Monday, July 15, 2024
Homeआध्यात्मिकया 3 महिलांनी श्रावणी सोमवारचे व्रत चुकूनही करू नये.!!

या 3 महिलांनी श्रावणी सोमवारचे व्रत चुकूनही करू नये.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो, भगवान महादेव अत्यंत मनमोहक आहेत, ते आपल्या भक्तांना आपल्या आश्रयामध्ये घेऊन त्यांची सर्व संकट, बाधा दूर करतात आणि त्यांना जगभरातील सर्व सुख संपन्नता देतात. परंतु ज्यापण व्यक्तीवर ते रुष्ट होतात रागावतात, त्यांना ते स्वतःपासून कायमचे दूर करतात आणि पुन्हा त्यांच्याकडे कधीही बघतत नाहीत.

आता श्रावण महिना सुरु आहे, श्रावण महिना हा व्रत आणि वैकल्यांचा उपवासांचा महिना समजला जातो. तसेच हा श्रावण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे, त्यामुळे या श्रावण महिन्यात संपूर्ण वातावरण हे महादेवांच्या शिवमंत्रांनी आणि एका पवित्र उर्जेने भारुन गेलेले असते. श्रावण महिन्यात सर्व भक्तगण पूर्ण विधीपूर्वक प्रार्थना करतात आणि महादेवांच्या भक्तीत लीन होतात.

भगवान महादेव कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या परम भक्तांमध्ये विराजमान आहेत. भोळेशंकर जे प्रत्येक भक्तावर आपल्या कृपेचा अमृत वर्षाव करत असतात, परंतु तरीही काही लोकांना ते कोण आहेत हे जाणून घ्यायची इच्छा असूनही त्यांना त्यांच्या कृपेचा लाभ मिळत नाही, असे लोक कोण आहेत आज याबद्दल सांगणार आहोत.

त्याआधी जाणून घेऊया अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्या महादेवांना कधीही अर्पण करू नयेत, शास्त्रानुसार या गोष्टी शिवावर अर्पण केल्याने कोप होतो. म्हणूनच या तीन गोष्टी भगवान महादेवांना भक्तांनी कधीही अर्पण करू नयेत. चला तर मग जाणून घेऊया या तीन गोष्टी कोणत्या आहेत.

तुळसीपत्र – तुलसी पत्र हा प्रत्येक पूजेच्या साहित्याचा विशेष भाग असतो. तुलसीपत्रांचा उपयोग शुभ प्रसंगी केला जातो, तुलसीपत्रांचा वापर भगवान श्री विष्णूच्या पूजेत केला जातो, भगवान महादेवांची पूजा करताना तुलसीपत्र वापरू नका कारण तुळस ही भगवान विष्णूची पत्नी आहे.

शंख – भगवान महादेवांच्या पूजेमध्ये शंखाचा वापर करू नका, कारण शंखचूड नावाच्या राक्षसाचा भगवान महादेवांनी वध केला आणि त्याच्या भस्मापासून शंख जन्माला आला. महादेवांना शंखाने जल अर्पण केल्याने शंकर क्रोधित होतात. त्यामुळे शंखाचा वापर करू नये.

केतकीचे फूल – पुराणात वर्णन केलेल्या एका कथेनुसार, ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातील वादात केतकीने ब्रह्माजींचे खोटे बोलणे समर्थन केले. या वादात भगवान महादेव निर्णायक ठरले आणि केतकीचे खोटे पकडले आणि तिला शाप दिला की तिचे फूल माझ्या पूजेत वापरले जाणार नाही. तेव्हापासून केतकीचे फूल जरी महादेवांना पांढऱ्या रंगाचे फुल प्रिय असले तरी अर्पण केले जात नाही. तर या होत्या त्या धार्मिक वस्तू ज्या भगवान शिवांच्या पूजेत वापरू नयेत.

चला आता आपण जाणून घेऊयात की श्रावणी सोमवारचे व्रत कोणत्या लोकांनी ठेऊ किंवा करु नये. महादेव खूपच सरळ आहेत पण त्यांची भक्ती करणे सर्वांसाठी सोपे नसते, महादेवांची आराधना करण्यासाठी स्वतः महादेवांसारखे असावे लागते. जो महादेवांसारखा नसतो त्याला भगवान महादेव स्वतः त्याच्यापासून लांब करतात.

मित्रानो भगवान महादेव यांचा स्वभाव सहज, सरळ आणि कपट रहित असतो म्हणून जे लोक कपटी व दृष्ट असतात शिवजी त्यांच्यावर कधीच लक्ष देत नाहीत. मग त्यांनी कितीही महादेवांची आराधना केली तरी महादेव त्यांच्यावर आपली कृपा दृष्टी टाकत नाहीत.

महादेव हे शांत स्वभावाचे आहेत आणि विनाकारण सतत भांडण व वादविवाद करणाऱ्या स्त्रीला महादेव कधीही पसंद करत नाहीत. अशा स्त्रीने श्रावणी सोमवारचे व्रत जरी केले तरी देखील त्या स्त्रीला त्या व्रताचे फळ कदापि मिळत नाही.

भगवान महादेव मोह माया पासून कोसो दूर आहेत. त्यामुळे जी स्त्री लालची आहे जे मिळाले आहे त्यामध्ये संतुष्ट न होता दुसऱ्यांच्या वस्तू प्रती आकर्षित होते अशा लोकांना भगवान महादेवांचा आशीर्वाद कधीच मिळत नाही.

भगवान महादेव नारी शक्तीचा मान करणारे आहेत त्यामुळे जे लोक स्त्रियांचा आदर करत नाहीत, पर स्त्रीवर वाईट दृष्टी टाकतात..ब’ ला’ त्कार, छे’ ड काढतात असा पुरुष कधीच शिवजी यांचा भक्त असू शकत नाही असा व्यक्ती महादेवांच्या कृपेपासून वंचित राहतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular