Thursday, June 13, 2024
Homeवास्तूउपायतुरटीचा फक्त एकच तुकडा असा वापरा.. वाईट नजर, बाधा दूर करण्यासाठी सोपा...

तुरटीचा फक्त एकच तुकडा असा वापरा.. वाईट नजर, बाधा दूर करण्यासाठी सोपा उपाय.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, अनेकदा आपल्या वास्तूला किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला कुणाची तरी नजर लागते किंवा कधी कधी कुणी तरी ज्याला आपली प्रगती आपलं सुख होत नाहीये, त्या व्यक्ती आपल्यावर ती काहीतरी नकारात्मक शक्ती पाठवतात. मग अशावेळी आपल्या घरात अनेक समस्या निर्माण होतात, अनेक प्रकारचे नुकसान होतं. कारण हीच नकारात्मक ऊर्जा कळत-नकळत आपल्यापर्यंत आलेली असते.

त्यामुळे घरात कलह निर्माण होतात, चालू कामे बंद पडतात. याचबरोबर जे काही पैसा कमावण्याचं साधन आहे, ही कामे ठप्प होतात. घरांमध्ये लोक वारंवार आजारी पडून रोगी बनतात आणि पैसा टिकत नाही, अशा ठिकाणी लक्ष्मी सुद्धा राहत नाही. अशा वेळी नक्की आपल्या घराला वास्तुला किंवा लोकांना नजर लागलेली नाही ना, हे ओळखण्यासाठी तंत्र शास्त्रात काही प्रयोग सांगितलेले आहेत आणि या गोष्टींवर विश्वास बसत नाही.

बऱ्याचदा हे प्रयोग सफल केल्यास, आपल्या जीवनामध्ये यांच्या समस्या आहेत त्या दूर होण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात या नजर दोषांपासून किंवा ही जी काही वाईट शक्तीपासून मुक्ती मिळते. आपल्या घरात एखाद्या कुंडलीमध्ये विशेष करून ही व्यक्ती पैसे कमावते, मग ती स्त्री असो किंवा पुरुष आहे, की जी पैसा कमावून आपल्या घरात आणते. त्या व्यक्तीच्या कुंडलीत जर असे दोष उत्पन्न झाला तर काम पडतात लक्ष्मी टिकत नाही, अशी व्यक्ती वारंवार आजारी पडते.

यासाठी आपल्याला एक छोटासा तुकडा साधारणता एक दीड ते दोन इंच इतकं तुरटीचा तुकडा घ्यावा आणि आपल्या घरामध्ये जितके सदस्य आहेत, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत प्रत्येकाच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने 7 वेळा ओवालयचा आहे. ओवाळतांना आपण कोणताही मंत्र बोलायचा नाहीये, कोणताही विचार करायचं नाहीये. याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाजासमोर उभा राहून आपल्या वास्तूचे सुद्धा पण नजर उतरवायची आहे.

असे सर्व केल्यानंतर ये नजर उतरल्यानंतर आपण हा तुरटीचा तुकडा हा अग्नीमध्ये टाकायचा आहे. थोड्यायासाठी आपण कोळशाचा वापर करू शकता किंवा शेणाचा वापर करू शकता. कोणत्याही प्रकारे आपल्याला ही तुरटी जाळायची आहे. मग त्यानंतर थोड्या वेळाने तुरटी फुगू लागेल.

मग ही तुरटी गरम असतानाच आपण कोणत्याही रस्त्यावर मांडा आणि रस्त्यावर मांडून चपलाने किंवा बुटाने फिटकरी वर जोरात मारायचा आहे. जोपर्यंत ती फुटत नाही, तोपर्यंत तिला मारायचे आहे. जर ही फुटलीच नाही, तर लक्षात घ्या कोणी तरी काहीतरी केलेला आहे आणि फुटल्यास नजर दोष होता कोणाची तरी नजर लागली होती आणि ज्या अर्थी ही आकृती फुटलेली आहे हा नजर दोष संपुष्टात आलेला आहे.

अशा प्रकारे जर कुणाला सतत नजर लागत असेल तर आपण प्रत्येक आठवड्याला किंवा प्रत्येक महिन्याच्या पंधरवड्याला हा सोपा उपाय आपण करु शकता.!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular