नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! कोणत्या तारखेला जन्मलेल्या लोकांना मकर संक्रांतीला लाभच लाभ होणारे आणि त्यामध्ये तुमची जन्मतारीख आहे की नाही चला जाणून घेऊया. तर ज्योतिष शास्त्रानुसार जानेवारी महिना विशेष ठरणार आहे. काही महत्वाचे ग्रह या महिन्यात राशी परिवर्तन करत आहे याशिवाय 2023 मधील पहिला मोठा सण अर्थात मकर संक्रांति सुद्धा साजरी केली जाईल. मकर संक्रांतीचा सण देशभरात विविध पद्धतीने साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी ग्रहांचे विशेष योग जुळून येत आहेत आणि त्यापैकी सूर्य आणि शनी एकाच म्हणजेच मकर राशीत असणार आहेत.
ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य आणि शनि हे पिता-पुत्र जरी मानले गेले असले तरीसुद्धा ते शत्रु ग्रह आहेत. या दोन्ही ग्रहांची युती फारशी सकारात्मक मानली जात नाही. ज्योतिष शास्त्राच्या अनेक अशा शाखा आहेत त्यापैकी एक शाखा म्हणजेच अंकशास्त्र आणि या अंकशास्त्रात जन्मतारखेवरून भविष्य कथन केलं जातं. ग्रहांच्या चलनाचा आणि राशी परिवर्तनाचा परिणाम सुद्धा मुलांकावर दिसून येतो. मुलांक म्हणजे तो तुमच्या जन्मतारखेवर आधारित असतो. मकर संक्रांतीचा काळ कोणत्या मुलांकाना अर्थात कोणत्या जन्म तारखेच्या लोकांना वरदान ठरणारे ते आता आपण बघूया.
ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1 10 28 या तारखांना झाला असेल तर त्यांचा मुलांक असतो एक आणि या मुलांकाचा स्वामी आहे सूर्य. मुलांक एक असलेल्या व्यक्तींना येणारा काळ आत्मविश्वासाने परिपूर्ण असणारा असेल पण कामाच्या ठिकाणी विरोधकांच्या वर्चस्वामुळे मन अस्वस्थ मात्र होऊ शकतात आणि याचा परिणाम कामावरही होईल. शैक्षणिक क्षेत्राशी निगडित लोकांच्या कामाचा कौतुक होईल. नवीन संधी मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा आठवडा विशेष फलदायी ठरू शकतो. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला मात्र तुम्हाला दिला जातो.
त्यानंतरची जी जन्मतारीख आहे ती म्हणजे कोणत्याही महिन्याची 2 11 20 आणि 29. या तारखांना जर जन्म झाला असेल तर त्यांचा मूलांक आहे दोन. या मुलांकाचा स्वामी आहे चंद्र. मुलांक दोन असणाऱ्या व्यक्तींना येणारा काळ सकारात्मक असेल. उत्साहाने काम तुम्ही पूर्ण करू शकाल. सकारात्मक ऊर्जा तुमच्या भोवती फिरेल असं म्हणायला हरकत नाही. जुन्या समस्या संपण्याची वेळ आली असणार. अनोळखी लोकांकडून अनपेक्षित सहकार्य मिळेल. रखडलेली कामही पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात वरिष्ठांकडून कौतुकही होऊ शकतात.
ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3 12 21 30 या तारखांना झाला असेल तर त्यांचा मुलांक आहे तीन आणि या मूलांकाचा स्वामी आहे गुरु. मूलांक तीन असलेल्या व्यक्तींना येणारा काळ काहीसा संमिश्र असे अनुभव येतील. योग्य सतर्कता बाळगल्यास फसवणूक टळू शकेल. कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल आणि मित्रांचे सहकार्य तुम्हाला लाभेल कामाच्या योजना प्रत्यक्षात येतील. सुरुवातीच्या संघर्षानंतर यश मिळेल व्यवसायिक निर्णय मात्र विचारपूर्वक घ्यावेत.
आता ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4 13 22 31 या तारखांना झाला असेल त्यांचा मुलांक आहे चार आणि या मुलांचा स्वामी आहे राहू. मुलांक चार असलेल्या व्यक्तींना येणाऱ्या काळात फायदाच फायदा होईल. मोठा नफा होईल. कठोर परिश्रमाने कामे पूर्ण करा. नोकरी व्यवसायाशी संबंधित लोकांचा प्रभाव वाढेल. नशिबाच्या जोरावर कार्यक्षेत्रात यश आणि प्रसिद्धी मिळू शकेल. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी यशाचा आठवडा म्हणावा लागेल. सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा वाढेल.
आता ज्या व्यक्तींचा जन्म झाला आहे कोणत्याही महिन्याच्या 5 14 आणि 23 तारखेला त्यांचा मूलांक अर्थातच असणार आहे पाच. मुलांक पाच असलेल्या व्यक्तींना येणार आठवड्या सुद्धा संमिश्र असेल अनामिक भीती वाटेल. वर्तमानावर लक्ष केंद्रित करून काम पूर्ण करावी आर्थिक बाबींवर लक्ष द्यावे. स्वतः आर्थिक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित लोकांना चांगल्या संधी मिळू शकतील.
टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!