Monday, May 27, 2024
Homeआध्यात्मिकझोपण्यापूर्वी स्वामींचे स्मरण करत या मंत्राचा करा उच्चार.. धन, धान्य, संपन्नता लाभेल.!!

झोपण्यापूर्वी स्वामींचे स्मरण करत या मंत्राचा करा उच्चार.. धन, धान्य, संपन्नता लाभेल.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो रात्री झोपताना श्री स्वामी समर्थांचा हा 1 सिद्ध मंत्र अवश्य म्हणा. जर कधी तुमच्या जिवनामध्ये गरिबी आहे, दारिद्र्य आहे किंवा तुम्ही जितकी मेहनत करतात पण तितका पैसा जर तुमच्याकडे येत नसेल तेव्हा, मित्रांनो रात्री झोपताना किमान 11वेळा, 21 वेळा, किंवा 51 वेळा नाहीतर 108 वेळा तुम्हाला जितक्या वेळा म्हणणं शक्य असेल तितक्या वेळा श्री स्वामी समर्थांच्या या अद्भूत मंत्राचा जप अवश्य करा.

मित्रांनो या मंत्रामध्ये इतकी अद्भूत ताकत आहे की, तुमच्या घरातून अलक्ष्मी काढता पाय घेईल. अलक्ष्मी ही माता लक्ष्मीची मोठी बहीण होय. तिला अध्यात्मिक भाषेत अवदसा असेही म्हणतात. ज्या घरामध्ये अलक्ष्मी म्हणजे अवदसा असते त्या घरामध्ये पैसा कधी टिकत नाही. त्या घरामध्ये पैसा येण्याचं नाव घेत नाही. कारण प्र त्यक्ष माता लक्ष्मी त्या घरामध्ये राहणं पसंत करत नाहीत.

मित्रांनो श्री स्वामी समर्थांच्या या मंत्राचा रात्री झोपताना जप केला तर तुमच्या घरातून अलक्ष्मी म्हणजे अवदसा काढता पाय घेईल. आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी वास निर्माण होईल. मित्रांनो हा मंत्र आहे, ओम नमो विष्णवे नमः, ओम नमो विष्णवे नमः, ओम नमो विष्णवे नमः मित्रांनो मी मंत्र तर सांगितला. मात्र लगोलगच या मंत्राचा जप करण्यास सुरुवात करू नका..

कारण या मंत्राला सर्वांत प्रथम आपल्याला सिद्ध करावं लागेल. आणि त्यानंतर तुम्ही दररोज किंवा एकदा जरी रात्री झोपताना या मंत्राचा जप केलात तरीही चालेल. हा मंत्र सिद्ध कसा करणार? मित्रांनो आपली सकाळची देवपूजा झाल्यानंतर आपण आपल्या देव घरासमोर बसून मग तुम्ही कोणतीही मुद्रा घ्या.

आपण कोणत्याही मुद्रेमध्ये आसनस्थ होऊन, बसून 1 हजारवेळा या मंत्राचा जप करा. जर या मंत्राचा जप आपल्या घरातील सर्व व्यक्ती करणार असतील तर, मित्रांनो घरातील कर्त्या व्यक्तीने किंवा कोणत्याही एखाद्या व्यक्तीने या ओम नमो विष्णवे नमः या महामंत्राचा 1 हजार वेळा जप करा..

कोणत्याही एका व्यक्तीने 1 हजारवेळा जप करा आणि इतर सर्वांनी फक्त 108 वेळा या मंत्राचा जप करायचं आहे. मित्रांनो त्यानंतर हा मंत्र सिद्ध होईल आणि मग द र रो ज रात्री झोपताना आपण या मंत्राचा जप करा आणि या मंत्राचा जप करून झाल्यानंतर 1 ग्लासभर पाणी प्या. आणि हो स्वामींचे स्मरण करत आपण झोपी जा.

मित्रांनो महत्वाची गोष्ट आपण जोपर्यंत आपल्या घरातील गरिबी, दारिद्र्य नष्ट होत नाही तो पर्यंत दररोज नित्यनियमाने आपण या मंत्राचा जप करायचं आहे. मित्रांनो हा स्वामींचा अत्यंत प्रिय मंत्र आहे. या मंत्रामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंना प्र स न्न करण्याची ताकत आहे. भगवान श्रीहरी विष्णू हे या जगाचे पालन हार आहेत. आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णूंच्या नामाचा जप होतो.

त्या ठिकाणी त्यांची पत्नी म्हणजे माता लक्ष्मी ही नक्की अवतरते. माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये नक्की निर्माण होतो. मित्रांनो या सोबतच छोटासा उपाय तुम्हाला सांगणार आहे. जो या मंत्राला खूप मोठी ताकत प्रदान करील. मित्रांनो कदाचित तुमच्या द्वारा या मंत्राचा जप चालू असताना काही छोट्या मोठ्या चुकाही होऊ शकतात. तर या चुकांचं क्षालन करण्यासाठी किंवा या मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी आपणास ज्या ज्या वेळी शक्य होईल त्या त्या वेळी आपण श्री विष्णू सहस्त्र नामाचा पाठ सुद्धा करा.

श्री विष्णू सहस्त्र नामाचा पाठ विशेष करून पौर्णिमा असेल किंवा इतर अन्य तिथींना, अनेक अशा तिथी आहेत की, ज्या वेळेस श्री विष्णू सहस्त्र नामाचा पाठ आपल्याला करता येतो. मित्रांनो तो पाठ आपण करू शकता. द्रव्य प्राप्तीसाठी, धन प्राप्तीसाठी हा 1 अंत्यंत चांगला उपाय आहे. मित्रांनो तुमची स्वामी समर्थांवर निष्ठा नक्की असेल आणि स्वामी समर्थांचा सर्वांत सिद्ध मंत्र श्री स्वामी समर्थ.. याचा सुद्धा जप नक्की करत असाल.

मित्रांनो तुम्ही जर या मंत्राचा जप करत असाल तर तोसुद्धा तुम्ही सिद्ध करून घ्या. ज्या प्रकारे मी या रात्री म्हणाव्याच्या मंत्राबद्दलची माहिती सांगितली होती. त्याच प्रकारे आपण हा मंत्रसुद्धा सिद्ध करा. मग दिवसभरात कधीही किंवा सर्वांत चांगले वेळ सकाळची देवपूजा झाल्यानंतर आपण या मंत्राचा जप 108 वेळा, 11 वेळा, 21 वेळा करू शकता.

मित्रांनो घरातील कोणत्याही एखाद्या व्यक्तीने 1 हजारवेळा या मंत्राचा केवळ एकदा जप करा. इतर व्यक्तींनी 108 वेळा जप करा. त्यानंतर तुम्ही केवळ एकदा जरी या मंत्राचा जप केलात तरीही श्री स्वामी समर्थांचा कृपा आपल्यावरती चिरंतन बरसत राहणार. आपल्यावर आणि संपूर्ण कुटूंबियांवर श्री स्वामी समर्थांची कृपा चिरंतन बरसत राहो. श्री स्वामी समर्थ.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular