नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येक जण हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे भक्त आहोत. अगदी मनापासून ते अगदी मनोभावे सेवा, व्रत करीत असतात. आपल्या येणाऱ्या प्रत्येक अडचणीतून बाहेर काढण्याचे हे प्रार्थना देखील करीत असतात. तर मित्रांनो आपल्या भगवान शंकरांचे अनेक जण भक्त आहेत. सोमवार हा महादेवांचा वार मानला जातो. महादेवांना देवांचे देव मानले जाते. महादेव हे दयाळू आणि कोमल मनाचे आहेत. महादेव व्यतिरिक्त शंकर, भोलेनाथ इत्यादी नावांनी भगवान शिव ओळखले जातात.
भगवान शिवाच्या मुख्य गणांपैकी महाराज नंदी हा त्यांचा सर्वात आवडता गण आहे. मित्रांनो, मंदिरांमध्ये शंकराच्या मूर्तीसमोर नंदीची मूर्ती अनेकदा तुम्ही पाहिली असेल. भगवान शंकराची पूजा करताना नंदीची पूजा करणे देखील आवश्यक मानले जाते.
मित्रांनो नंदीची पूजा केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात. एकटा नंदी भक्तांच्या प्रत्येक इच्छा भगवान शिवापर्यंत पोहोचवतो. हिंदू धर्मग्रंथानुसार नंदीची पूजा शिवापुढे केली जाते. भगवान शिव नंदीद्वारेच पूजा स्वीकारतात. भक्त नंदीच्या माध्यमातून भोलेनाथांना आपल्या मनोकामना पोहोचवतात.
असे म्हणतात की महादेवानेच महाराज नंदीला हे वरदान दिले होते की, जर एखाद्या भक्ताने आपली इच्छा तुमच्या कानात बोलली तर त्याची इच्छा माझ्यापर्यंत पोहोचेल आणि ती लवकरच पूर्ण होईल. म्हणूनच नंदीच्या कानात इच्छा देण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. पण, नंदीच्या कानात तुमची इच्छा सांगण्याचे काही नियम आहेत. ते नियम आता जाणून घेऊयात..
तर मित्रांनो शास्त्रानुसार भगवान शंकराचा जलाभिषेक केल्यानंतर नंदीची पूजा करावी. जर नंदीच्या डाव्या कानात आपली इच्छा सांगितली तर ती लवकरच पूर्ण होईल. आपली इच्छा बोलताना हे महाराज नंदी माझी मनातील इच्छा पूर्ण करो हेही म्हणायला हवे.
मित्रांनो, असे मानले जाते की, महादेव तपश्चर्येत मग्न असल्यामुळे आपली इच्छा ऐकू शकत नाहीत. त्यामुळे भक्तांनी आपली कोणतीही इच्छा महाराज नंदीच्या कानात सांगितली तर तपश्चर्या केल्यानंतर भगवान शिव नंदीद्वारे सर्व इच्छा ऐकतात.
कोणतीही मनोकामना आपल्याला नंदीच्या कानात बोलायची नाही. कोणतीही इच्छा व्यक्त करायची नाही. फक्त हे तीन शब्द आपल्याला नंदीच्या कानात बोलायचे आहे.तुमची जी काही इच्छा असेल ती शिवपूजा करताना शिवलिंगावर जेव्हा तुम्ही अभिषेक करत आहात ती पूजा झाल्यानंतर तिथेच आपली इच्छा व्यक्त करायचे आहे. त्यानंतर बाहेर येताना नंदीच्या कानात हे तीन शब्द तुम्हाला बोलायचे आहेत.
हे तीन शब्द आहेत ओम नमः शिवाय. मित्रांनो हा भोलेनाथांचे अगदी साधा सोपा सर्वांना माहीत असलेला मंत्र आहे. हाच मंत्र आपल्याला नंदीच्या कानात अकरा वेळा बोलायच आहे. मित्रांनो जेव्हा तुम्ही हा मंत्र बोलणार आहात तेव्हा नंदीच्या कानात हळू आवाजात जेणेकरून बाजूच्या व्यक्तीला आपला आवाज जाणार नाही. अशा प्रकारे नंदीच्या कानात हे तीन शब्द म्हणजेच ओम नमः शिवाय हा मंत्र आपल्याला अकरा वेळा बोलायचा आहे.
तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जेव्हा शिव मंदिरात जाता आणि त्यावेळेस नंदीच्या कानामध्ये बोलता त्यावेळेस हे सर्व नियम तुम्ही अवश्य लक्षात ठेवायचे आहेत. त्यामुळे आपली जी इच्छा असेल ती भोलेनाथ पूर्ण करतील.
टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!