Sunday, December 3, 2023
Homeआध्यात्मिकमार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरूवारचे उद्यापन करणं शक्य नसल्यास.. करा ही सेवा.. माता लक्ष्मी...

मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरूवारचे उद्यापन करणं शक्य नसल्यास.. करा ही सेवा.. माता लक्ष्मी प्रसन्न होतील.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की, महालक्ष्मीचा पवित्र महिना मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि या महिन्यात विवाहित महिला गुरुवारचे व्रत करतात. हे व्रत करण्यामागे एकच उद्दिष्ट असते की, त्यांच्या घरात सुख समृद्धी नांदो,

त्यांच्या पतीवर, मुलांवर कोणती अडचण येऊ नये आणि त्यांना सौभाग्याची जी इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होवो आणि त्यांचे सौभाग्य कायम राहो. मित्रांनो महालक्ष्मी या महिन्यात प्रसन्न होते आणि ती आपल्या भक्तांवर कृपा करत असते आणि भरपूर महिला या महिन्यात गुरूवारची व्रत करतात. आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात. 5 किंवा 8 किंवा 9 किंवा 10 किंवा 11 विवाहित महिलांना घरी बोलावून ते उद्यापन करत असतात. त्या महिलांची ओटी भरत असतात. त्यामध्ये फळ किंवा महालक्ष्मीची एक एक पोती भेट स्वरूपात महिला देत असतात.

आणि खिरीचा प्रसाद सुद्धा केला जातो. जर तुम्हाला उद्यापन करणे शक्य नसेल तर तुम्ही काय करावे? मित्रांनो अशा वेळेस तुम्ही एक काम करू शकतात जर तुम्हाला उद्यापन करायचे आहे किंवा तुम्ही प्रवासात आहात किंवा तुम्ही कुठे तरी कामात आहात तुम्ही बायकांना विवाहित महिलांना बोलवू शकत नाही, तर तुम्ही एक काम अवश्य करू शकता. तर हे काम करण्यासाठी तुम्हाला फक्त एका विवाहित स्त्रीची गरज लागेल. एक विवाहित स्त्रीला घरी बोलावून तुम्ही तिची ओटी भरू शकता. ओटीमध्ये तुम्ही गहू किंवा तांदूळ देऊ शकतात आणि गोड काहीतरी खीर किंवा कोणतीही मिठाई प्रसाद म्हणून देऊ शकता.

एक फळ आणि महालक्ष्मीची पोती भेट स्वरूपात देऊ शकता. महिला विचार करतील की, आम्हाला एक स्त्रीला बोलावणे सुद्धा शक्य असेल तर आम्ही काय करावे. तर मित्रांनो अशा वेळेस महिलांनी विवाहित महिलेला जर घरी बोलवायचं नसेल किंवा बोलवू शकत नसाल तर तुम्ही फक्त महालक्ष्मीची ओटी शेवटच्या गुरुवारच्या दिवशी भरावी. महिलांना बोलावले नाही तरी चालते. फक्त महालक्ष्मीची ओटी तुम्ही कशानेही तांदूळ, गहू किंवा ब्लाउज पीस किंवा एक फळ आणि एखादी मिठाई आणि दक्षिणास्वरूप महालक्ष्मीला तुम्ही दान स्वरूपात किंवा भेट स्वरूपात देऊ शकतात.

आणि ती ओटी नंतर तुम्ही कोणत्याही मंदिरात जाऊन ठेवू शकता किंवा कोणत्याही गरिबाला तुम्ही ती दान देऊ शकता. जर तुम्हाला विवाहित महिलांना घरी बोलवणे शक्य नसेल किंवा एकही विवाहित महिलेला घरी बोलणे शक्य नसेल..

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular