Sunday, April 21, 2024
Homeराशी भविष्यWeekly Rashifal March 2024 साप्ताहिक राशिफल मार्च 2024 मकर राशीच्या लोकांना आठवड्याच्या...

Weekly Rashifal March 2024 साप्ताहिक राशिफल मार्च 2024 मकर राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक लाभ आणि प्रगतीच्या भरपूर संधी मिळतील, पण तुमचा आळस आणि बेजाबदारपणा यामुळे तुम्ही या संधी गमावाल..

Weekly Rashifal March 2024 साप्ताहिक राशिफल मार्च 2024 मकर राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक लाभ आणि प्रगतीच्या भरपूर संधी मिळतील, पण तुमचा आळस आणि बेजाबदारपणा यामुळे तुम्ही या संधी गमावाल..

आठवड्यात मेष राशीच्या लोकांना आकस्मिक धनलाभाचा योग आहे, (Weekly Rashifal March 2024) तर वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यात जीवनातील प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावे लागेल. मिथुन राशीच्या लोकांचा यशासाठी संघर्ष असेल. तर कर्क राशीसाठी हा आठवडा संमिश्र राहील. वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्याच्या पहिल्या टप्प्यात धन आणि सुखप्राप्ती होईल, पण तुमचा वेळ आणि पैसा वायफळ गोष्टींवर खर्च होईल. तर मकर राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक लाभ आणि प्रगतीच्या भरपूर संधी मिळतील, पण तुमचा आळस आणि बेजाबदारपणा यामुळे तुम्ही या संधी गमावण्याचीही शक्यता आहे. तुमची राशी काय सांगते? चला पाहुया साप्ताहिक राशिभविष्य, या आठवड्यात मेष ते मीन या सर्व राशींवर ग्रह- नक्षत्राचा काय परिणाम होणार आहे.

हे सुद्धा पहा – Numerology Prediction Monday अंकशास्त्रानुसार जाणून घ्या सोमवारचा दिवस तुमच्यासाठी कसा जाणार आहे.. भाग्यशाली अंक आणि शुभ रंग कोणता असेल.?

मेष – या सप्ताहात मेषेत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात काम मिळाले तरी उधारीवर माल देऊ नका. गोड बोलून लोक मागून घेतील. हिशोब नीट करा. घरातील व्यक्तीच्या विषयी चिंता वाटेल. सप्ताहाच्या मध्यावर क्षुल्लक तणाव होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. जवळचे लोक तुमचा हेवा करतील. तुम्हाला दूर करण्याचा प्रयत्न करतील. कला-क्रीडा क्षेत्रात सर्वांच्या मतानुसार वागावे लागेल. तुमची कल्पना कृतीत आणण्यास श्रम घ्यावे लागतील. (Weekly Rashifal March 2024) नोकरीत वरिष्ठ मोठे काम तुमच्याकडे देतील. प्रसिद्धीच्या झोतात याल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. सरकारी वर्गाशी भांडण करू नका. विद्यार्थ्यांनी खाण्याची काळजी घ्यावी. परीक्षेत यश मिळेल. शुभ दि. १७, २१

वृषभ – या सप्ताहात मेषेत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. नोकरीत सावधपणे निर्णय घ्या. कायद्याचे पालन करा. वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार निर्णय घ्या. धंद्यात काम मिळेल. कामगारांच्या बरोबर भांडण करू नका. सप्ताहाच्या शेवटी राजकीय-सामाजिक कार्यात तत्परता दाखवा. प्रवासात घाई करू नका. राग वाढवणारी घटना घडू शकते. घरातील माणसे तुमच्या पाठीशी असतील. कोर्ट केस कठीण असेल. अरेरावी करून प्रश्न सुटणार नाही. कला-क्रीडा क्षेत्रात लोकांचे प्रेम मिळेल. कमी बोलण्यामुळे तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. वृद्ध व्यक्तीची काळजी वाटेल. संशोधनात दिशाभूल होईल. विद्यार्थ्यांनी घरातील लोकांना फसवू नये. मोठ्यांचे ऐकावे. शुभ दि. १८, २२

मिथुन – या सप्ताहात मेष राशीत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. हे दोन्ही ग्रह या राशीत उच्चीचे फल देतात. व्यवसायात चांगली बातमी मिळेल. जम बसवता येईल. थकबाकी मिळवाल. घरातील प्रश्न सोडवता येईल. मुलांची प्रगती आनंद देईल. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. तुमचा वाढलेला अधिकार उपयोगात आणा. लोकांना सहाय्य करा. तरच पुढे टिकून राहता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात तुमचे स्वप्न पूर्ण होईल. प्रसिद्धी मिळेल. शेअर्समध्ये फायदा होईल. नोकरी नसलेल्यांना नोकरी मिळेल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. घर, जमीन, खरेदी-विक्रीत फायदा होईल. विद्यार्थ्यांनी वेळ फुकट घालवू नये. शुभ दि. १९, २३

कर्क – या सप्ताहात मेष राशीत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. या सप्ताहात धंद्यात लक्ष द्या. टिकवून ठेवण्यासाठी मेहनत घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या मागे लावालावीचे कारस्थान करण्याचा प्रयत्न केला जाईल. गुप्त कारवायांना रोखून ठेवा. (Weekly Rashifal March 2024) दादागिरी न करता समजुतीने प्रश्न सोडवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवीन ओळखी होतील. संसारात जबाबदारी वाढेल. मोठी खरेदी कराल. कोर्ट केसमध्ये जिद्दीने यश मिळवता येऊ शकते. नोकरीत दुसर्‍यांचे काम करून देताना स्वतःचा बचाव करा. संशोधनाच्या कामात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने नियमितपणाने अभ्यास करावा. गुरूजनांना कमी लेखू नये. अध्यात्मात मन रमेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. १७, २०

सिंह – मेष राशीत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश या सप्ताहात होत आहे. रविवार मनाविरुद्ध घटना घडली तरी त्यानंतर तुमचे कामात यश मिळवता येईल. धंद्यात मेहनत घ्यावी लागेल. कामगारांच्या मनातील अडचणी समजून घ्या, तरच काम पूर्ण होईल. राजकीय-सामाजिक कार्यात मोठे लोक तुमचे कौतुक करतील. तडजोड करावी लागेल. मुले, जीवनसाथी यांची समस्या ऐकावी लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात क्षुल्लक वाद संभवतो. तुमचे खोचक बोलणे आवडणार नाही. शांततेतून मार्ग काढा. कोर्ट केस संपवता येईल. संशोधनात यशस्वी व्हाल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. बढती मिळेल. विद्यार्थी वर्गाने जिद्द न सोडता अभ्यास करावा. यश मिळेल. शुभ दि. १८, २१

कन्या – या सप्ताहात मेष राशीत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला राजकीय-सामाजिक कार्यात अडचणी येतील. तुमच्यावर आरोप टाकण्याचा प्रयत्न होईल. तुम्ही सहनशीलता ठेवा. नम्रपणे बोला म्हणजे नावलौकिक बिघडणार नाही. धंद्यात सुधारणा करू शकाल. वाद मिटवता येईल. तुमचा प्रेमळ स्वभाव उपयुक्त ठरेल. घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. मुले, जीवनसाथी यांचा आधार वाटेल. कला-क्रीडा क्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. (Weekly Rashifal March 2024) प्रतिष्ठा मिळेल. नवे मित्र मिळतील. कोर्टाच्या कामात सावध राहा. संशोधनाच्या ठिकाणी चौकस बुद्धी वापरा. नोकरीत वरिष्ठांचा मान ठेवा. विद्यार्थ्यांनी चांगली संगत ठेवावी. मोठे व्हावे. शुभ दि. १९, २२

हे सुद्धा पहा – Dhan Yog Horoscope Of The Week पुढील आठवड्यात चमकेल धन योग, मेष, सिंह राशीसह या 5 राशींचे भाग्य उजळणार.. जाणून घ्या आठवड्यातील भाग्यशाली राशी..

तूळ – या सप्ताहात मेषेत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात चांगला फायदा होईल. मोठे काम मिळेल. शेअर्समध्ये थोडीच गुंतवणूक करा, पण तज्ज्ञांच्या योग्य सल्ल्याने करा. नोकरी लागेल. चांगला बदल करू शकाल. घरातील व्यक्तींचा विचार पटवून घ्यावा लागेल. भावनेच्या आहारी जाल. व्यवहार पाहा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. वरिष्ठ पद देतील. जवळच्या माणसांना खूश ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवे मित्र मिळतील. कोर्ट केसमध्ये योग्य मुद्देच बोला. यश मिळेल. संशोधनाच्या कामात धावपळ वाढेल. विरोधक दिशाभूल करतील. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. शुभ दि. २०, २३

वृश्चिक – या सप्ताहात मेष राशीत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला राजकीय-सामाजिक महत्त्वाचा निर्णय घेता येईल. विरोधक आरोप करतील. तुम्हाला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला जाईल. धंद्यात वाढ करता येईल. संधी सोडू नका. मोठे लोक कदाचित तुमची परीक्षा घेतील. संसारातील नाराजी दूर होईल. मौज-मजेचा बेत ठरवाल. कला-क्रीडा क्षेत्रात उत्साहवर्धक घटना घडेल. प्रतिष्ठा, नावलौकिक वाढेल. प्रेमाला चालना मिळेल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. (Weekly Rashifal March 2024) बदलीची शक्यता आहे. संशोधनाच्या कामात यश खेचून आणता येईल. मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल. विद्यार्थ्यांनी गुरुजनांना कमी लेखू नये. शुभ दि. १७, १९

मकर – या सप्ताहात मेष राशीत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात मोठे कंत्राट मिळू शकेल. विचारपूर्वक करार करा. घरातील कामे होतील. सप्ताहाच्या सुरुवातीला वाद होईल. रागावर ताबा ठेवा. शांततेतून मार्ग काढा. राजकीय-सामाजिक कार्यात स्वतःचा विचार पक्का ठेवा. ऐकावे जनाचे करावे मनाचे धोरण अवलंबवा. शेअर्समध्ये गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा योग्य सल्ला घ्या. तुमच्या खांद्यावर कुणी बंदूक ठेवतो आहे का ते नीट तपासून पाहा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. वरिष्ठांचा मान ठेवा. विद्यार्थी वर्गाने उद्धटपणे वागू नये. वाहन जपून चालवावे. नियम पाळावे. कोर्ट कचेरीच्या कामात किरकोळ अडचण येईल. शुभ दि. १९, २१

कुंभ – या सप्ताहात मेष राशीत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. उद्योग-धंद्यात मोठी उलाढाल करता येईल. फायदा होईल. शेअर्समध्ये गुंतवणूक लाभदायक ठरेल. तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. घरातील व्यक्तींना खूश ठेवता येईल. त्यांच्यासाठी खरेदी कराल. प्रेमाला चालना मिळेल. (Weekly Rashifal March 2024) विवाहासाठी योग्य स्थळे मिळतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व फारच प्रभावी ठरेल. लोकांचे प्रेम पाहून अंतःकरण भरून येईल. कला-क्रीडा-साहित्यात प्रगती, प्रसिद्धी होईल. नोकरीत चांगला बदल करता येईल. कोर्ट केस संपवा. संशोधनाच्या कामात यशस्वी व्हाल. विद्यार्थी वर्गाचे स्वप्न पूर्ण होईल. घर घेता येईल. परदेशात जाण्याचे ठरवाल. शुभ दि. २०, २२

मीन – मेष राशीत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश होत आहे. धंद्यात काम मिळाले तरी करून घेताना रागावर ताबा ठेवा. नोकरवर्गाची नाराजी दूर करा. थकबाकी मिळवण्याचा प्रयत्न करा. नवीन राजकीय-सामाजिक कार्यात वर्चस्व वाढेल. पदाधिकार मिळेल. लोकांचे सहकार्य मिळेल. मन स्थिर ठेवा. डोक्यात हवा जाऊ देऊ नका. शांततेतून प्रश्न सोडवा. नोकरीत दबाव राहील. सहकारी मदत करतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. तडजोड करावी लागेल. संशोधनाच्या कामात धावपळ होईल. तुमची प्रगती पाहून जेलसी करणारे लोक वाढतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष घ्यावे. परदेशात जाण्याची संधी मिळेल. विरोधाकडे लक्ष देऊ नये. सौम्य धोरण ठेवा. शुभ दि. २१,२३

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular