Sunday, December 3, 2023
Homeआध्यात्मिकपूजा करतांना शरीराला झटका लागणे, अंगावर शहारे येऊन काटा उभा राहणे, डोळ्यांत...

पूजा करतांना शरीराला झटका लागणे, अंगावर शहारे येऊन काटा उभा राहणे, डोळ्यांत पाणी येणे इ. संकेताबद्दल नक्की जाणून घ्या.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो आपल्या जीवनात वास्तुशास्त्रमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपल्या जीवनात घडणार्‍या घटनांचा आपल्या आयुष्यामध्ये पुढे परिणाम दिसून येतो. आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी या काही संकेत देऊन जात असतात.

त्या संकेतांचा वाईट किंवा चांगला परिणाम दिसून येत असतो. परंतु हे संकेत आपल्या लक्षात येत नाहीत. आपण याकडे दुर्लक्ष करतो. देवपूजा करत असताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी जाणवत असतात. या गोष्टी घडण्यामागे कारण कोणते असेल हे आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही.

मित्रांनो, काही लोक असे म्हणतात की नकारात्मक शक्तीच्या कारणांनी अंगावरती शहारे येऊन काटा उभारणे, डोळ्यात पाणी येणे, शरिरास झटका बसणे अशा गोष्टी होत असतात. असे का होते? हे आज मी तुम्हाला सांगणार आहे.

डोळ्यात पाणी येणे, शरीरास झटका लागणे, अंगावर शहारा येणे, पाठ भरणे या गोष्टी सर्वांनाच होतात असे नाही. तर या गोष्टी जे नेहमी पूजा आर्चा करत असतात त्यासोबतच या गोष्टी घडत असतात. ही गोष्ट नकारात्मक नसून सकारात्मक स्वरूपाची आहे.

झटका लागण्याचे कारण असे आहे की, जेथे तुम्ही कोठेतरी नकारात्मक ठिकाणी जाता जेथे या शक्तिंचा वास असतो. तेथे गेल्यावर आपल्याला झटका बसतो. कारण पण तुम्ही ज्या देवतेची पूजा करता त्यामुळे आपल्या शरीरात त्या भक्तीचा वास असतो.

त्याच्यामुळे आपल्या शरीराभोवती सुरक्षा कवच निर्माण होते. त्यामुळे आपल्याला झटका बसतो. त्यानंतर कोणीतरी तुमच्यावर करणी करत असेल तर त्यामुळे देखील आपल्याला झटका लागतो. कारण आपण ज्या देवाची भक्ती करत असतो त्याचा वास आपल्या शरीरामध्ये झालेला असतो. त्यामुळे कोणत्याही वाईट किंवा नकारात्मक गोष्टी आपल्यावर होत असतील तर एक संकेत म्हणून आपल्याला झटका बसतो.

मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या डोळ्यात पाणी का येते? ज्या देवाचे तुम्ही रोज भक्ती किंवा पूजा करत असता त्या देवाची प्रतिमा असते ती तुमच्या मनामध्ये रुजू झालेली असते. कोणत्याही देवाला तुम्ही स्वतःला अर्पण करता म्हणजे एक नातं बनवता.

जेव्हापण तुम्ही त्यांचे नामस्मरण करतात किंवा त्यांच्या मंत्रांचा जप करता त्यांच्या महिमेस ऐकताना त्यावेळी तुमच्या अंगावर शहारे उमटतात. तुमच्या डोळ्यासमोर त्यांची प्रतिमा निर्माण होते आणि त्या वेळी डोळ्यात पाणी येते.अंगावरती शहारे तेव्हाच उमटतात जेव्हा तुम्ही भजन किंवा इषट देवतेचे नाव आईकता ती तुमच्याशी खोट बोलत असेल तेव्हा देखील तुमच्या अंगावर शहारे उमटतात.

तर मित्रांनो असे हे वेगवेगळ्या प्रकारचे संकेत आपल्याला मिळत असतात. तर हे संकेत तुमच्या जीवनात जर होत असतील तर या मागचे कारण नक्कीच जाणून घ्या. या संकेतांचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होऊ नये याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular