Saturday, June 15, 2024
Homeलाइफस्टाइलया 5 व्यक्तींवर चुकूनही विश्वास ठेवू नका, अन्यथा तुमचं पतन निश्चितच.!!

या 5 व्यक्तींवर चुकूनही विश्वास ठेवू नका, अन्यथा तुमचं पतन निश्चितच.!!

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! आचार्य चाणक्य त्यांच्या आयुष्यातील कडू आणि गोड अनुभवांमधून जे काही शिकले, त्याचे सार चाणक्य निति ग्रंथात लोकांना अगदी सोप्या शब्दात स्पष्ट करुन सांगितले आहे. आणि आजही प्रत्येक व्यक्ती आचार्य यांनी सांगितलेल्या धोरणांचे अनुसरण करून आपले जीवन सुखी बनवू शकतो.

चाणक्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान हे चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे. जगभर आजही चाणक्यनीतीकडे कुतूहलाने आणि आदरानेण पाहिले जाते. आचार्य चाणक्य हे तक्षशीलेच्या गुरुकुलात अर्थशास्त्राचे आचार्य होते.

राजनीती आणि कूटनितीतही त्यांनी प्रचंड मोठे कार्य केले आहे. आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांच्या रचना देखील केलेल्या आहेत. त्यात निती शास्त्रांवरील ग्रंथाचाही समावेश आहे. नीतीशास्त्रावरील ग्रंथ म्हणजेच चाणक्य नीती. जीवनात यशस्वी कसे व्हावे याविषयी खासकरून यात मार्गदर्शन आहे.

धोरणांचे उत्तम जाणकार असलेले आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात म्हणजेच चाणक्य नितीत अशा प्रकारच्या 5 गोष्टींचे वर्णन केले आहे, ज्यावर कधीही विश्वास ठेवू नये.

या 5 गोष्टी आपणास कधी इजा पोहोचवतील याबाबतीत काहीच सांगु शकत नाही. या गोष्टी कधीही आपल्याला दुखवू शकतात. चला तर मित्रांनो, या 5 गोष्टींबद्दल जाणून घेऊया …

आचार्य चाणक्य यांनी एका धोरणात सांगितले आहे की आपण कोणावर विश्वास ठेवू नये जेणेकरुन आयुष्य आनंदी राहील.

आचार्य चाणक्य म्हणतात –

नदीनां शस्त्रपाणीनां नखीनां श्रृंगीणां तथा।
विश्वासो नैव कर्तव्य: स्त्रीषु राजकुलेषु च।।

अर्थ- नदी, स-श-स्त्र, मोठी नखे आणि शिंगे असलेला प्राणी, चंचल स्त्री तसेच राजघराण्यातील माणसावर कधीही विश्वास ठेवू नका.

1) आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार नदी ओलांडताना कधीही दिशाभूल होऊ नये म्हणून, नदीची खोली आणि प्रवाह जाणून घेतल्यानंतरच पुढे जायला हवे. आपण कधीही नद्यांवर विश्वास ठेवू नये.

चाणक्य म्हणतात की ज्या नद्यांचे पूल अपुर्ण आहेत, जीर्ण अवस्थेत आहेत त्या नदीवर विश्वास ठेवू नये कारण नदीचा प्रवाह कधी वेगवान होईल हे कोणालाही कळू शकत नाही ज्यामुळे आपले जीवन धोक्यात येऊ शकते.

2) आचार्य चाणक्य म्हणतात की शस्त्र बाळगणार्‍या व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. ते कधीही आपल्यावर हल्ला करू शकतात. श-स्त्रा-स्त्र धारक कधीही रागावू शकतो आणि आपल्या विरुद्ध श-स्त्र वापरु शकतो.

3) आचार्य चाणक्य या श्लोकात असे म्हणतात की सिंह, अस्वल, वाघ यासारखे लांब नखे असलेले प्राणी कधी तुमच्यावर आक्रमण करतील याबाबतीत काहीच कल्पना केली जाऊ शकत नाही. या प्राण्यांचे स्वरूप आक्रमक असते.

म्हणूनच ज्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला तो नेहमीच फसविला जातो. धारदार नखे आणि शिंगे असलेल्या प्राण्यांवर विश्वास ठेवल्यास जीवन धोक्यात येऊ शकते. प्राणी कोणत्याही वेळी भडकतात आणि आपले नुकसान करु शकतात.

4) आचार्य चाणक्य यांच्या मते, कधीकधी स्त्रियांबद्दल देखील सावधगिरी बाळगली पाहिजे. त्यांच्या मनात काय घडते हे सांगणे कठीण आहे, म्हणून त्वरित विश्वास ठेवू नका.

काही स्त्रिया चंचल असतात, अशा स्त्रिया त्यांच्या शब्दांवर ठाम राहू शकत नाहीत आणि वेळोवेळी त्यांचे विचार बदलत राहतात. म्हणुन अशा स्त्रियांवर विश्वास ठेवणारे अडचणीत येऊ शकतात.

5) चाणक्य म्हणतात की अगदी राजकुल किंवा प्रशासकीय यंत्रणेवरही विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. त्यांचे राजकारण नेहमी बदलत असते. सत्ता मिळविण्यासाठी ते कोणत्याही प्रकारचे निर्णय घेऊ शकतात आणि त्या निर्णयाने आपणास प्रचंड मोठी हानी पोहचू शकते.

त्यांचे मित्र आणि शत्रूही बदलत असतात. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. अशा लोकांवर विश्वास ठेवून, जर तुम्ही त्यांना आपल्या गु-प्त गोष्टी सांगितल्या तर ते आपल्या विरुद्ध या गोष्टींचा वापर करून आपल्याला फसवु शकतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular