Thursday, June 13, 2024
Homeराशी भविष्यया वेळी दिवाळीमध्ये राशींनुसार या वस्तु खरेदी करा.. माता लक्ष्मींची कृपा होईल.!!

या वेळी दिवाळीमध्ये राशींनुसार या वस्तु खरेदी करा.. माता लक्ष्मींची कृपा होईल.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! दिवाळी म्हटलं की मनात येते पहिल्यांदा खरेदी यंदा दिवाळीत काय काय खरेदी करायच. असा विचार प्रत्येक जण करत असतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की खरेदी करतच आहात तर तुमच्या राशीनुसार करा. त्यामुळे नक्कीच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे. किंवा तुम्हाला ज्योतिष शास्त्रानुसार त्याचा लाभ मिळणार आहे. तर हेच आज या मी तुम्हाला सांगणार आहे. की तुमच्या राशीनुसार यंदाच्या दिवाळी तुम्हाला कोणत्या वस्तूंची खरेदी करायची आहे. चला तर सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष रास – मेष राशीच्या व्यक्तींनी यंदाच्या दिवाळीत चांदीच्या वस्तू किंवा चांदीची भांडी खरेदी करावीत. चांदी आपल्यासाठी शुभ आहे तसंच तुम्ही एखादी प्रॉपर्टी सुद्धा खरेदी करू शकतात. ते सुद्धा तुम्हाला लाभदायक ठरेल. जसं तुमचं बजेट असेल त्याप्रमाणे एखादा छोटासा चांदीचा नान जरी तुम्ही या दिवाळीत खरेदी केलं तरी सुद्धा तुम्हाला ते ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने लाभदायक ठरू शकत.

वृषभ रास – वृषभ राशीच्या व्यक्तींनी दिवाळीनिमित्त सोनं चांदी किंवा हिरे संबंधित वस्तू खरेदी कराव्यात. किंवा याचा एखादा दागिना खरेदी करा. सोनं चांदी किंवा हिरा खरेदी विशेष लाभदायक ठरू शकते. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असून सुख संपन्नता आणि वैभवाचा तो कारक आहे.

मिथुन रास – मिथुन राशीच्या व्यक्तींनी दिवाळीनिमित्त सोन्याचा दागिना खरेदी करावा. किंवा घरासाठी हिरव्या रंगाच्या वस्तू खरेदी कराव्यात. जर आपण चांदीचा गणपती घरी आणला तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला लाभ पोहोचू शकतो.

कर्क रास – कर्क राशीच्या व्यक्तींनी यंदाच्या दिवाळीत श्रीयंत्र घरी आणाव. त्यामुळे महालक्ष्मीची कृपा तुम्हाला लाभू शकते. तसंच एखादा चांदीचा कलश किंवा चांदीची शिवपार्वतीची मूर्ती सुद्धा तुम्ही घरी आणू शकता. या गोष्टी घरी आणणे सुद्धा तुमच्यासाठी मंगलकार्य ठरेल.

सिंह रास – सिंह राशीच्या व्यक्तींसाठी दीपोत्सवानिमित्त सोने खरेदी करणे उत्तम मानले जात आहेत. दिवाळीला सोन्याची नाणी, दागिना खरेदी करणे अत्यंत लाभदायक ठरू शकत. नाहीत सोना चांदी तर तांब्याची निगडित वस्तूंची तरी खरेदी करावी. त्यामुळे सुद्धा तुम्हाला लाभ मिळू शकतो.

कन्या रास – कन्या राशीच्या व्यक्तींनी दिवाळीत हस्तिदंताची एखादी वस्तू खरेदी करावी. असं केल्यामुळे धनवृत्ती होऊ शकेल. तसेच दुर्गादेवीसाठी चांदीचे छत्र बनवून अर्पण करू शकता. त्यामुळे सुद्धा घरात धनधान्याची कमतरता भासणार नाही.

तूळ रास – तूळ राशीच्या व्यक्तींनी दिवाळीला सौंदर्यप्रसाधनाशी संबंधित वस्तूंची खरेदी करावी. आपण कुटुंबातील एखाद्या सदस्यासाठी गुलाबी रंगाचे कपडे खरेदी करू शकता. याशिवाय लक्ष्मी देवीच्या सुंदराशी संबंधित एखादी वस्तू ही खरेदी करू शकतात. असं केल्याने सुद्धा सुख-समृद्धी वाढू शकते.

वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी या दिवाळीत सोनं चांदी खरेदी करा. पण जर जमत नसेल तर तांब्याच्या वस्तूंची खरेदी सुद्धा तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते.
धनु राशी- धनु राशीच्या व्यक्तींसाठी यंदाच्या दिवाळीत वाहन खरेदी उत्तम मानली जाते आहे. याशिवाय चांदीची खरेदी सुद्धा शुभ राहील. त्यामुळे घरात संपन्नता येईल.

मकर रास – मकर राशीच्या व्यक्तींसाठी सुद्धा वाहन आणि चांदी खरेदी तसेच अगदीच नाही जमलं तर स्टीलच्या वस्तूंची खरेदी सुद्धा शुभ मानली जाते आहे. यातलाही काही नाही जमलं तर गृह सजावटीच्या वस्तू सुद्धा तुम्ही खरेदी करू शकत.

कुंभ रास – कुंभ राशीच्या व्यक्तींनी या दिवाळीला चांदीच्या वस्तूंची खरेदी करावी. याशिवाय स्टीलची भांडी सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता त्याचा सुद्धा तुम्हाला फायदाच होईल.

मीन रास – राशीच्या व्यक्तींसाठी चांदी अत्यंत शुभ मानली गेली आहे. त्यामुळे चांदीची नाणी, चांदीची वस्तू चांदीचे दागिने तुम्ही या दिवाळीत खरेदी करू शकता. तसेच कुटुंबातील एखाद्या सदस्यासाठी पिवळ्या रंगाचे कपडे खरेदी करू शकता. त्याचा सुद्धा तुम्हाला लाभ मिळेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular