Friday, May 17, 2024
Homeआध्यात्मिकविजयादशमी घटाच्या उगवलेल्या धन्यासोबत कुलस्वामिनीसाठी तळी कशी भरावी.? कुणी आणि का भरावी.?

विजयादशमी घटाच्या उगवलेल्या धन्यासोबत कुलस्वामिनीसाठी तळी कशी भरावी.? कुणी आणि का भरावी.?

नमस्कार मित्रांनो आमच्या मराठमोळ्या पेज वर तुमचं स्वागत आहे.!! तळी भरने ही एक कुळाचार असलेली प्रथा आहे. एका ताम्हणमध्ये विड्याची पाने (नागवेलीची पाने), सुपारी, देवाचा टाक, नारळाचे तुकडे, भंडारा इत्यादी वापरतात. विषम संख्येतील तीन, पाच आणि सात माणसे साहित्य घेऊन येळकोट येळकोट चा गजर करून सदानंदचा ताम्हण तीनदा उचलतात व खाली करतात. देवाला भंडारा वाहून त्यांनतर तोच भंडारा घेऊन सगळ्यांच्या कपाळाला लावला जातो आणि पुन्हा एकदा सदानंदचा येळकोट चा गजर गुंजतो. सरते शेवटी त चे ताम्हण हे डोक्याला लावले जाते.

“सदानंद चा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार” असा गजर करत ते ताम्हण वर करत तीनदा करतात. या प्रथेतूनच ‘ तळी उचलणे ‘ म्हणजे कोणाला तरी आधार देणे किंवा उदो उदो करण हे वाक्य मराठीत रूढ झाले आहे. मार्तंड देवताला मल्हारी म्हणतात कारण त्याने मनीसुर आणि मल्लासुर या राक्षसांचा वध केला होता.

यानंतर भगवानांनी त्याचा वध केला, ऋषी आणि सर्व नगरवासी आनंदित झाले आणि त्या आनंदात त्यांनी मल्हारी मार्तंडाचा जयजयकार केला. हे त्याचे प्रतीक आहे. त्याचा उद्देश उड्डाण करणे आहे.

खोब-याचे तुकडे का करावेत?
आपण सर्व एक आहोत. आपण त्या दैवी शक्तीचा भाग आहोत. त्याच्या विभाजित भागाचे प्रतीक लक्षात ठेवण्यासाठी, खोबाचे तुकडे भंडारामध्ये ठेवले जातात. नवरात्रीच्या काळात घरात बसवलेल्या आपल्या देवीची तसेच कुलदेवीची ओटी भरायची पद्धत आहे. ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. कुलदेवी ही कुटुंबाची रक्षक आहे आणि दुर्गादेवीही आपली रक्षक आहे, म्हणून देवीला अन्नदान करावे. ती आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करते.

त्यासाठी एक साडी एका ताटामध्ये ठेवा. आपल्या इथल्या परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची काही पद्धत असेल तर नऊवारी साडी नक्की ठेवा. देवीला अर्पण केलेली साडी सुती किंवा सिल्कची असावी. कारण या धाग्यांमध्ये इतर धाग्यांच्या तुलनेत देवतेच्या सात्त्विक लहरी शोषून घेण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते. साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा.  त्याऐवजी तुम्ही लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, जांभळा रंग निवडू शकता.

साडी ताटात ठेवा आणि त्यावर लाल, सोनेरी किंवा इतर शुभ रंगाची खण ठेवा. संपूर्ण सुपारी किंवा संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा खोबऱ्याची संपूर्ण वाटी ठेवा. तसेच हळद-कुंकू, हलकुंड, हिरव्या बांगड्या, माळा, गजरा, तांदूळ आणि खडीसाखर सुद्धा ताटात असावी. बर्‍याच लोकांकडे 5 वाण ठेवण्याची प्रथा असते. यामध्ये हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम आणि फळझाडांचा समावेश आहे.

नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. ओटीमधे एक पानाचा विडा ठेवणे देखील आवश्यक आहे. याला तांबुळ असे म्हणले जाते. त्यात सुपारी आणि तंबाखू असू नये. मग या सर्व गोष्टी हाताच्या तळहातावर ताटातून घेऊन तुम्ही देवीसमोर अशा प्रकारे उभे राहता की ते सर्व तुमच्याच छातीसमोर येईल. देवीकडून चैतन्य आणि आध्यात्मिक उन्नती मिळावी म्हणून देवीची प्रार्थना करावी.

देवतेच्या चरणी ओटी साहित्य अर्पण केल्यानंतर ओटी साहित्यावर तांदूळ पसरावा. मंदिरातील देवतेला अर्पण केलेली साडी तेथे अर्पण करावी तसेच देवीला अर्पण केलेली साडीही नेसली पाहिजे किंवा एखाद्या सवाष्णी ला आपण ते देऊ शकता. तसेच नारळात असलेले खोबरे प्रसाद म्हणून घ्यावा. यासोबतच गुरुजींना शिधा सुद्धा देण्यात यावा.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular