Sunday, February 25, 2024
Homeआध्यात्मिकया दिशेला असते यमराजांचे वास्तव्य.. या दिशेने जर घराचा दरवाजा उघडत असेल...

या दिशेला असते यमराजांचे वास्तव्य.. या दिशेने जर घराचा दरवाजा उघडत असेल तर सावधान.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा उघडण्याची दिशा चुकीची असेल तर तुमच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. वास्तुशास्त्रामध्ये मुख्य दरवाजापासून घरापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीचे स्थान आणि दिशा यांचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. त्याच वेळी, घराच्या मुख्य दरवाजाच्या स्थितीचा घरात राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर खूप प्रभाव पडतो कारण घरामध्ये प्रवेश करणारी सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा मुख्य दरवाजाद्वारेच निर्धारित केली जाते. घराचे बांधकाम करताना सध्याच्या युगात वास्तुशांती खूपच महत्त्व आहे असे मानले जाते.

घरचे बांधकाम करत असताना वास्तुशास्त्रानुसार जर घर बांधले तर दुःख दारिद्र्य आणि आजापणापासून आपली सुटका होते. कोणतीही गोष्ट घडते त्यामागे काही ना काही कारण असते मग ते कारण सामाजिक असेल, परंपरिक असेल, रूढी असेल किंवा एखादी दंत कथा असेल परंतु त्यामागे एक कारण असते.

वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर सावली पडता कामा नये त्यामुळे अगदी घराच्या समोर एखादे झाड किंवा खांब असणार नाही याची काळजी घ्यावी तर तसेच दरवाजा पर्यंत येण्यासाठी दरवजा सामोर पायऱ्या असल्यास त्यांची संख्या विषम असावी. घराची लांबी व रुंदी याचे गुणोत्तर महत्वाची असते. तुमची घरची उंची दहा फूट असते तर त्याची रुंदी पाच फूट असावी.

आपल्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा असावी आणि घरात सुख-शांती नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशा स्थितीत वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा उघडण्याची दिशा चुकीची असेल तर तुमच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. चला जाणून घेऊया मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असणे योग्य आणि कोणत्या दिशेला अशुभ.

दक्षिण दिशेला मुख्य दरवाजा असणं – वास्तु शास्त्रानुसार, घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर घरातील सदस्यांच्या जीवनात संघर्ष निर्माण होतो. दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते आणि येथूनच पितरांचं आगमन होतं. मुख्य दरवाजा या दिशेला असल्‍याने घराच्‍या मुख्‍या आणि स्त्रिया दोघेही दुःखी होतात. त्यामुळे घराचे मुख्य द्वार दक्षिण दिशेला असणं अशुभ मानलं जातं.

पश्चिमाभिमुख मुख्य गेट – वास्तुशास्त्र सांगतं की, जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा पश्चिम दिशेला असेल तर ते शुभ परिणाम देतं. या दिशेला मुख्य द्वार असल्यामुळे घरातील लोकांची प्रगती मंदावली असली तरी त्यांना कायमस्वरूपी यश मिळतं.

घराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तर दिशेला असणे – जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेला असेल तर ते सर्वात शुभ मानलं जातं. देवतांचा वास उत्तर दिशेला असतो. या दिशेला मुख्य दरवाजा असल्‍याने घरात अध्यात्मिक वातावरण राहतं.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular