Saturday, June 22, 2024
Homeलाइफस्टाइलआयुष्यात कुठलीही गोष्ट अवघड नसते.. विश्वास ठेवा सत्याच्या पाठीमागे नेहमीच देव असतो.!!

आयुष्यात कुठलीही गोष्ट अवघड नसते.. विश्वास ठेवा सत्याच्या पाठीमागे नेहमीच देव असतो.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे
स्वागत आहे.!! श्री स्वामी समर्थ. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणे योग्य असते, कारण जोपर्यंत समोरच्याचे मन मोकळे होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षातच येत नाही. तुम्ही एक वेळ पैसा गमावला तरी चालेल पण वेळ कधीही गमावू नका. वेळेचा उपयोग करणाऱ्या माणसाच्या पायाशी धन आणि वैभव हे चालत येते. आपली अडचण आयुष्यभर संपत नाही.

रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपून टाकतो. नाते आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. नाते ठेवा अथवा ठेवू नका विश्वास मात्र नक्कीच ठेवा. कारण जिथे विश्वास असतो तिथे नाते आपोआप बनत जाते. सुखासाठी कधी हसावे लागते तर कधी रडावे लागते. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावे लागते.

प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबातच असते असे नसते. आपल्याकडे जे आहे आपण त्यात समाधानी कधीच नसतो. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. नाते कितीही वाईट असले तरी ते कधीही तोडू नका कारण पाणी कितीही घाण असले तरी ते तहान नाही पण आग विजवू शकते. जेव्हा सगळे असून सुद्धा खूप एकटे एकटे, वाटते जेव्हा कोणाशी बोलायची इच्छा राहत नाही, सतत खूप नकरात्मक भावना येत असतात, ज्यांच्यावर खूप विश्वास असतो तेच मन दुखावतात, पण ठीक आहे हेच दिवस तुम्हाला माणसांची ओळख करून देतात.

शेवटी आपणच असतो स्वतःला सांभाळणारे पण ठीक आहे ही वेळ सुद्धा निघून जाते. आपण पुढे जायचं असते. विचार येतो रोज की नेहमी मिच का.? भेटणारी सगळी माणसे वाईट का भेटतात. जे ठरवलं आहे ते कधी पूर्ण होणार.? माझ्या जीवनातील सगळे अडचणी कधी संपणार, पण मग विचार येतो की सगळ्या गोष्टींना वेळ लागतो. असे एकाच दिवशी काही होत नाही. जर कधी एकटे वाटले कोणी सोबत नाही अशी जाणीव झाली सगळे दुर्लक्ष करतात असे वाटले तर स्वतःला सांगा की तुम्हाला कोणाचीच गरज नाही आहे. तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी हँडल करू शकता.

फक्त अजून थोडे दिवस जाऊ दे मग सगळे ठीक होईल. ओंजळीत बसेल एवढे नक्की घ्या पण सांडण्या अगोदरच ते वाटायलाही शिका. माणुसकी कमी होत चालली आहे तेवढी फक्त जपायला शिका. तू बेस्ट आहेस हे कधीच विसरू नकोस. मग कुणी काही बोलले तरी जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास असतो ना तेव्हा लोकांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही. कुणी दुर्लक्ष केले तर वाईट वाटून घेऊ नका. कारण लोक त्यांनाच दुर्लक्ष करतात जे त्यांच्या इथपर्यंत पोहोचू शकत नाही.

उलट त्याने आपल्याला समजते की माणसे कशी असतात. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात आता ते तुम्ही ठरवा की नकारात्मकतेने घ्यायचे की सकारात्मकपणे. करिअर निवडणे कठीण असते जोडीदार निवडणे कठीण असते वाईट काळात खंबीर राहणे कठीण असते जोखीम घेणे कठीण असते आणि हे कधीच संपणार नाही आहे. तुम्हाला कुठून सुरुवात करायची आहे हे ठरवा कारण गोष्टी अजून कठीण होत जाणार आहेत. प्राधान्य कुणाला द्यायचे ठरवा कधीतरी एक निर्णय घ्यावा लागेल जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल. एकदा खूप रडून घ्यावे लागेल आणि तो विषय तिथेच संपवावा लागेल. लोक नाकारतील तेव्हा ते स्वीकारून पुढे जावे लागेल कधीतरी आयुष्यात एक असे वळण घ्यावे लागेल ज्याची तुम्हाला भीती वाटत असेल विचार बदलावे लागतील.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular