Saturday, June 15, 2024
Homeआध्यात्मिकझोपण्यापूर्वी फक्त पाच मिनिटं 'हे' करा.. आयुष्य बदलून जाणार.!!

झोपण्यापूर्वी फक्त पाच मिनिटं ‘हे’ करा.. आयुष्य बदलून जाणार.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो आपल्याबरोबर अनेकदा असे होते की आपले कोणत्याच कामात लक्ष लागत नाही, आपला मूड कायम उदास राहतो, आपल्याला लोकांमध्ये मिसळायला नकोसे वाटत असते. हे असे होते. कारण आपल्या अंतर्मनामध्ये आपल्याबरोबर घडलेली दुःखद घटना आठवत असते. त्यामुळे ती आपल्यामध्ये त्रास आणि दुःख निर्माण करत असते. आज आपण यावर एक उपाय पाहणार आहोत. हा उपाय जर आपण नियमित केला तर आपल्या अंतर्मनामध्ये चांगल्या आठवणींच्या फाइल्स ओपन होतील आणि त्यामुळे आपले मन नेहमी प्रसन्न व जास्तीत जास्त आनंदी राहण्यास मदत होईल.

हा उपाय रात्री झोपताना केला तरी याचा जास्तीत जास्त फायदा दिसून येईल. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणता आहे हा उपाय. मित्रांनो, हा उपाय आपण चार पायऱ्यामध्ये करायचा आहे. यासाठी आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या सर्व चांगल्या गोष्टी व आपल्या बरोबर घडलेले चांगले प्रसंग, घटना यांची यादी तयार करायचे आहे. ही यादी तयार झाल्यानंतर यातील एखादी सुंदर व चांगली घटना तुम्हाला निवडायची आहे आणि आता आपण हा उपाय सुरू करणार आहोत.

आता पहिली पायरी आहे,तुम्ही एका ठिकाणी शांत रिलॅक्स बसून घ्या आणि दोन ते तीन वेळा दीर्घ श्वास घ्या. त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आणा आणि तो प्रसंग आठवून त्यामध्ये प्रवेश करा. त्या प्रसंगामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा की, प्रसंगांमध्ये कोणकोणत्या व्यक्ती होत्या, तुमचे कोणते मित्र होते, त्यांनी कोणत्या कलरचे कपडे परिधान केले होते.

त्याप्रसंगा मधील काही गोष्टी आठवतील काही आठवणार नाही, ठीक आहे. पण ज्या आठवतात त्याच सविस्तरपणे बघण्याचा प्रयत्न करा. हा प्रसंग आठवत असताना तुमच्यामध्ये कोणत्या प्रकार ची फिलिंग व निर्माण होते ते बघण्याचा प्रयत्न करा. आणि तो प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर घडत असताना तुमच्या मनामध्ये व शहरांमध्ये कोणती भावना निर्माण होते याचा अनुभव घ्या.

हे झाल्यानंतर शांतपणे डोळे उघडा.मित्रांनो याच प्रकारे रोज झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर त्या यादीतील एक चांगली घटना किंवा प्रसंग तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणून तो प्रसंग पुन्हा जगण्यास सुरुवात केली, तर तुमचे आयुष्य किती बदलेल व तुमच्या आयुष्यात किती सकारात्मक गोष्टी घडू लागतील याचे निरीक्षण तुम्हीच करा.

या प्रसंगांमध्ये कोणतीही घटना घेतली तरी चालेल यामध्ये तुम्हाला शाळेमध्ये बक्षीस मिळाले असेल, तुम्हाला नोकरी मिळाली असेल किंवा तुमचे लग्न झाले असेल, अशा इतर ही आनंद देणाऱ्या घटना तुम्ही या यादीमध्ये लिहून त्याचा या उपायासाठी वापर करू शकता. हा उपाय तुम्ही रात्री झोपताना सुद्धा करू शकता किंवा दिवसभरातील कामे वेळ सुद्धा करू शकता.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular