Sunday, February 25, 2024
Homeआध्यात्मिकव्रत वैकल्यांच्या श्रावण महिन्यात.. नंदीच्या कानात बोला ‘हे’ तीन शब्द मनोकामना पूर्ण...

व्रत वैकल्यांच्या श्रावण महिन्यात.. नंदीच्या कानात बोला ‘हे’ तीन शब्द मनोकामना पूर्ण होतील.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्र-मैत्रिणींनो आता श्रावण महिना सुरु झाला आहे. प्रत्येक जण श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पूजा तसेच त्यांना अभिषेक घालण्यात मग्न असतात. महादेवांचे मंदिर भक्तांनी फुलून गेले आहेत. फक्त महादेवाची पूजा करून आपली इच्छा पूर्ण होत नसते. त्यामुळे नंदी महाराजांची देखील पूजन करावे लागते. मगच महादेवांचे दर्शन होते आणि महादेवाने त्यांना असे वरदान देखील दिलेले आहे.

महादेवांना प्रिय असलेले नंदी महाराज हे महादेवांचे दूत देखील आहेत. जर आपण आपल्या मनातील कोणतीही च्या नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगितले तर ते महादेवान पर्यंत पोहचवण्याचे काम करतात. याविषयी एक पौराणिक कथा देखील आहे श्री लाभ नावाचे ब्रह्मचारी मुनी होते. एके दिवशी ते रानात गेले असताना त्यांना तेथे एक लहान मुले रडताना दिसले त्यांनी इकडे तिकडे पाहिले की त्या मुलाबरोबर कोण आले आहे. का तर तसे त्यांना काहीच दिसले नाही.

ते मुल एकटेच होते व ती खूप रडत होते. त्यांनी त्या मुलाला आपल्याबरोबर आपल्या आश्रमात घेऊन आले. व त्याचे संगोपन आपल्या मुला प्रमाणे ते करू लागले व ते त्या बालकास नंदी या नावाने बोलू लागले. ते बालक आता हळूहळू मोठे होऊ लागले होते. एकदा त्या मुलीच्या आश्रमामध्ये दोन साधू आले. व ते साधू त्या मुलाकडे पाहून मुनीला म्हणू लागले. की हे बालक खूपच हुशार आहे.

पण हे बालक अल्पायुषी आहे त्याचे मरण जवळ आले आहे. जास्त दिवस हे बालक जगू शकणार नाही. हे त्या बालकास समजल्यानंतर ते बालक खूप रडू लागले. व त्याने रानात जाऊन महादेवाची घोर तपस्या करण्यास सुरु केले. ओम नमः शिवाय याचा जप तो करत होता. त्या बालकाच्या या तपश्चर्येने महादेव खुश झाले. व प्रकट होऊन त्याला अमर होण्याचा आशीर्वाद दिला. व त्या बालकास आपल्या बरोबर घेऊन गेले.

महादेवांनी व पार्वतीने आपल्या सर्व गणान समोर नंदीला सर्व गुणांचा अधिपती म्हणून अभिषेक केला. व त्यावेळी त्यांनी असा आशीर्वाद दिला. की ज्या ज्या ठिकाणी महादेव असतील त्या त्या ठिकाणी नंदी हे असणारच. नंदी शिवाय महादेवाचे कोणतेही मंदिर पूर्ण नाही. आणि जे जे भक्त नंदीच्या कानामध्ये आपल्या इच्छा सांगतील, त्या सर्व इच्छा त्यांच्या लवकर पूर्ण होतील. असा आशीर्वाद त्यांनी त्यावेळी नंदीला दिला.

अशी मान्यता आहे की.. आपण महादेवांना आपली इच्छा सांगू शकतो. पण आपली इच्छा लवकर पूर्ण होण्यासाठी आपण जर नंदीच्या कानात आपली इच्छा सांगितली तर ती इच्छा लवकर पूर्ण होते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular