Sunday, December 10, 2023
Homeराशी भविष्य2022 चा शेवट होणार गोड.!! या 3 ग्रहांचा संयोग, ‘या’ 4 राशींना...

2022 चा शेवट होणार गोड.!! या 3 ग्रहांचा संयोग, ‘या’ 4 राशींना भरपूर यश.. नवीन वर्षातही शुभ-लाभ.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! सन 2022 ची सांगता होत आहे. नवीन सन 2023 वर्षाच्या स्वागतासाठी जग उत्सुक आहे. अनेक नवीन संकल्प, नवीन इच्छा, आकांक्षेसह नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. यातच ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिनेही नवे 2022 वर्ष अनेकार्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.

डिसेंबर महिन्यात सूर्याच्या धनु प्रवेशानंतर या राशीत अनेक शुभ संयोग जुळून येत आहेत. धनु राशीत आधीपासून बुध आणि शुक्र विराजमान असून, सूर्याच्या आगमनानंतर अद्भूत योग जुळून आले आहेत. बुध आणि शुक्राच्या राशी परिवर्तनापर्यंत हे योग कायम राहणार आहेत.

धनु राशीत सूर्य येत असल्यामुळे बुधादित्य आणि लक्ष्मीनारायण योगासह सूर्य, बुध आणि शुक्र यांच्यात त्रिग्रही योग तयार झाला आहे. वर्षाच्या शेवटी सूर्य धनु राशीत येणे आणि बुध, शुक्र यांची भेट मेष राशीसह अनेक राशींसाठी फायदेशीर ठरेल.

बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण योग तयार झाला आहे, जो वर्षाच्या शेवटपर्यंत प्रभावी राहील. गुरुचे स्वामित्व असलेल्या राशीमध्ये तयार झालेल्या या राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे मेष राशीसह अनेक राशीचे लोक त्यांच्या बुद्धिमत्तेने, अनुभवाने, कार्यक्षमतेने वर्षाच्या शेवटच्या काही दिवसांत त्यांच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात खूप प्रगती करतील, असे सांगितले जात आहे.

धनु राशीत जुळून आलेल्या या योगांमुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींना या वर्षाचा शेवट गोड होऊ शकेल, कोणत्या राशीच्या व्यक्तींना नवीन वर्षाची सुरुवातही चांगली जाऊ शकेल, कोणत्या राशींना हे योग लाभदायक ठरू शकतील, ते जाणून घेऊयात..

मेष रास – राशीच्या व्यक्तींना धनु राशीतील ग्रहांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण आणि बुधादित्य योगाचा लाभ मिळेल. कामात प्रगती होईल. अडकलेली कामे मार्गी लागतील. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामात नक्कीच यश मिळेल. नोकरदारांना वरिष्ठ आणि अधिकारी यांचे सहकार्य मिळेल. प्रतिष्ठा प्राप्त होईल.

मिथुन रास – राशीच्या व्यक्तींना धनु राशीतील ग्रहांचा संयोग खूप शुभ आणि फलदायी ठरेल. कार्यक्षेत्रातील सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. भागीदारीत काम करतात, त्यांना यश मिळू शकेल. कामानिमित्त प्रवासाला जावे लागेल. हा प्रवास तुमच्यासाठी खूप शुभ असेल. या काळात व्यवसायही खूप चांगला होऊ शकेल.

कुंभ रास – राशीच्या व्यक्तींना धनु राशीतील ग्रहांचा संयोग फायदेशीर ठरू शकेल. सूर्य, बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने तयार झालेला बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण योग आर्थिक प्रगती आणि लाभ देईल. उत्पन्न वाढेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. गुंतवणूक कराल ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ खूप अनुकूल असेल.

मीन रास – राशीच्या व्यक्तींना धनु राशीतील ग्रहांचा संयोगाने प्रगतीची संधी मिळेल. व्यावसायिकांना या काळात भरपूर नफाही मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांसाठी पदोन्नती आणि प्रभाव वाढण्याचा योग असेल. तुमचे उत्पन्न वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक स्थिती यावेळी खूप चांगली असणार आहे.

सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्र द्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular