Monday, December 11, 2023
Homeआध्यात्मिकउत्तरायण पिवळ्या रंगावर संक्रात.. मग पूजेसाठी हळद वापरायची की नाही.? सोनं परिधान...

उत्तरायण पिवळ्या रंगावर संक्रात.. मग पूजेसाठी हळद वापरायची की नाही.? सोनं परिधान करावं की नाही.?

मित्रांनो, नववर्षातील पहिला सण म्हणून मकर संक्रातीकडे पाहिले जाते. यंदा हा सण रविवारी म्हणजेच 15 जानेवारीला आला आहे. तर यंदा संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा आहे.

ही संक्रांत कुमारी अवस्थेतील असून, पिवळे वस्त्र नेसलेली आहे. पिवळ्या रंगाने रंगवलेल्या वस्तू परिधान करू नये, असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे पिवळ्या रंगावरून सोशल मीडियात उधाण आले आहे.

यंदाची संक्रात हि पिवळ्या रंगावर असून ती सोबत संकटे घेऊन आली आहे. तिने परिधान केलेल्या वस्त्राचा पिवळा रंग हा अशुभ असल्याने त्रासदायक असल्याचे मॅसेजद्वारे सांगण्यात येत आहे.

मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मकर संक्रांत भारतात मोठया आनंदाने आणि उत्साहात साजरी केली जाते. या सणाबद्दल लहानांपासून मोठ्यापर्यंत एक आकर्षण असतं.

यादिवशी लोकं आपल्या ओळखीच्या माणसांच्या हातावर तीळ-गूळ देतात, ते देताना, ‘तीळ गुळ घ्या, गोड गोड बोला’ असं आर्वजून सांगतात. शिवाय या सणाचा महिलां वर्गामध्ये एक वेगळाच उत्साह असतो.

या दिवशी त्या एकमेकींना वाण देतात. तर लहाण मुलांना या सणाच्या निमित्ताने मनमुराद पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात. तसंच हा सण नवीन लग्न झालेल्या मुलीसाठी खूप महत्वाचा माणला जातो.

मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो. हा सण देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या पध्दतीनं साजरा केला जातो. या वर्षातील मकर संक्रांत रविवार 15 जानेवारीला येत आहे.

या सणाचं आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे, इतर वेळी भारतीय संस्कृतीत अशुभ मानला जाणारा काळा रंग यादिवशी मात्र आवर्जून वापरला जातो.

या सणाच्या दिवशी काळी कपडे परिधान केली जातात. शिवाय या सणाला नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी भेट म्हणून दिली जाते. त्यामुळे मकर संक्रांतीला काळी कपडेच का परिधान केली जातात?

याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होत असतात. तर यादिवळी काळ्या रंगाची कपडे वापरण्यामागची काही कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पुराणातील अशी एक कथा सांगितली जाते की, सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावलीने काळे वस्त्र परिधान केलेलं होतं. हे झालं कथेतील कारण, मात्र, यामागचे वैज्ञानिक कारण म्हणजे, पांढरा रंग जसा उष्णता परावर्तित करतो,

उष्णता शोषून घेत नाही, त्याप्रमाणे काळा रंग हा ऊष्णता शोषून घेतो. मकर संक्रांतीचा सण हा ऐन हिवाळ्यात येतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात शरीर उबदार रहावे. आपणाला थंडीचा जास्त त्रास होऊ नये, म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची कपडे घातली जातात.

शिवाय आपल्या शरीराला उष्णता मिळावी शरीर उष्ण राहावं म्हणून या सणाला तिळगूळ वाटले जातात याचं कारण हेच की सणाच्या निमित्ताने आपल्या शरीरात तिळाचे काही तत्व जावेत आणि आपलं थंडीपासून संरक्षण व्हावं.

मात्र, ही यावेळी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली पिवळ्या रंगाची बदनामी खोटी असल्याचे दिसून येत आहे..

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular