्वश्रेष्ठ ठरली.”

गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णुः गुरूर्देवो महेश्वरः । गुरूर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ।। गुरु स्वामी समर्थ महाराज

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular