Wednesday, June 12, 2024
Homeआध्यात्मिकया 3 प्रकारच्या लोकांवर शनि साडेसातीचा असर होत नाही.!!

या 3 प्रकारच्या लोकांवर शनि साडेसातीचा असर होत नाही.!!

तुमच्यातही आहेत ‘हे’ गुण? तर होईल शनिदेवाची कृपा; कधीही करावा लागणार नाही साडेसातीचा सामना.. पुढीलप्रमाणे काही विशेष कर्म करणाऱ्या लोकांना शनिदेवांचा सदैव आशीर्वाद मिळतो. ही कर्म कोणती आहेत ते आपण आता जाणून घेऊयात..

ज्योतिषशास्त्रात न्यायाची देवता म्हणून शनिदेवाला ओळखले जाते. ते माणसाच्या चांगल्या-वाईट कर्मानुसार फळ देतात. जर एखाद्या व्यक्तीने वाईट कृत्ये केली तर त्याला शनिच्या साडेसातीचा सामना करावा लागतो. त्याचे जीवन दु:खाने भरते. त्याचबरोबर चांगले कर्म करणाऱ्यांना शनिदेव कधीही त्रास देत नाहीत. एकदा का तुमच्यावर त्यांची कृपादृष्टी झाली तर माणसाच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची कमतरता नसते. तसेच, विशेष कर्म करणाऱ्या लोकांना शनिदेवांचा सदैव आशीर्वाद मिळतो. हे कर्म कोणते आहेत ते जाणून घेऊया.

वाड वडील किंवा पितरांचे श्राद्ध..
पितरांचे श्राद्ध करणाऱ्यांवर शनिदेवाची कृपा होते. पितरांच्या श्राद्धाने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांचे सर्व संकट दूर करतात. पितृ पक्षातील शनिवारी आणि अमावस्येला शनिदेवाची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते.

पिंपळ वृक्षाची पूजा..
शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. यासोबतच त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी पिंपळाचे रोपही लावता येईल.

घरातील स्वच्छता राखणे..
शनिदेवाला स्वच्छता खूप आवडते. अशा परिस्थितीत घर नेहमी स्वच्छ ठेवा. शारीरिकदृष्ट्याही निरोगी राहा. नखे नियमितपणे साफ करत राहा आणि त्यांना वाढू देऊ नका. जे स्वच्छतेची विशेष काळजी घेतात, त्यांना शनि कधीही त्रास देत नाही.

शनिवारचे व्रत..
शनिवारी उपवास केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेचा वर्षाव सुरू होतो. या दिवशी व्रतासह दान करा. गरीब आणि गरजूंना जेवू घातल्याने शनिदेवाचा अपार आशीर्वाद मिळतो. घरात कशाचीही कमतरता भासत नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular