Monday, May 13, 2024
Homeआध्यात्मिकMargshirsh Mahalaxmi Vrat मार्गशीर्ष अमावस्येला महालक्ष्मी व्रताचे उद्यापन केल्याने माता लक्ष्मींचा आशीर्वाद...

Margshirsh Mahalaxmi Vrat मार्गशीर्ष अमावस्येला महालक्ष्मी व्रताचे उद्यापन केल्याने माता लक्ष्मींचा आशीर्वाद लाभणार..

Margshirsh Mahalaxmi Vrat मार्गशीर्ष अमावस्येला महालक्ष्मी व्रताचे उद्यापन केल्याने माता लक्ष्मींचा आशीर्वाद लाभणार..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… (Margshirsh Mahalaxmi Vrat) जानेवारी रोजी मार्गशीर्षातील गुरुवार आणि त्याच दिवशी महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करायचे आहे, त्याबाबत माहिती जाणून घ्या.
मार्गशीर्ष महिन्यात केले जाणारे महालक्ष्मी व्रत अतिशय प्रचलित आहे. चार गुरुवार करायचे हे व्रत यंदा पाच गुरुवार करण्यास मिळाले आहे. मात्र या व्रताचे उद्यापन पाचव्या गुरुवारी करत असताना अमावस्या तिथी येत असल्याने अनेकांच्या मनात या व्रताशी संबंधित संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी व्रताची माहिती देणारी जी पारंपरिक पोथी आहे, त्यातून याबाबत खुलासा करून घेऊ!

हे सुद्धा पहा – Uttarayan Rashifal 77 वर्षांनंतर मकर संक्रांतच्या शुभ मुहूर्तावर जुळून येत आहे अद्भूत योग चिक्कार श्रीमंत होणार ‘या’ राशीचे लोक.. पहा या भाग्यशाली राशींमध्ये तुमची रास आहे का..

‘श्रीमहालक्ष्मीव्रत’ या पोथीत लेखक द. शं. केळकर यांनी व्रतासंबंधी सविस्तर माहिती दिली आहे. हे व्रत सुख, शांती, धन-संपत्ती व श्रीलक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी करावयाचे आहे. व्रत करणारे स्त्री-पुरुष शरीराने व मनाने स्वच्छ व आनंदी असावेत. (Margshirsh Mahalaxmi Vrat) ह्या व्रताला कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करता येईल. दर गुरुवारी श्रीमहालक्ष्मीव्रत पूजाविधीसह करावे.

महालक्ष्मीव्रताची कथा व माहात्म्य वाचावे. अशा प्रकारे आठ गुरुवार हे व्रत आचरून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. तसेच हे व्रत वर्षभरही करता येते. वर्षभर दर गुरुवारी आपल्या कुलदेवतेसमोर किंवा देवीच्या छायाचित्रासमोर बसून श्रीमहालक्ष्मीव्रतकथा व माहात्म्य ह्यांचे वाचन करावे.

व्रताचे उद्यापनाचे दिवशी आठ सुवासिनींना अगर आठ कुमारिकांना घरी बोलवावे. प्रत्येकीला पाटावर किंवा आसनावर बसवून ती व्यक्ती महालक्ष्मीस्वरूप समजून तिला हळदकुंकू लावावे. (Margshirsh Mahalaxmi Vrat) पूजा व आरती संपल्यावर प्रसाद म्हणून फळ आणि यापोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी व नमस्कार करावा. हेच ह्या व्रताचे उद्यापन.

हे सुद्धा पहा – Lucky Rashi In 2024 येणारे वर्ष ‘या’ राशींसाठी ठरणार भाग्यशाली.. करिअर आणि पैशांच्या बाबतीत होणार मोठा फायदा.!!

मार्गशीर्षात चार किंवा पाच गुरुवार आल्यास पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी (अमावास्या असली तरीही) व्रताचे उद्यापन करावे. व्रताचे दिवशी उपवास करावा. (Margshirsh Mahalaxmi Vrat) केळी, फळे, दूध घ्यावे. उपाशी राहू नये. रात्री गोडाचे जेवण करून देवीला नैवेद्य दाखवून सर्वांसह भोजन घ्यावे. हे व्रत संसारी जोडप्यांसाठी पद्मपुराणात सांगितले आहे.

काही कारणांनी हे व्रत करताना अडचण येते, तेव्हा त्यांनी दुसऱ्याकडून पूजा करवून घ्यावी. उपवास मात्र स्वतः करावा. तो गुरुवार मोजू नये. इतर कोणतेही उपवास असताना हे गुरुवार व्रत आले तरी हे व्रत करावे. रात्री पूजा करावी. वाटल्यास रात्री जेवू नये.

ज्यांना हे व्रत दिवसा करता येत नसेल, त्यांनी रात्री करावे. फक्त दिवसा भोजन करू नये. निराहार राहू नये. या पोथीश्रवणाचा लाभ सर्वांना द्यावा. पोथी वाचताना एकाग्रता व शांतता असावी. (Margshirsh Mahalaxmi Vrat) पोथीवाचनाचे वेळी, महालक्ष्मीचे अस्तित्व गुप्त स्वरूपात जाणवेल. शांतता व मनाची एकाग्रता असणाऱ्यांना सुवासही जाणवेल.

10 जानेवारी रोजी रात्री 8 वाजून 11 मिनिटांनी अमावस्या सुरू झाली आहे 11 तारखेला संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी संपेल. अमावास्येची तिथी 11 तारखेचा सूर्योदय पाहणार असल्याने मार्गशीर्ष अमावस्या 11 तारखेला गृहीत धरली जाईल. शिवाय या व्रताला अमावस्येचा अडसर नाही. ज्याप्रमाणे आपण अश्विन अमावस्या लक्ष्मी पूजनाने साजरी करतो त्याप्रमाणे मार्गशीर्ष अमावस्येला या व्रताचे उद्यापन करता (Margshirsh Mahalaxmi Vrat). पण त्यामुळे मनातील संभ्रम दूर करून वरील दिलेल्या माहितीनुसार व्रताचे उद्यापन करा आणि व्रतपूर्तीचे फळ मिळवा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular