Thursday, June 13, 2024
Homeराशी भविष्यया राशींना आज नशिबाची किल्ली गवसणार.. परंतु मिळालेल्या यशाने हुरळून न जाता...

या राशींना आज नशिबाची किल्ली गवसणार.. परंतु मिळालेल्या यशाने हुरळून न जाता संयमाने वागा.!!

मेष – नवीन गोष्ट करून पाहण्याचा दिवस आहे. तातडीने काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणंही महत्त्वाचं. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल तुमचं मत बनवलं असेल, तर ते कायम ठेवा. एखाद्या खेळामध्ये असलेली तुमची रुची तुम्हाला आयुष्यात पुढे नेईल. तुमचे कामाचे प्लॅन आणि वैयक्तिक आवडी या दोन्हींवर एकत्रितपणे लक्ष देण्याची वेळ आहे. एखाद्या व्यक्तीला तुम्ही त्यांच्या टीममध्ये हवे आहात आणि ती व्यक्ती यासाठी प्रयत्नही करेल.

वृषभ – एखाद्या संस्थेकडून त्वरित प्रतिक्रिया मिळेल. कामाच्या ठिकाणी काही पॅरामीटर्स पूर्ण करणं गरजेचं आहे. एखाद्या प्रलंबित प्रकरणाची सेटलमेंट झाल्यामुळे कुटुंबीयांना आश्चर्य वाटेल. तुमची एखाद्या गोष्टीसाठी निवड होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या क्षमतेची जाणीव असल्यामुळे तुम्ही एक ध्येय समोर ठेवलं आहे. तुमच्या पालकांच्या आशीर्वादामुळे हे लक्ष्य तुम्ही नक्कीच गाठाल. तुमची स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी एखादा स्पॉन्सर मिळेल.

मिथुन – स्वतःचा व्यवसाय सुरू करणं हे तुमचं स्वप्न आहे आणि तुम्ही ते सत्यात उतरवण्यासाठी खरोखरच परिश्रम घेत आहात. तुम्हाला या स्वप्नापासून कोणतीही गोष्ट विचलित करू शकत नाही. या बिझनेससंबंधी तुमच्या भविष्यातल्या नियोजनाचं पुनरावलोकन करा. सोबतच, दुसरी एखादी संधी चालून आल्यास त्याबद्दलही विचार करा. ही संधी सोडू नका. एखाद्या गोष्टीला उशीर होत असेल, तर ती गोष्ट होणारच नाही असं नाही. संयम बाळगणं गरजेचं. कामाच्या ठिकाणी टीकेला सामोरं जावं लागेल. प्रवासाचे बेत पुढे ढकलले जातील. काही काळासाठी तुमच्या गरजा भागतील एवढी बचत तुमच्याकडे आहे.

कर्क – किती कमी वेळ हातात आहे, याची जबाबदाऱ्या आठवण करून देतील. त्यामुळे कामाची गती वाढवण्याची गरज आहे. एखादी नवीन संधी कामाच्या ठिकाणी उत्साह निर्माण करेल. दैनंदिन गोष्टींमधून ब्रेक घेणं गरजेचं आहे. तुमच्या मनातल्या विचारांबाबत आतापर्यंत तुम्हाला स्पष्टता आली असेल. तुमचे विचार तुम्हाला योग्य दिशा दाखवतील. पुढचे कित्येक दिवस तुम्हाला आपल्या मनाने सांगितलेल्या मार्गावरच चालायचं आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातल्या काही व्यक्ती बहुप्रतीक्षित टार्गेट पूर्ण करतील. ज्या व्यक्ती संयम बाळगतात किंवा प्रयत्न करत राहतात त्यांना अपेक्षित गोष्टी मिळतातच. तुम्हालाही लवकरच ओळख मिळेल. एखादा आउटिंगला जाण्याचा प्लॅन बनेल. त्यामुळे आनंदी व्हाल.

सिंह – खासगी गोष्टींबाबत सार्वजनिक ठिकाणी चर्चा करणं टाळा. तुम्ही जी गोष्ट इतके दिवस धरून ठेवली होती, ती सोडून देण्याची वेळ आता आली आहे. राग ताब्यात ठेवणं गरजेचं आहे, अन्यथा मनस्ताप होईल. एखादी मैत्रीपूर्ण कृती आज अडचणीतून बाहेर काढू शकते. एखाद्या गोष्टीत नकळतपणे सहभागी व्हाल. आज संमिश्र स्वरूपाच्या भावना असतील. तुमच्याकडे आकर्षित झालेली एखादी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करील. भावनिक पातळीवर तुम्हाला कमकुवत वाटेल. घाईघाईत कोणताही निर्णय घेणं टाळा. आत्ता तुमच्या मनात गोंधळ असेल, तर निर्णय घेणं पुढे ढकला.

कन्या – तुमच्या बऱ्याच योजना अंमलात येत आहेत. थोडा वेळ काढून तुम्ही आधीच जे निर्णय घेतले आहेत, त्यांच्याबाबत पुनर्विचार करा. एखादी रोमांचकारी गोष्ट तुमच्या दिशेने येत आहे, ज्याबाबत खरं तर तुम्ही कसलाही विचार केला नसेल. ही गोष्ट तुमच्या मार्गात नसूनही तुमच्याकडे येईल. तुम्ही गांभीर्याने घेतलं तर ही एक चांगली संधी ठरू शकते. सर्वांचा सल्ला ऐका; मात्र अंतिम निर्णय स्वतःच्या मनानेच घ्या. कायदेशीर वर्तुळात असलेल्या व्यक्तींसाठी पुढचे काही दिवस आव्हानात्मक असतील.

तूळ – एखाद्या व्यक्तीशी स्पर्धा करणं ही चांगली गोष्ट आहे; मात्र स्पर्धा जिंकण्यासाठी कट-कारस्थान रचणं कधीही योग्य ठरत नाही. यामुळे ना तुमचा फायदा होतो ना समोरच्या व्यक्तीचा. सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवणं गरजेचं आहे. आज भाग्याचा दिवस आहे. तुम्ही स्वतःसाठी ठरवलेली जवळपास सर्व कामं पूर्ण होतील. शेअर मार्केटमध्ये सध्या चांगला फायदा दिसत आहे. एखाद्या गोष्टीबाबत बोलणं अवघड वाटत असलं, तरी ते न टाळता पूर्ण करा. तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचा हार्टब्रेक होऊ शकतो. यानंतर ती व्यक्ती तुमचा सल्ला मागेल. तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. प्रकृतीच्या समस्या जाणवतील; मात्र त्या तात्पुरत्या असतील.

वृश्चिक – एखादी गोष्ट तुम्हाला विचलित करत असेल, तर तुम्ही ते होऊ देत आहात हेच कारण आहे. तुमच्या भावंडाकडे असलेली एखादी संकल्पना कमाईचा नवा स्रोत निर्माण करू शकते. ट्रिपला जाण्याचा विचार करत असाल, तर तो प्लॅन फसू शकतो. तुमचा स्वभाव तुम्हाला आयुष्यात भरपूर पुढे नेईल. तुमच्या ओळखींमुळे भरपूर फायदा होईल; मात्र लोकांवर विश्वास ठेवणं सध्या जड जाईल. वरिष्ठ व्यक्ती किंवा अधिकारी असलेल्या व्यक्तींसाठी आव्हानात्मक काळ आहे. कामासाठी बरीच धावपळ करावी लागेल. तुमचा जोडीदार तुमचा सर्वांत मोठा टीकाकार आणि आधारस्तंभ असेल. एखाद्या मालमत्तेच्या विक्रीत रस असेल तर प्राथमिक चर्चा होऊ शकते.

धनू – एखादं काम करण्यासाठी लोकांकडे एक तर क्षमता नसते किंवा कौशल्य; मात्र तुमच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास परत मिळवा आणि तुमच्या समोर असलेली गोष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करा. एखादा विचार डोक्यातून जेवढा दूर करण्याचा प्रयत्न कराल, तेवढा तो पुन्हा समोर येईल. एखादी महत्त्वाची गोष्ट करण्याचं धाडस तुमच्यामध्ये नसल्याची जाणीव होईल. आजचा दिवस तणावाचा असेल आणि कामं लवकर आटोपण्याचे प्रयत्न असफल ठरतील. तुमचा संकोच बाजूला ठेवलात, तर मोठं यश मिळेल. एखाद्या गोष्टीबाबत पूर्णपणे माहिती घेण्यापूर्वीच ती रिजेक्ट करू नका. भविष्यात तुम्ही मोठे धाडसी निर्णय घ्याल.

मकर – भूतकाळातली एखादी वाईट गोष्ट पुन्हा होऊ शकते; मात्र अगदी तशीच नाही. या गोष्टीमुळे घाबरून जाण्याची गरज नाही; मात्र तुम्ही त्यात पुन्हा अडकू शकता. नवीन घटनांमुळे चांगली उदाहरणं तयार होतील. तुमचं काम उच्चपदस्थ व्यक्तींसमोर मांडण्याची संधी लवकरच मिळेल. पारदर्शक राहिल्यामुळे तुम्हाला भरपूर प्रशंसक मिळतील.

कुंभ – एखाद्या संकटाच्या वेळी तुम्ही एकटे पडाल अशी तुम्हाला भीती वाटत असेल, तर सध्या तशी परिस्थिती नक्कीच नाही. परीक्षांचे निकाल अपेक्षेप्रमाणं नसू शकतात. काम करून घेण्यासाठी मुत्सद्देगिरीचा वापर करणं फायद्याचं ठरेल. आजचा दिवस तणावाचा असेल; मात्र दिवसाचा शेवट चांगल्या गोष्टीने होईल. प्रवासात असताना महत्त्वाची माहिती शेअर करणं टाळा. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि सध्या वेगाने बदलत आहे. तुमच्या वागण्यात बदल झाला नाही, तर भूतकाळातल्या चुका पुन्हा पुन्हा समोर येत राहतील. एखादी आध्यात्मिक सहल घडू शकते आणि त्याचं कदाचित त्वरित नियोजन होत असेल. तुम्ही जी ऊर्जा गमावली आहे ती तुमच्या मित्रांमुळे परत येईल.

मीन – लग्नाचा विचार करत असाल, तर सध्या भरपूर शक्यता आहे. निवडलेल्या काही व्यक्तींमधून तुमच्या नशीबात असलेली व्यक्ती अंतिम ठरेल. वेगवेगळ्या गोष्टींमधून आश्चर्याचे धक्के मिळतील. यातल्या काही गोष्टी तुम्हाला आवडतील, तर काही आवडणार नाहीत. रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा एखादी व्यक्ती दुखावली जाऊ शकते. एखादी लहान चोरी होण्याची शक्यता आहे. तेव्हा सावध राहा. तुम्हाला जे हवं आहे, तेच तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीलाही हवं आहे; मात्र ती गोष्ट त्यांना मिळणार नाही यामुळे ते तुमची बदनामी करण्याची योजना आखू शकतात. अशा व्यक्तींपासून सावध राहा. नकारात्मक मानसिकतेमुळे आयुष्यात काही पावलं मागं जाण्यास भाग पडेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular