Thursday, June 20, 2024
Homeआध्यात्मिकझोपण्यापूर्वी स्वामी महाराजांच्या जवळ व्यक्त करा ही एक प्रार्थना.. मनोकामना पूर्ण होतील.!!

झोपण्यापूर्वी स्वामी महाराजांच्या जवळ व्यक्त करा ही एक प्रार्थना.. मनोकामना पूर्ण होतील.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… नमस्कार मित्रांनो, रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ ही एकच प्रार्थना करा. स्वामींना जर आपण प्रार्थना केली तर स्वामींची कृपा आपल्यावर होईलच.. कारण आपण आपल्या भावना आपल्याला जे काही सांगायचं असेल ते आपण स्वामींना किंवा अन्य कोणत्या देवांना आपण ते प्राधान्याच्या स्वरूपातून सांगू शकतो. आज आम्ही तुम्हाला एक अशी स्वामींची प्रार्थना सांगणार आहे. जी प्रार्थना तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी स्वामींच्या समोर बसून स्वामींसमोर हात जोडून ही प्रार्थना एकदा नक्कीच म्हणा. आणि मग झोपून जावा. ही प्रार्थना काही अशी आहे.

रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीजवळ एकच प्रार्थना करा. हे स्वामीराया हे घर तुमचे आणि मी देखील तुमचाच आहे. जे ठरवाल ते माझ्या ध्येयासाठी असेल. काहीही करा पण माझे मन विचलित होऊ देऊ नका. आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवून देऊ नका.

कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची मला बुद्धी द्या. आणि येणाऱ्या संकटांपासून माझे माझ्या परिवाराचे आणि या जगाचे म्हणजे संसाराचे रक्षण करा. तुम्ही सतत आमच्या सोबत असेच राहा.

आमच्या पाठीमागे राहा आणि आम्हाला सतत तुमचे बोल आठवू द्या. की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर ही छोटीशी सोपी आणि सुंदर अशी स्वामींची प्रार्थना रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी जवळ एकदा नक्की बोलायला शिका. हे बोलत चला म्हणायला शिका प्रार्थना करून जर झोपला तर झोप चांगली येईल.

दिवस चांगला जाईल, आणि तुमची सगळी कामे पूर्ण होतील. स्वामी महाराज सतत तुमच्या सोबत राहतील. तर तुम्ही ही प्रार्थना नक्की बोला.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular