Sunday, December 3, 2023
Homeआध्यात्मिकमनाने चांगल्या असणाऱ्या माणसां सोबतच नेहमी वाईट का घडते.? बघा श्रीकृष्ण काय...

मनाने चांगल्या असणाऱ्या माणसां सोबतच नेहमी वाईट का घडते.? बघा श्रीकृष्ण काय सांगतात..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! अनेकदा होते असे की.. तुम्ही कुणालाही कधी त्रास देत नाही, कधी शब्दाने सुद्धा दुखावत नाही तरीही अनेक समस्या अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागतो.. हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. मी कोणाचे वाईट करत नाही. कोणाविषयी वाईट बोलत नाही. मी सर्वांचे चांगले व्हावे असा विचार करतो परंतु; तरीही नेहेमी माझ्याबरोबरच वाईट घटना का घडतात.? माझ्या विषयी लोकांचे मन खराब का होते.? मी नेहेमी नेहेमी सर्वांचे आचरण करतो परंतु; माझ्या सोबतच असे का.?

असा प्रश्न आपल्याला नेहेमी आपल्याला सतवत असतो. आणि वाईट कर्म करणारे लोक नेहेमी आनंदात राहतात. त्यांना कोणत्याही प्रकारचे दुख होत नाही. असे का.?

यावर श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले उत्तर –

तर, एकदा अर्जुनाने श्री कृष्णाला विचारले की, भगवंता नेहेमी चांगल्या व खर्‍या लोकांसोबत वाईट का घडते? तेव्हा श्री कृष्णाने अर्जुनाला एक गोष्ट सांगितली. या गोष्टीतच आपल्याला सतवणार्‍या सर्व प्रश्नाचे उत्तरे श्री कृष्णाने दिली आहेत.

एका गावात एक व्यापारी राहत होता. तो खूप धार्मिक ऋतीचा होता. त्या बरोबरच प्रामाणिक ही होता. तो प्रामाणिकपणे आपले काम करून आनंदात जीवन व्यतीत करीत होता.

रोज मंदिरात जाणे. तेथे पूजा अर्चना करणे. व त्यानंतर आपल्या दिवसाची सुरुवात करणे, हा त्याचा रोजचा दिनक्रम होता. त्याच गावात दूसरा एक माणूस राहत होता.

तो अगदी या माणसाच्या अगदी उलट होता. तो खूप दुराचारी होता. दुसर्‍यांना त्रास देण्यातच आनंद वाटत असे. लोकांचा छळ करणे, लोकाना लुटणे-लुभाडणे हेच त्याची कामे असे. तो असुरी प्रवृतीचा होता. तो देव धर्म मानत नसे.

भगवंताचे नाव तर तो कधीच घेत नसे. परंतु; अधून मधून तो मंदिरात जात असे. त्या मागचे त्याचे कारण असे होते, की त्याला दानपेटीतले पैसे चोरायचे असायचे. मंदिरात जाऊन ही तो भगवंताच्या दानपेटीतील पैसे तो नेहेमी चोरत असे.

असेच अचानक एके दिवशी त्या गावात खूप जोरात पाऊस पडत होता. कोणी त्या दिवशी घराबाहेर निघाले नाही. सगळीकडे चिखल-चिखल झाला होता. या संधीचा फायदा घेवून तो चोर मंदिरात गेला.

व मंदिरातील दानपेटी फोडून तो भगवंताचेसर्व पैसे तो चोरू लागला. व तेथील पूजार्‍याचा डोळा फोडून तो तेथून पसार झाला. थोड्या वेळाने पाऊस कमी झाला. व रोजच्या प्रमाणे तो व्यापारी मंदिरात दर्शनासाठी आला.

व्यापारी मंदिरा आत गेला त्या पाठोपाठ पुजारी गेला. दानपेटी फोडलेली आहे व त्यातील भगवंताचे पैसे चोरीला गेलेले पाहून पूजारी जोरजोरात ओरडू लागला. पूजार्‍याचा आवाज ऐकून गावातील सर्व लोक तेथे जमून खूप गर्दी जमा झाली.

पूजारी व गावातील सर्व लोक व्यापर्‍यावर संशय घेवू लागले. तेव्हा व्यापर्‍याने स्वतची खरी बाजू मांडण्याचा व सर्वांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचे कोणीही ऐकून घ्यायला तयार होत नव्हते. व्यापर्‍याला मंदिरात

घडलेल्या प्रसंगाने त्याला खूप वाईट वाटू लागले . अपमानित व्यतिथ झालेला व्यापारी मदिरांतून बाहेर पडतो. मंदिराबाहेर निघाल्यावर तो रस्त्याने चालत जात असताना त्याला एका गाडीची धडक लागते व त्याला खूप लागते.

त्याचे संपूर्ण अंग दुखू लागते. पण तो तसाच उठून रस्त्याने परत चालायला लागतो. एकीकडे त्याच रस्त्याने तो चोर पैसे चोरून जात होता. रस्त्याने जात असताना त्याला रस्त्यात एक पैशयाचे गाठोडे सापडते.

तो खुश होऊन म्हणून लागला. की आजचा दिवस तर माझ्यासाठी खूपच चांगला आहे. मंदिरातील दान पेटितून इतके पैसे मिळाले

आणि रस्त्यातून पैशयाचे गोठोडे मिळाले. मी तर आज करोडपती झालो असे तो स्वताच्या मनाशी बडबडत असतो. हे सर्व चोराचे बोलणे व्यापार्‍याच्या कानावर पडते. व व्यापर्‍याला खूप वाईट वाटू लागते. आपण भगवंताचे पूजा आरचना करतोत.

प्रामाणिक पणे आपले काम करतोत. कोणाविषयी वाईट काही चिंतित नाही तरी आपल्या बाबतीत असे का झाले तो विचार करू लागतो.तेवढ्यात तो ताबडतोब घरी गेला. व घरातील सर्व देवांचे मूर्ती व फोटो काढून टाकले.

त्याचा भगवंतावरील विश्वास नाहीसा झाला. बरेच वर्ष उलटून गेल्यावर कालांतराने चोराचा व व्यापार्‍याचा दोघांचाही मृत्यू झाला.

यमराज दोघांनासोबत घेवून जात असताना व्यापर्‍याने यमराजला प्रश्न केला की मी तर नेहेमी चांगले कार्य केले नाही. कोणाचे काही वाईट केले नाही तरी माझ्यासोबत असे का घडले आणि हा माणूस तर दुसर्‍यांचे वाईट चिंतित असतो,

चोरी, लबाडी, फसवणूक या शिवाय याला दुसरे काहीही येत नसे. तरीही याला धनाची गाठोडी व मला अपमान, जखमा असे का ?

तेव्हा यमराजाने व्यापर्‍याला संगितले की ज्या दिवशी तुझा अपमान होऊन दुर्घटना झाली. तो दिवस तुझ्या मृत्युचा दिवस होता. तुझे आयुर्मान तेव्हाच संपलेले होते.

परंतु; तुझ्या चांगले वागणे व भगवंताविषयी आस्था यामुळे तुझा मृत्यू झाला नाही. त्यातून तू सुखरूप पणे बाहेर पडलास. आणी हा जो चोर आहे याचा त्याच दिवशी राजीव होता. परंतु: त्याचे वाईट वागणे व भगवंताला न माणणे.

यामुळे त्याचा राजीव थोड्या पैश्यांवर थांबला. त्याला थोडेसे पैसे मिळाले पन त्याला राज योगाचा काहीच फायदा झाला नाही. हे सत्य व्यापर्‍याला कळल्यानंतर तो भगवंताचे आभार मानतो. व भगवंताविषयी कृतज्ञता मानू लागला.

श्री कृष्ण सांगतात की केलेले चांगले किवा वाईट काम याचे फळ आपल्याला आवश्य मिळते. भगवंत आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात काय देईल हे सांगता येत नाही. जर तुम्ही चांगले कार्य करीत आहात.

वाईट कामांपासून दूर राहता. तर भगवंत नेहेमी तुमच्या पाठीशी असतील व नेहेमी तुमच्यावर कृपा करतील. जर आपल्यावर काही संकट आले असतील तर असे समजू नकात की भगवंताने आपली साथ सोडली

असेल कदाचित आपल्या वाईट घटना घडायच्या योग असू शकतात. त्या संकटाचा आपल्याला कमी त्रास होतो. तुमचे कर्म चांगले असल्या कारणामुळे तुम्हाला या दुखाचा  अडचणीचा काळ कमी भोगावा लागतो.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular