Sunday, December 10, 2023
Homeआध्यात्मिकवधु वरांची कुंडली का जुळविली जाते.? गुणमिलन खरंच गरजेचे असते का.?

वधु वरांची कुंडली का जुळविली जाते.? गुणमिलन खरंच गरजेचे असते का.?

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो मुले-मुली उपवर झाली की त्यांच्या आई-वडिलांना त्यांच्या मुलांच्या लग्नाची काळजी लागलेली असते. मग ते त्यासाठी जोडीदार शोधू लागतात. मग मुलगी पाहणे, कुंडली जुळविणे, मानपान, देणेघेणे इतके सर्व पार पाडून लग्न धुमधडाक्यात लावले जाते आणि मग कधी कधी काय होते इतके सगळे करून छान पद्धतीने धुमधडाक्यात लग्न लावून देखील ते लग्न वर्ष-सहा महिन्यात गटांगळ्या खाऊ लागते.

कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांच्यात खटके भांडणे होऊ लागतात व ते लग्न मोडते. असे का होते. असे म्हणतात की, लग्नाच्यागाठी या स्वर्गात लिहिलेल्या असतात. त्यासाठी आपल्याला फक्त योग्य तो जोडीदार शोधून त्यांना एकत्रित करायचे असते. म्हणजेच काय भगवंताने जोड्या निर्माण केलेल्या असतात पण खालील जोड्या जुळवा या प्रश्नाचे उत्तर आपणाला लिहावयाचे असते. त्या जोड्या आपणाला जुळवायच्या असतात. काही जोड्या सरळ मार्गाने, काही जोड्या तिरक्या मात्र जवळजवळ असतात. काहींचे खूपच लांब मात्र ते खूप गुंतागुंतीची असतात.

पण त्यातूनही आपणाला मार्ग काढून त्या जोड्या जुळवाव्या लागतात. लग्न ठरविताना सगळ्यात पहिले काम म्हणजे कुंडली. काही लोकांचा कुंडलीवर विश्वास असतो तर काही लोकांचा विश्वास हा अजिबात असत नाही. आजकालची तरूण मुले-मुली ग्रह तारे हे काही मानतच नाही. पण घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या पुढे त्यांचे काही चालत नाही आणि त्यांना त्यासाठी तयार व्हावेच लागते. परंतु लग्न ठरविताना कुंडली जुळवणे खरच योग्य आहे का?

तर ज्योतिषी शास्त्रामध्ये ग्रह ,तारे , कुंडली, दोष नियम यांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे त्यांनी कुंडली जरूर पहावी. लाखो मीटर दूर असलेले ग्रहतारे मिळविण्यापेक्षा ज्यांना एकमेकांशी लग्न करावयाचे आहे त्यांची मने जुळणे खूप अत्यंत आवश्यक आहे. एखादी कुंडली जर नाही जुळली तर त्यावर उपाय म्हणून आपण शांती, अभिषेक करून त्यातील दोष दूर करू शकतो व लग्न लावून देऊ शकतो.

मग जर त्यांची मने नाही जुळली तर मग कुंडली जुळवून त्याचा काय उपयोग. मी काही अशी जोडपी पाहिलेली आहेत की, त्यांचे 36 गुण जुळलेले असूनदेखील त्यांच्यात कायम छत्तीसचा आकडाच असतो. त्यांची तोंडे एकमेकाविरुद्ध फिरवलेली असतात. त्यांचे अजिबातच पटत नाही. तर काही जोडपी अशी असतात कि ते कुंडली न पाहता लग्न करतात ते त्यांचा 75 वा वाढदिवस देखील ते अगदी अत्यंत आनंदाने साजरा करतात.

मग कुंडली पाहण्यात काय अर्थ आहे. आपल्या मनाची शंका म्हणून आपण कुंडली पाहू शकतो जर कुंडली पाहून जर आपल्या शंका निरसन होत असतील तर ठिक जर पाहून आपल्या शंकांना आणखी फाटे फुटत असतील तर ती कुंडली पाहून काहीच उपयोग नाही. त्यापेक्षा त्या दोघांचा स्वभाव कसा आहे, त्यांचे विचार कसे आहेत , त्यांचे सुर जुळतात का हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

कुंडली जुळून देखील त्यांची मने जुळत नसतील तरीही आपण त्यांची कुंडली जुळली म्हणून आपण त्यांचा विवाह लावून दिला तर हे खुप चुकीचे आहे. तर हा विवाह कधीही शेवट पर्यंत टिकत नाही किंवा त्या दोघांना मन मारून आपला संसार करावा लागेल. संसार करण्यासाठी केवळ कुंडली जुळणे आवश्यक नाही तर दोन मने जुळली पाहिजेत. एकमेकांबद्दल प्रेम असणे गरजेचे आहे एकमेकांना सुख देता व घेता आले पाहिजे. जोडीदार जसा आहे तसा गुणदोषांसहित स्विकारता आला पाहिजे.

तेव्हाच ते नाते बहरेल तरच संसार सुखाचा आनंदाचा होईल. तुम्ही कुंडली बघा नाही असे नाही. एवढ्या मोठ्या समुद्रावर ग्रह-तार्‍यांचा प्रभाव होऊ शकतो. ते आपण पौर्णिमा अमावस्या दिवशी भरती ओहोटीच्या वेळी बघू शकतो तर मानवी जीवनावर ही त्याचा प्रभाव नक्कीच पडू शकतो पण नुसतीच कुंडली जुळून आलेली बघून विवाह लावणे हे मला पटत नाही योग्य वाटत नाही त्यासाठी दोघांची मने जुळणे अत्यंत आवश्यक आहे असे मला तरी वाटते.

टिप मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular